संभाजीनगर : भारत राष्ट्र समितीचे (Bharat Rashtra Samiti) प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांची छत्रपती संभाजीनगर येथे जाहीरसभा झाली. त्यांनी महाराष्ट्रात तिसऱ्यांदा सभा घेतली. यामध्ये त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर विविध मुद्यांवर निशाणा साधला. ‘महाराष्ट्रात इतक्या नद्या तरीही सरकार त्यांना पाणी देऊ शकत नाही. महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आणि उद्योग बंद झाले’, असे त्यांनी म्हटले आहे.
के. चंद्रशेखर राव यांची संभाजीनगर येथे जाहीरसभा झाली. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘देशात रोज शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सरकारला काहीही गांभीर्य नाही. पंतप्रधानांनी आश्वासन दिलं तरीदेखील अजून त्यावर काहीही झालं नाही. देशात लोकशाही आहे तरीदेखील 13 महिने आंदोलन करावं लागतं. देशात मुबलक पाणी तरीही देश ताहनलेला आहे. देशाला परिवर्तनाची गरज आहे. परिवर्तनाशिवाय भारत पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे भारत राष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. जोपर्यंत भारतात परिवर्तन होणार नाही. तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहील.’
शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा
यावेळी केसीआर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ‘महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आणि उद्योग बंद झाले. सरकार आणि मुख्यमंत्र्यांमुळे जनतेला भोगावं लागत आहे. महाराष्ट्रात इतक्या नद्या तरीही सरकार त्यांना पाणी देऊ शकत नाही.
माजी खासदार राठोड यांचा बीआरएसमध्ये प्रवेश
यावेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत 40 नगरसेवकांनी प्रवेश केल्याचे म्हटले जात आहे.