Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पैसा, मोठी रुग्णालये, कॉर्पोरेट क्षेत्रामुळे आरोग्य क्षेत्र बदलले; तुकाराम मुंढे यांचे मत

पैसा, मोठी रुग्णालये, कॉर्पोरेट क्षेत्र यामुळे आरोग्य क्षेत्रात बरेच बदल झालेत. जीवन शैलीबाबत आपल्या सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळेच ‘हेल्थ इकॉनॉमिक्स’ हे जगातील सर्वात गुंतागुंतीचे आणि न सुटणारे कोडे बनले असून, ते सोडविणे अतिशय अवघड आहे,’’ असे मत प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. तसेच हे माझे व्यक्तीगत मत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 10, 2022 | 08:06 PM
पैसा, मोठी रुग्णालये, कॉर्पोरेट क्षेत्रामुळे आरोग्य क्षेत्र बदलले; तुकाराम मुंढे यांचे मत
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पैसा, मोठी रुग्णालये, कॉर्पोरेट क्षेत्र यामुळे आरोग्य क्षेत्रात बरेच बदल झालेत. जीवन शैलीबाबत आपल्या सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळेच ‘हेल्थ इकॉनॉमिक्स’ हे जगातील सर्वात गुंतागुंतीचे आणि न सुटणारे कोडे बनले असून, ते सोडविणे अतिशय अवघड आहे,’’ असे मत प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. तसेच हे माझे व्यक्तीगत मत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

पी. एम. शाह फाउंडेशनच्या वतीने ११ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन तुकाराम मुंढे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अरुण गद्रे, पी. एम शहा फाउंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण कोठडीया, विश्वस्त डॉ. विक्रम काळुस्कर, फाउंडेशनचे संचालक अ‍ॅड. चेतन गांधी, सतीश कोंढाळकर, एनएफडीसी- एनएफएआयचे व्यवस्थापक जसबीर सिंग आदी उपस्थित होते.

तंत्रज्ञानामुळे तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता

मुंढे म्हणाले, “आज आरोग्य सुविधा वाढल्या आहेत, तंत्रज्ञानाचा वापरही वाढला आहे. हल्ली आपले आरोग्य कसे असायला हवे, हे आपण स्मार्ट वॉच’कडून जाणून घेतो, तर आरोग्याच्या समस्येबाबत गुगल डॉक्टरकडून उपाय केले जातात. हे अतिशय दुर्दैवी आहेत. कारण हे तंत्रज्ञान केवळ तुम्हाला हवे, तेच सांगते. अशा तंत्रज्ञानामुळे तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक असते. आर्टीफिशल इंटेलिजन्सचा वापर नक्कीच करा. पण आर्टीफिशल जीवन जगू नका.’’

विचारपद्धती, आहार पद्धती बदलली तर आरोग्य चांगले होईल

“ जीवनशैलींचे आजार ही आजच्या काळातील सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे. आपल्यापैकी अनेक जण मधुमेह ते उच्च रक्तदाब अशा विविध प्रकारच्या आजारांनी त्रस्त आहेत. आपल्या आरोग्यासाठी आपण पुरेसा वेळ देत नाही. थोडा वेळ स्वत:साठी द्यायला सुरुवात केली तर जीवनात महत्वाचा बदल होईल. त्याचबरोबर आपल्याला आपली विचारपद्धती आणि आहार पद्धती बदलली पाहिजे. त्याबाबत केवळ बोलून नाही, तर कृती करणेही गरजेचेच आहे. असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.’’

Web Title: Health sector changed due to money big hospitals corporate sector opinion of tukaram mundhe nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2022 | 08:06 PM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Pune
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?
1

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
3

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
4

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.