घर घेण्यासाठी किती पैशांची गुंतवणूक SIP मध्ये करणे आवश्यक आहे (फोटो सौजन्य - iStock)
महानगरांमध्ये घर खरेदी करणे आता सोपे राहिलेले नाही. विशेषतः जेव्हा तुम्ही एखाद्या आलिशान परिसरात घर खरेदी करण्याचा विचार करता तेव्हा हे काम आणखी कठीण होते आणि तेदेखील मुंबईसारख्या परिसरामध्ये. उदाहरणार्थ, जर तुम्हाला मुंबईतील एका पॉश भागात असलेल्या वांद्रे येथे तुमचे घर खरेदी करायचे असेल, तर त्यासाठी केवळ भरपूर पैसेच नाहीत तर दीर्घकालीन नियोजनदेखील आवश्यक असेल. जर तुमचे उत्पन्न मर्यादित असेल तर बँकेकडून कर्ज घेण्याऐवजी तुम्ही दीर्घकालीन नियोजन करून येथे घर खरेदी करू शकता.
जेव्हा दीर्घकाळात मोठा निधी उभारण्याचा विचार येतो तेव्हा म्युच्युअल फंडांचा SIP हा सर्वोत्तम पर्याय आहे. जर ही योजना अंमलात आणली गेली तर प्रश्न असा आहे की या कामासाठी अर्थात घर घेण्यासाठी किती एसआयपी रक्कम पुरेशी असेल आणि त्यासाठी किती वेळ लागेल. जर तुम्हाला वांद्रेसारख्या पॉश परिसरात घर घ्यायचे असेल तर SIP द्वारे कोणत्या प्रकारचे नियोजन करावे लागेल. अशाप्रकारे, बँकेकडून कर्ज घेऊन ईएमआय भरण्याऐवजी आणि कर्जात अडकण्याऐवजी तुम्ही तुमच्या गुंतवणुकीतून पुरेसा निधी निर्माण करू शकता, जाणून घ्या एका क्लिकवर (फोटो सौजन्य – iStock)
किती रूपयांची SIP हवी
आर्थिक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या २० टक्के रक्कम एसआयपीमध्ये गुंतवून हे ध्येय साध्य करता येते, तर ही गुंतवणूक रक्कम दरवर्षी १० टक्क्यांनी वाढवावी लागेल. समजा एखाद्याचे सुरुवातीचे उत्पन्न वार्षिक १.४५ लाख रुपये आहे आणि तो त्यातील २० टक्के रक्कम एसआयपीमध्ये जमा करतो. जर हा पगार दरवर्षी १० टक्के वाढला तर २४ वर्षांत त्याचे वार्षिक उत्पन्न १४.२८ लाख रुपयांपर्यंत पोहोचेल.
अडानीच्या ‘या’ शेअरमध्ये तुफान तेजी, चौथ्या तिमाहीत दिसणार धमाकेदार ‘नफा’
किती रूपयांची गुंतवणूक
किती गुंतवणूक करणे आवश्यक
तुमच्या गुंतवणुकीच्या सुरुवातीला, तुम्हाला तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या १.४५ लाख रुपयांच्या २०% म्हणजेच दरवर्षी २९ हजार रुपये एसआयपीमध्ये गुंतवावे लागतील, म्हणजेच तुम्हाला दरमहा २,४१६.६७ रुपयांची एसआयपी करावी लागेल. २४ वर्षांनंतर, जेव्हा वार्षिक उत्पन्न १४,२८,२११.२४ रुपये होईल, तेव्हा त्यातील २० टक्के म्हणजे दरमहा २,८५,६४२.२५ रुपये आणि २३,८०३.५२ रुपये एसआयपीमध्ये गुंतवावे लागतील.
किती आहे घराची किंमत
हाऊसिंग डॉट कॉमच्या मते, मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील मालमत्तेची किंमत सध्या प्रति चौरस फूट ५९,००० रुपये आहे. याचा अर्थ असा की ६०० चौरस फूटाच्या २ बीएचके फ्लॅटसाठी तुम्हाला ३.५४ कोटी रुपये लागतील. जर तुम्ही २४ वर्षे केलेल्या SIP वर १८% वार्षिक व्याज मिळाले तर २.१३ कोटी रुपये जमा होतील. या मोठ्या रकमेचे डाउन पेमेंट करून, तुम्ही बँकेकडून १.५० कोटी रुपयांचे कर्ज घेऊ शकता आणि कमी ईएमआयद्वारे घर घेण्याचे तुमचे स्वप्न सहजपणे पूर्ण करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या सी. ए. अथवा तुमच्या विश्वासू लोकांची मदत नक्की घ्यावी.
मजेत सुरु केले काम, आता कोटींची कमाई! कप केक बनवण्याच्या व्यवसायाने बदलले नशीब
टीपः गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन असते. जर तुम्हाला यामध्ये पैसे गुंतवायचे असतील तर प्रथम प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या नफ्यासाठी किंवा तोट्यासाठी Navarashtra.com जबाबदार राहणार नाही.