दक्षिण मध्य रेल्वे अकोला पूर्णा रेल्वे मार्गावर काकीनाडा टाऊन हिसार रेल्वे कायमस्वरुपी करण्यात येणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
Railway News : हिंगोली : दक्षिण मध्य रेल्वे अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावर काकीनाडा टाऊन -हिसार विशेष साप्ताहिक ट्रेन चालवली जात होती. आता, केंद्रीय रेल्वे (Railway News) मंत्रालयाने ट्रेन क्रमांक शुन्य सात सात शून्य पाच / शून्य सात सात शून्य सहा काकीनाडा टाऊन हिसार विशेष ट्रेनला कायमस्वरूपी करण्याची घोषणा केली आहे. ही ट्रेन लवकरच तिच्या नवीन क्रमांक एक सात दोन नऊ पाच / एक सात दोन नऊ सहा सह सुरू केली जाईल. दर गुरुवारी सकाळी पाच वाजता काकीनाडा येथून निघून, काचीगुडा, निझामाबाद, पूर्णा येथे रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी, नंतर शुक्रवारी वसमत येथे रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी, हिंगोली येथे रात्री एक वाजून पस्तीस मिनिटांनी, वाशिम येथे रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी, अकोला येथे सायंकाळी पाच वाजता, वडोदरा, रतलाम, चित्तूरगड, अजमेर, झुंझुनू मार्गे जाऊन, ही गाडी दर तिसऱ्या शनिवारी दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी हिसारला पोहोचेल. (Nanded News)
रेल्वे सेवेमुळे प्रवास सुलभ
परतीच्या प्रवासात, हिसार-काकीनाडा ही रेल्वे सेवा दर रविवारी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी हिसार येथून सुटेल. त्यानंतर ही गाडी नियोजित मार्गाने प्रवास करत मंगळवारी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी शेगाव येथे, सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी अकोला येथे, सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी वाशिम व हिंगोली येथे, सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी बसमत येथे, दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी पूर्णा येथे तर दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी नांदेड येथे पोहोचेल. पुढे प्रवास करत ही गाडी बुधवारी सकाळी नऊ वाजता काकीनाडा टाऊन येथे पोहोचणार आहे. या रेल्वे सेवेत एकूण बावीस डबे असणार आहे.
हे देखील वाचा : शेती आणि संस्कृती फुलवणारा ‘होलोसीन’ काळ संपतोय? पृथ्वी आता विनाशाच्या उंबरठ्यावर
प्रवासाची नवी सुविधा उपलब्ध
वीस थर्ड एसी डबे आणि दोन पॉवर कार डब्यांचा समावेश असेल. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. विशेष म्हणजे, या गाडीचा विशेष दर्जा हटवून तिला कायमस्वरूपी स्वरूप देण्यात आल्यामुळे वेळापत्रक अधिक नियमित होणार असून गाडी उशिरा धावण्याची शक्यता कमी होईल. तसेच, तिकीट दरातही कपात होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
हे देखील वाचा : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?
वातानुकूलित स्लीपर कोचमध्ये बेडरोलची सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांची सोय अधिक चांगली होणार आहे. या गाडीच्या सुरूवातीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील प्रवाशांना देशातील विविध शहरांशी थेट जोडणी मिळणार असून व्यापार, शिक्षण आणि रोजगाराच्या दृष्टीनेही याचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, ही रेल्वे सेवा कायमस्वरूपी करण्यात आल्याबद्दल विविध पदाधिकारी व रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वे विभागाचे अभिनंदन केले आहे.






