फोटो - सोशल मीडिया
बीड : बीडमध्ये भीषण अपघात झाला आहे. अंबेजोगाई रोडवर हा दुर्दैवी अपघात झाला असून यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज रविवारी (दि.22) पहाटेच्या सुमारास अंबेजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ हा अपघात झाला. स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघातामध्ये कारमधील चार जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, या स्विफ्ट कारमध्ये चार जण रात्री उशीरा प्रवासाला निघाले होते. जगलपूर येथील चार जण स्विफ्ट कारमधून (एमएच 24 एएस 6334) छत्रपती संभाजीनगरच्या प्रवासाला निघाले होते. रात्री अंबाजोगाई तातूर रोड पसिरामध्ये मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे रस्ते देखील निसरटे झाले होते. मुसळधार पावसात पाचपीर दर्गाजवळ ही कार आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची (एमएच 12 एमव्ही 7188) जोरदार धडक झाली.
हा अपघात रविवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास झाला. या अपघाताचे स्वरुप भीषण असल्यामुळे कार पूर्णपणे कंटेनरच्या खाली घुसली होती. त्यानुळे कारचा चुराडा झाला आणि कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही कारमधील चारही जण लातूर जिल्ह्यातील चाकूरमधील जगलपूरचे रहिवासी आहेत. या भीषण अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.