कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत आणि परिसरात वाढत जाणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. कोंडीवडे या राज्यमार्ग रस्त्यावर शिरसे गावच्या हद्दीत निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.त्या रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही.त्यामुळे पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान या अनोख्या आंदोलनाची चर्चा सुरू झाली असून सार्वजनिक बांधकाम खात्यावर खड्डे भरण्यासाठी दबाव येत आहे.
Karjat News : नेरळ गावातील पुलाचा पाया खचला ; स्थानिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ
कर्जत तालुक्यातील कोंडीवडे कडे जाणाऱ्या रस्त्यावर शिरसे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहेत.त्या ठिकाणी निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होत असून वाहतूक कोंडीची समस्या तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी यांना अनेक अपघात झाले आहेत.त्यामुळे या रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे भरण्यात यावेत यासाठी पोलीस मित्र संघटना रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन करणार होती. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्याबाबत बांधकाम विभाग देखील सुस्त होता.त्यामुळे आधी जाहीर केलेल्या इशाऱ्यानुसार पोलीस मित्र संघटनेने शिरसे येथे अनोखे आंदोलन केले.
पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी सकाळ पासून पांढऱ्या शुभ्र कपड्यात रस्त्यावरील चिखलाने भरलेल्या खड्ड्यात बसून आंदोलन सुरू केले.त्या आंदोलनाबाबत जोरदार चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दशरथ मुने यांच्यासह स्थानिक वाहनचालक यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.त्यानंतर दुपारी सार्वजनिक बांधकाम विभाग कडून रस्त्यावरील खड्डे भरण्याची कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले होते.तर सायंकाळी प्रत्यक्ष खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे.
Matheran News : रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ; माथेरानच्या राणीचं रेल्वे फाटक अडकलं खड्ड्यात