नागपूर : आज देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. याचं औचित्य साधून राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात संघप्रमुख मोहन भागवत यांनी ध्वजारोहण केलं. यावेळी कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या या कार्यक्रमात संघाचे काही स्वयंसेवक आणि प्रचारक उपस्थित होते.
[read_also content=”ठाण्यात मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं ध्वजारोहण! https://www.navarashtra.com/thane/chief-minister-eknath-shinde-hoisted-the-flag-at-midnight-in-thane-nrps-316149.html”]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रेशीमबाग परिसरातील डॉ.हेडगेवार स्मारक समिती येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नागपूर महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी ५ वाजता स्वयंसेवक शहरातील विविध भागांत ‘पथसंचलन’ (मार्च पास्ट) करणार आहेत.
[read_also content=”केवढी ही कार्यतत्परता : राज्यात शासकीय कार्यालयांमध्ये No हॅलो, आता ‘Vande Mataram‘ ने होणार संभाषणाला सुरुवात https://www.navarashtra.com/maharashtra/in-the-maharashtra-state-government-offices-will-start-the-conversation-with-vande-mataram-instead-of-hello-nrvb-316112.html”]