मीरा भाईंदर : मेट्रो कर्मचाऱ्यांची (Metro Employees) दादागिरी (bullying) सुरूच असल्याचे समोर आले आहे. या अगोदरही या कर्मचाऱ्यांकडून सामान्य नागरिकांशी वाद झाल्याचं दिसून आले आहे. रविवारी मध्यरात्री (Sunday Midnight) सिल्व्हर पार्क परिसरात (Silver Park Area) एका तरुणाशी वाद झाल्यानंतर चक्क त्या तरुणाच्या अंगावर क्रेन चढवण्याचा प्रयत्न मेट्रो कर्मचाऱ्यांनी केला (After an argument with a young man, the metro staff tried to lift the crane on that young man). संतप्त झालेल्या नागरिकांनी व युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी या ठिकाणचे काम बंद केले.
मीरा भाईंदर मेट्रो ९ (Mira Bhayander Metro 9) चे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. या मेट्रोच्या कामांमुळे अनेक गोष्टींचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी,काम सुरू असल्याने रस्त्यावर साचलेले चिखल खड्डे, मध्यरात्री एकतर्फी रस्ता, अनेक ठिकाणी रस्त्यावर साहित्य असल्याने रेडियम लावण्यात आले नाही त्यामुळे वाहन चालवताना अपघात होत आहेत. अशा अनेक गोष्टींच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत.
त्यातच मागील अनेक दिवसात मेट्रो कर्मचाऱ्यांच्या तक्रारीतही वाढ झाली आहे. वीस दिवसांपूर्वी एका पत्रकारावर मेट्रो कर्मचाऱ्यांनी भ्याड हल्ला केला, त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. तर पत्रकारावर हल्ल्याची घटना ताजी असतानाच रविवारी रात्री एक तरुण कामावरून घरी जात असताना मेट्रोचे क्रेन रस्ता अडवून जात असल्याने विचारपूस केली असता अंगावर क्रेन चढवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणाची माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच कर्तव्यावर असलेल्या सुपरवायझर यांना विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. तसेच संबंधित क्रेन चालक फरार झाला. क्रेन चालकाला बोलावं अशी मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात आली. मात्र क्रेन चालकांचा पत्ता न लागल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेट्रोचे काम बंद पाडले.
युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे यांनी मेट्रो अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कनकिया परिसरातील कार्यालयात गेले असता, मेट्रोच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पळ काढला. यावेळी मीरारोड पोलिस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.आम्हाला उद्या पोलिसांनी मीरारोड पोलिस ठाण्यात बोलवले आहे. मेट्रो अधिकाऱ्यांची उद्या भेट घेणार असून कायदेशीर कारवाईची मागणी करणार आहोत, कारवाई न झाल्यास युवक काँग्रेस तीव्र आंदोलन करेल अशी माहिती सिद्धेश राणे यांनी दिली.
ज्या पद्धतीने मेट्रो कर्मचाऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यानुसार हे कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची शक्यता नाकारता येत नाही. बिहार,झारखंड, उत्तरप्रदेश मधून या सर्व कर्मचाऱ्यांना कमी पैशात, कंत्राटी पद्धतीने ठेकेदार घेऊन येत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची चरित्र पडताळणी झाली पाहिजे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडली तर प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
मेट्रो कर्मचाऱ्यांची अरेरावी सुरूच आहे. हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे कर्मचारी आहे. यांच्या मूळगावी यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत. याची चौकशी झाली पाहिजे. पालिका व पोलीस, जे कुमार, या सर्व यंत्रणेने वेळीच लक्ष घातले पाहिजे. मेट्रो कर्मचाऱ्यांची दादागिरी न थांबल्यास संपूर्ण काम बंद करण्यात येईल.
संदीप राणे,उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना
थेट अंगावर क्रेन घेऊन जाण्याची हिम्मत होतेच कशी. हे सर्व आपल्या मूळगावी बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, इथून गुन्हे करून मुंबईत काम करायला येत असल्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसात मेट्रो कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले पाहिजे.
अमित मोरे, नागरिक