शेती आणि संस्कृती फुलवणारा 'होलोसीन' काळ संपतोय? पृथ्वी आता विनाशाच्या उंबरठ्यावर
Climate Tipping Elements : मानवी संस्कृती, शेती आणि नागरीकरण ज्या स्थिर ‘होलोसीन’ कालखंडात फुलले, ती हवामान व्यवस्था आता ढासळत आहे. पृथ्वी आता ‘हॉटहाऊस अर्थ ट्रॅजेक्टरी’ (अत्यंत उष्ण स्थिती) कडे वाटचाल करत असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. शास्त्रज्ञांनी ग्रीनलँडमधील बर्फाचे थर, ॲमेझॉनचे जंगल आणि अटलांटिक महासागरातील प्रवाह यांसारख्या १६ ‘टिपिंग एलिमेंट्स’ची ओळख पटवली आहे.
पृथ्वीवरील वाढते तापमान आता केवळ मानवी क्रियांपुरते मर्यादित राहिले नसून, स्वतःच अधिक तापमानवाढ घडवून आणणाऱ्या प्रक्रियांना चालना देत असल्याचा गंभीर इशारा आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी दिला आहे. एकदा ही साखळी सुरू झाली, तर ती मानवी नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, असे नव्या संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे. ‘वन अर्थ’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, मानवजातीने हजारो वर्षे अनुभवलेली स्थिर हवामान व्यवस्था आता ढासळत आहे.
Iran-Israel War : युद्धजन्य परिस्थितीत सागरी सुरक्षा खिळखिळी; व्यापारी नौदलाची जहाजे निशाण्यावर
‘होलोसीन’ या काळात शेती, नागरीकरण आणि मानवी संस्कृती फुलली; मात्र आता पृथ्वी या स्थिरतेतून बाहेर पडत असल्याचे संशोधकांचे मत आहे. हवामातज्ञ विल्यम जे. रिपल आणि पृथ्वी प्रणाली तज्ञ जोहान रॉकस्ट्रॉम यांच्या नेतृत्वाखालील संशोधनात ‘हाँथाऊस अर्थ ट्रॅजेक्टरी’चा धोका अधोरेखित करण्यात आला आहे.
शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील १६ महत्त्वाच्या ‘टिपिंग एलिमेंट्स’ची ओळख पटवली आहे. ग्रीनलैंड हिमपत्र, अॅमेझॉन जंगल आणि अटलांटिक महासागरातील प्रवाह हे त्यातील प्रमुख घटक आहेत. या घटकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा परस्परांशी असलेला संबंध, एका घटकात झालेला बदल दुसऱ्याला अस्थिर करू शकतो.
२०१५ च्या पॅरिस करारातील १.५ अंश सेल्सिअस मर्यादा २०२४ मध्ये सलग महिने ओलांडली गेली असून, ही दीर्घकालीन तापमानवाढीची स्पष्ट चिन्हे मानली जात आहेत. तापमानवाढीचा वेगही मोठ्या प्रमाणात वाढला आहे, ज्यामुळे २ अंश मर्यादा लवकरच पार होण्याची शक्यता आहे. एरोसोल्सचा (हवेत विखुरलेले सूक्ष्मकण) ‘कूलिंग इफेक्ट’ कमी झाल्याने तापमान आणखी वाढू शकते.
संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार,१२२१०० पर्यंत तापमान सुमारे २.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असून, कार्बन उत्सर्जनही विक्रमी पातळीवर पोहोचले आहे.शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वी सध्या ज्या दिशेने वाटचाल करत आहे ती अजूनही बदलता येऊ शकते. मात्र, तातडीने आणि ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात ‘हॉथाऊस स्टेट’ सारख्या अत्यंत उष्ण आणि धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.
संशोधनात तापमानवाढीच्या ‘अॅर्मप्लफायिंग फीडबैंक लूप्स वर विशेष भर देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, आविर्टकमधील बर्फ वितळल्यावर सूर्यप्रकाश परावर्तित करणारी पांढरी पृष्ठभाग कमी होते आणि त्याऐवजी समुद्र अधिक उष्णता शोषतों. परिणामी आणखी बर्फ वितळती आणि ही प्रक्रिया वेगाने सुरू राहते. याशिवाय, पर्माफ्रॉस्ट (ध्रुवीय प्रदेशातील कायमस्वरूपी गोठलेली जमीन) वितळून कार्बन उत्सर्जित होणे, जंगलांचे नष्ट होणे आणि ढगांच्या रचनेत बदल होणे या घटकांमुळे तापमानवाढीला अधिक गती मिळते, या सर्व प्रक्रिया एकत्रितपणे पृथ्वीच्या तापमानाला स्वतः वाढवणाऱ्या प्रणालीमध्ये रूपांतरित करू शकतात.






