मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) दिवसेंदिवस विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad) यांनी ‘मला कुठल्याही क्षणी, कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाईल असे काही केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.
आव्हाड म्हणाले की, राज्यावर सध्या 6 लाख 66 हजार कोटींचे कर्ज आहे आणि हे कर्ज आता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या ज्या घोषणा केल्या जात आहेत. त्यासाठी पैसे असल्याचे वाटत नाही. आर्थिकदृष्ट्या ही धोक्याची घंटा आहे. अशाच पद्धतीने राज्य कारभार चालला तर महाराष्ट्रात दिवाळखोरी होईल. तसेच जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, ‘मला कुठल्याही क्षणी, कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाईल असे काही केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. निदान ठाणे महानगरपालिका निवडणुका होईपर्यंत तुला आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरला आहे’.
…म्हणून बेरोजगारीचा आलेख खाली येताना दिसत नाहीये
दोन लाख कोटी रुपयांचे फुकट धान्य त्यामुळे बेरोजगारीचा आलेख कुठेही खाली येताना दिसत नाही. जीडीपी रेट मागच्या वर्षी आठ दाखवला होता आणि यावर्षी सहा पूर्णांक काहीतरी दाखवला आहे. तो सुद्धा फुगवून दाखवलेला आहे. देश सावरणे सध्या फार आवश्यक आहे. नाहीतर देशातील सर्वसामान्य लोक अडचणीत येतील, असेही त्यांनी म्हटले आहे.