नाशिक : नाशिकमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला आहे. खासगी ट्रॅव्हल्स बस पलटी झाली, या अपघातामध्ये 14 प्रवासी जखमी झाले आहेत, यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे. जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. चांदवड परिसरात मुंबई- अग्रा राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी ट्रॅव्हल्स बस क्रमांक NL07 B0908 ही बस मध्य प्रदेश येथून मुंबईच्या दिशेनं येत असताना मुंबई-आग्रा महामार्गांवर नाशिकच्या चांदवडजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात १४ जण जखमी झाले आहेत. यामधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पहाटेच्या वेळी दाट धुक्यामुळे समोरचं काही दिसत नव्हतं, त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हॉटेल माथेरान जवळ बस पलटी झाली. अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले. अपघातात जखमी झालेल्यांवर सध्या चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.