शिक्रापूर : शिरुर शहरातील एका 19 वर्षीय युवतीचे अश्लील फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत युवतीवर बलात्कार (Rape on Girl) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने या युवतीला तिचे संपूर्ण कुटुंब संपवण्याची आणि स्वतः फाशी घेण्याची धमकी (Crime in Shikrapur) दिल्याची माहिती दिली जात आहे. याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे ओंकार राजाराम चव्हाण या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर शहरातील पीडित युवतीची ओळख ओंकार चव्हाण याच्यासोबत झालेली असताना युवती ओंकारच्या घरी गेली होती. त्यावेळी ओंकारने तिचे काही अश्लील पद्धतीतील फोटो काढून घेतले. त्यांनतर ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत युवतीला स्वतःच्या मित्राच्या घरी बोलावून घेत बलात्कार केला. त्यांनतर घाबरली गेल्याने घाबरलेल्या युवतीने ओंकारला भेटायला नकार दिल्याने ओंकार याने युवतीच्या घरी जात ‘तू मला भेटायला ये, माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझे खानदान संपवेल आणि मी फाशी घेईन अशी धमकी दिली’, याबाबत पीडित युवतीने शिरुर पोलिसांत तक्रार दिली.
दरम्यान, या तक्रारीवरून शिरुर पोलिसांनी ओंकार राजाराम चव्हाण (वय २१ वर्षे रा. निर्माण प्लाझा शिरुर ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध बलात्कारासह इतर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.