नाशिक : जगन्नाथ रथयात्रेला (Jagnnath Rath Yatra) आजपासून सुरुवात झाली आहे. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीपासून रथयात्रा सुरू होते आणि शुक्ल पक्षाच्या 11 व्या दिवशी जगन्नाथजींच्या परत येण्याने हा प्रवास संपतो. आषाढ महिन्यात येथे भव्य रथयात्रा काढली जाते. या जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर नाशिक शहरात पहिल्यांदाच जगन्नाथ रथरात्रेचे (Bhagwan Jagnnath) आयोजन करण्यात आले आहे.
पंचमुखी मंदिर समितीच्या वतीने रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेमुळे वाहतुकीला फटका बसू शकतो. त्यामुळे या पार्श्वभूमीवर रथ मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. रथ यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक सामील झाले आहेत. रथ यात्रेत देव-देवतांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
दरम्यान, रथयात्रेत सहभागी होऊन भगवंताचा रथ ओढणाऱ्याला 100 यज्ञ करण्याएवढे पुण्य प्राप्त होते, अशी लोकांची श्रद्धा आहे. जगन्नाथ रथयात्रेच्या शुभप्रसंगी, आपल्या जवळच्या आणि प्रियजनांना शुभेच्छा पाठवा आणि प्रत्येकाच्या समृद्धीसाठी भगवान जगन्नाथाची प्रार्थना करा, त्याने समृद्धी प्राप्त होते, अशी भावना आहे.