कासारीत कुत्र्याची समजून कोल्ह्याची पिल्ले आणली घरी; प्राणीमित्रांना माहिती मिळताच...
शिक्रापूर : कासारी (ता.शिरुर) येथे तात्पुरते वास्तव्यास आलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांनी शेतात आढळून आलेल्या कोल्ह्याची पिल्ले कुत्र्याची पिल्ले समजून घरी आणली. मात्र, एका नागरिकाच्या सतर्कतेने त्या पिलांची प्राणीमित्रांकडून सुटका करत निसर्गात मुक्त करण्यात आले.
कासारी (ता.शिरुर) येथे तात्पुरते वास्तव्यास आलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांजवळ कोल्ह्याची पिल्ले असल्याचे प्रकाश रासकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती त्यांच्या ओळखीच्या वनरक्षक ऋतुजा भोरडे यांना माहिती दिली. त्यानंतर वनरक्षक ऋतुजा भोरडे, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व शिरुर वनविभाग रेस्क्यू टीमचे अमोल कुसाळकर, शुभम वाघ, प्रकाश रासकर यांनी तातडीने सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली.
या दरम्यान त्या उसतोड कामगारांच्या मुलांनी कुत्रे समजून कोल्ह्याच्या तीन पिल्लांना घरी आणल्याचे समजले. दरम्यान, वनरक्षक व प्राणीमित्रांनी त्यांना समज देत कोल्ह्याच्या पिल्लांना ताब्यात घेत ज्या शेतातून मुलांनी पिल्ले आणली. त्या शेताच्या जवळ नैसर्गिक आधिवासात मुक्त केले.
वन्यजीव धोक्यात
केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने वन्यजीवांच्या शिकारी, अवैध व्यापार व अपराधांची वाढती संख्या, आंतरराष्ट्रीय शिकाऱ्यांच्या सक्रिय टोळ्या व होणारे व्यापार बघता राज्य पातळीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याकरिता पूर्णवेळ समर्पित असे वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो, स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्याची अंमलबाजवणी अद्यापही झाली नाही. परिणामी वन्यजीव धोक्यात आले आहे.
वन्यजीवांच्या शिकारीचे प्रमाण अधिक
गोंदियासारख्या जिल्ह्यात नैसर्गिकदृष्ट्या जैवसंपन्न आहे. जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचप्रकारे राखीव आणि नियमीत वनक्षेक्ष देखील आहे. त्या जंगलात वाघ, बिबट व इतर वन्यजिवांच्या शिकारी व अवैध व्यापार मोठ्या प्रमाणात होत आहे. वाघ, बिबट, अस्वल, खवले मांजर, घोरपड, हरीण, काळविट, चितळ आणि पक्ष्यांची शिकार देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर आळा घालणे गरजेचे झाले आहे.