बोर घाटात वाहतूक कोंडी (फोटो- istockphoto)
पुणे: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील बोर घाट परिसरात शनिवारी सकाळपासून वाहतूक विस्कळीत झाली. लोणावळा, खंडाळा परिसरात सुट्टीचा दिवस, थंड हवामान आणि निसर्गरम्य वातावरणाचा (Weather) आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळल्याने द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी बोर घाटात काही काळ वाहतूक अक्षरशः ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले.
सकाळपासूनच मुंबईकडून पुण्याकडे आणि पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली. विशेषतः कार, खासगी प्रवासी वाहने आणि पर्यटन बस यांची संख्या वाढल्याने बोर घाटातील अरुंद वळणांवर वाहतूक संथ गतीने सरकू लागली. काही ठिकाणी वाहनांचे छोटे अपघात तसेच रस्त्याच्या कडेला बिघडलेली वाहने यामुळे खोळंबा अधिक वाढला. लोणावळा व खंडाळा परिसरातील प्रमुख पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही गर्दीचा ताण जाणवत होता. भुशी धरण, लायन पॉइंट, टायगर पॉइंट, कार्ला–भाजे लेणी या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाली.
पार्किंगची व्यवस्था अपुरी पडल्याने अनेक ठिकाणी वाहने रस्त्यावरच थांबवली जात असल्याचे दिसून आले. वाहतूक पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले. बोर घाट परिसरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही काळ जड वाहनांना थांबवण्यात आले, तर वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, वाहनांची संख्या प्रचंड असल्याने प्रवाशांना बराच वेळ खोळंबा सहन करावा लागला.
प्रवास सुखकर होणार! पुण्याच्या ‘या’ भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी PMRDA चा मोठा निर्णय
पुण्याच्या ‘या’ भागातील वाहतूक कोंडी सुटणार
अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर व वाघोली येथील वाहतूक कोंडी (Traffic) टाळण्यासाठीच्या उपाययोजना व नियोजना पीएमआरडीए‘च्या बुधवारी झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली. वाघोली ते शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करायच्या दृष्टीने पुणे – अहिल्यानगर मार्गास समांतर ३० मीटर रस्ते प्रादेशिक आराखड्यानुसार तयार करण्यात येईल. त्यानुसार, खराडी जकात नाका ते केसनंद ते बकोरी रस्ता हा वाघोली बायपास रस्ता असून, रस्त्याचे सीमांकनाचे काम पीएमआरडीएकडून पूर्ण केले आहे.
वाघोली व केसनंद परिसरातील वाहतूक कोंडी कमी करून खराडीपासून केसनंद चौक बायपास करून पुणे – अहिल्यानगर मार्गावरील लोणीकंदपर्यंतच्या नवीन वाघोली -केसनंद बायपास रस्त्याच्या नवीन मार्गाबाबत प्रत्यक्ष पाहणी करून प्रस्तावित करण्यात यावा, जेणेकरून वाघोली व केसनंद या परिसराला नवीन बायपास रस्ता उपलब्ध होईल, असेही डॉ. म्हसे यांनी निर्देशित केले.






