संग्रहित फोटो
मंचर : पोल्ट्री व्यवसायिकांना अच्छे दिन आले आहेत. मात्र, चिकन खवय्यांमध्ये चिकनच्या बाजार भाववाढीमुळे मोठी नाराजी पसरली आहे. १५ दिवसांपूर्वी २२० रुपये किलोने मिळणारे चिकन प्रति किलो २५० रुपयाने मिळत असल्याने चिकन शौकिनांमध्ये नाराजी पसरली आहे. अचानक चिकनचे दर वाढल्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत.
ऐन उन्हाळ्यात तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले आहे. त्यामुळे कोंबड्या मरण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून, पोल्ट्री फार्ममध्ये तसेच चिकन व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये कोंबड्यांची मर अधिक होत आहे. तसेच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने बहुतांशी पोल्ट्री फार्म बंद आहेत. ग्रामीण भागात विवाहसमारंभ, वाढदिवस, कांदा काढणी व द्राक्ष बागांच्या कामाकरिता आलेले मजूर यांच्यामुळे चिकनला सध्या उठाव असून, घाऊक बाजारात मालाची कमतरता जाणवत आहे. एवढ्या वर्षात पहिल्यांदाच जिवंत कोंबडीचा दर प्रति किलो १४० रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांना अच्छे दिन आले आहेत.
मात्र चिकन शौकीन खवय्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. चिकनचे दर अचानक गेल्या १५ दिवसांपूर्वी २२० रुपये किलोने मिळणारे चिकन प्रति किलो २५० रुपयाने मिळत असल्याने चिकन शौकिनांमध्ये नाराजी पसरली आहे. अचानक चिकनचे दर वाढल्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत.
अंड्याच्या दरामध्ये सुध्दा वाढ
पोल्ट्री व्यवसायाला अच्छे दिन येऊ लागल्याने पोल्ट्री व्यवसायामध्ये अनेक शेतकरी सहभागी होताना दिसत आहे. चिकनचे दर अचानक वाढल्याने हॉटेल व्यवसायिकांना १५० ते १७० रुपयात थाळी देणे आता परवडणे मुश्किल होणार आहे. अंड्याच्या दरामध्ये सुध्दा वाढ झाली असून, अंड्याचे दर ६०० रुपये शेकड्यापर्यंत असून अंडी ८४ डझनने विक्री होत आहेत. तसेच बकराच्या मटणालाही मागणी टिकून असल्याचे दिसून येत आहे. बकराचे दर ६६० रुपये ते ७०० रुपये किलो प्रमाणे मिळत असल्याची माहिती एकलहरे येथील चॉईस मटन व्यवसायिक व बकराचे व्यापारी शेखर कांबळे यांनी सांगितले आहे.