कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त पदाची सूत्रे हातात घेताच इंदूरानी जाखड यांनी अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू केली आहे . या कारवाईचे मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वागत करत आयुक्त इंदूराणी जाखड यांचं अभिनंदन केलं तसेच येणाऱ्या काळात हा उत्साह आणि कामाचा वेग असाच टिकून राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त पदावर डॉ इंदुराणी जाखड यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्त पदाचे सूत्र ही महिलेच्या हातात गेली. त्यामुळे जाखड यांच्याकडून राजकीय नेत्यांवर नागरिकांच्या देखील अपेक्षा वाढल्या आहेत. आयुक्त पदाचे सूत्र हातात घेताच जाखड यांनी अनेक रखडलेल्या विकासकामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका लावला आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पाहता जाखड यांनी अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू केली आहे. आयुक्त जाखड यांच्या या कारवाईचे मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वागत करत त्यांचं ट्विट करत अभिनंदन केलं आहे.
#KDMC च्या अधिकाऱ्यांची मरगळ झटकून कामाचा सपाटा लावणाऱ्या नव्या आयुक्त इंदूराणी ह्यांचे मनापासून आभार. गेल्या ४ वर्षात निदान ४ आयुक्त बदलून गेले पण नव्या महिला आयुक्तांनी पदभार स्वीकारताच अतिक्रमणाच्या कारवाईला अखेर मुहूर्त मिळाला. येणाऱ्या काळात हा उत्साह आणि कामाचा वेग असाच…
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) November 24, 2023
काय आहे मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट
#KDMC च्या अधिकाऱ्यांची मरगळ झटकून कामाचा सपाटा लावणाऱ्या नव्या आयुक्त इंदूराणी जाखड ह्यांचे मनापासून आभार. गेल्या ४ वर्षात निदान ४ आयुक्त बदलून गेले पण नव्या महिला आयुक्तांनी पदभार स्वीकारताच अतिक्रमणाच्या कारवाईला अखेर मुहूर्त मिळाला. येणाऱ्या काळात हा उत्साह आणि कामाचा वेग असाच टिकून राहावा हीच आशा करतो.