निमसाखर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील इंदापूर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन सत्यशिल भिकाजीराव पाटील यांच्या चारचाकी गाडीला अज्ञात इसमा कडून आग लावून पेटवण्यात आली, त्यामुळे वालचंदनगर व बाजार पेठेत खळबळ उडाली आहे.
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील सत्यशिल पाटील यांच्या फोर्ट कंपनीच्या इको स्पोर्ट्स एम एच ४२ झेड ८८९९ या गाडीला काल दिनांक ३ रोजी रात्री ११ ते ११:३० च्या दरम्यान अज्ञात इसमांने आग लावली असून यामध्ये गाडी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मात्र सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.मात्र या घटनेमुळे वालचंदनगर व बाजार पेठेतील नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा परीसरातुन निषेध व्यक्त केला जात आहे.
[blockquote content=”काल रात्री ११:०० ते ११:३० च्या दरम्यान धुर व आवाज आल्याने गाडी लावलेल्या ठिकाणी पाहिले असता गाडी पेटल्याचे आढळून आले.घटना लक्षात येताच मोठ्या प्रमाणात प्रयत्न करुन आग विझविण्यात आली मात्र तो पर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या बाबतीत वालचंदनगर पोलीस स्टेशन ला कळवण्यात आले असून हि घटना खेदजनक आहे. ” pic=”” name=”सत्यशिल पाटील, वालचंदनगर”]
[blockquote content=”सत्यशिल पाटील यांची गाडी पेटल्याची घटना अतिशय निंदनीय असुन अशा घटना समाजातील घातक मनोवृत्तीचे घातक आहे. ग्रामपंचायत व पोलीस प्रशासना सोबतच नागरिक व व्यापाऱ्यांनी देखील जागृत राहुन अशा विकृत मनोवृत्तीच्या घटना पुढील काळात घडणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. ” pic=”” name=”संतोषकुमार गायकवाड, सरपंच, वालचंदनगर”]