राज्यात कोरोना रूग्ण संख्येत वाढ (फोटो- सोशल मिडिया)
पंढरपूर: राज्यासह आणि देशभरात कोविडचे रूग्ण झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. अनेक दिवसांपासून जगामध्ये कोरोना डोके वर काढत आहे. चार वर्षांपूर्वी धुमाकूळ घातलेल्या कोविड-19 च्या नव्या व्हायरसने चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रामध्ये देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. याबाबत आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर एक महत्वाचे वक्तव्य केले आहे.
देशात आणि राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असतानाच, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मात्र कोरोना बाबत अजब आणि धक्कादायक वक्तव्य केले आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळेस ते म्हणाले, “कोरोना झाला तरी कुठे ही अॅडमीट होण्याची गरज नाही. ”
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आज पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांना राज्यात अॅक्टीव कोरोना रूग्ण संख्ये बाबत विचारले असता, त्यांना रूग्ण संख्येबद्दल माहिती नसल्याचे देखील समोर आले आहे. आषाढी पालखी सोळ्याच्या तोंडावर अकलूज व माळीनगर येथे चार संशयित कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता वाढलेली असताना आरोग्यमंत्रीच कोरोना बाबत गंभीर नसल्याचे समोर आले आहे.
Corona Update: आरोग्यमंत्र्यांचे कोरोनाबाबत भाष्य; म्हणाले, “रुग्णसंख्येत वाढ होतेय, मात्र…”
पूर्वी सारखा कोरोना आता राहिला नाही. सध्याच्या कोरोनाचे सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे कोरोनाला फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कोरोना झाला तरी कुठे ही रुग्णालयात जाण्याची गरज नाही. असं प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.
आरोग्यमंत्र्यांचे कोरोनाबाबत भाष्य
राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दिवसेंदिवस प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातही कोरोना पसरत असून आरोग्य विभाग आणि प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत. “कोरोना रुग्णसंख्या वाढली तरी काळजी करू नका, घाबरू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या, गोंधळून जाऊ नका. राज्यातील रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी, राज्यातील परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे.” त्यामुळं आरोग्य विभागाला काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.
Corona Update : सावधान! कोरोनाचा होतोय देशभरात विस्तार; सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजारांच्या पार
कोरोनाचा होतोय देशभरात विस्तार
मागील अनेक दिवसांपासून जगामध्ये कोरोना डोके वर काढत आहे. चार वर्षांपूर्वी धुमाकूळ घातलेल्या कोविड-19 च्या नव्या व्हायरसने चिंता वाढवली आहे. भारतामध्ये देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोविड-19 वेगाने पसरत असून देशामध्ये सक्रिय रुग्णांची संख्याही 6 हजारांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. यामुळे आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.