अहमदनगर : पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP party) आणि माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील (Jayant Patil) हे मराठवाडा (Marathwada) विभागाच्या दौर्यावर असून, त्यांनी अहमदनगर व औरंगाबाद (ahmednagar and Aurangabad) येथे शहर व ग्रामीण संघटनेचा आढावा घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांकडून पक्ष वाढीसंदर्भात त्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या. मागील काळात आपल्या या जिल्ह्यांनी मोठ्या प्रमाणावर शरद पवारसाहेबांना (Sharad pawar) ताकद दिली होती याची आठवणही जयंतराव पाटील यांनी करून दिली. आपल्याला आपला पक्ष वाढवायचा असेल तर पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने तळागाळात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. शहरातील वॉर्डा – वॉर्डात बुथ लावून नोंदणी अभियान राबविले पाहिजे असे आवाहनही जयंतराव पाटील यांनी केले.
[read_also content=”शिवाजी पार्क म्हटलं की शिवसेनाचं, दसरा मेळाव्यावरुन शरद पवार यांची प्रतिक्रिया https://www.navarashtra.com/maharashtra/shivaji-park-is-only-for-shivsena-sharad-pawar-reaction-on-dasara-meleva-327689.html”]
दरम्यान, यावेळी पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकारवर (Shinde fadnvis government) जोरदार टिका केली. नुकताच सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या हातातून हिसकावून घेतला गेला. फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) प्रोजेक्ट जर महाराष्ट्रात आला असता तर, इतर कंपन्यांनीही प्रोत्साहित होऊन त्यांचे प्रोजेक्ट आपल्या राज्यात आणण्यासाठी इच्छा व्यक्त केली असती. परंतु मुख्यमंत्री हे दिल्लीश्वरांच्या इच्छेपुढे नमले असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार पाडलं गेलं ते लोकांना पटलेले नाही. शिंदे गटाने केलेली गद्दारी ही लोकांना रुचलेली नाही. हे सरकार आल्यापासून महाराष्ट्राच्या अधोगतीचे निर्णय घेतले जात आहेत असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.