" /> " /> " />
कर्जत / संतोष पेरणे : नेरळ माथेरान मिनी ट्रेन ही कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्याने पुढे जात असते.त्यामुळे मिनी ट्रेनचे मार्गावर नेरळ पेट्रोल पंप येथे असलेल्या फाटकाच्या जवळील डांबरीकरण निखळले आहे. त्यामुळे नेरळ कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर खड्ड्यांची रांगोळी दिसून येत आहे. कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ पेट्रोप पंप येथून नेरळ माथेरान मिनी ट्रेनचा जाण्याचा मार्ग आहे. 115 वर्षे जुन्या असलेल्या नेरळ माथेरान मिनी ट्रेन मार्गावर कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्ता बनल्यानंतर फाटक निर्माण झाले.
या रेल्वे मार्गावरून नेरळ माथेरान दरम्यान चालवल्या जाणाऱ्या मिनी ट्रेनच्या अगदी तुरळक फेऱ्या होत असतात. त्यामुळे कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर मिनी ट्रेनचा कोणताही अडथळा जाणवत नाही. मात्र त्या फाटकातील खड्डे हे वाहनचालक यांच्यासाठी दरवर्षी डोकेदुखी असते.दरवर्षी रेल्वे कडून कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील फाटक येथे डांबरीकरण केले जाते. मात्र डांबरीकरण चांगल्या दर्जाचे नसल्याने प्रचंड खड्डे पाऊस सुरू झाल्यानंतर काही दिवसातच निर्माण होतात.
नेरळ पेट्रोल पंप येथील फाटकातील खड्डे कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गासाठी डोकेदुखी बनले आहेत. या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मोठ्या आकाराचे खड्डे या ठिकाणी निर्माण झाल्याने गाड्या यात अडकून पडतात. रेल्वे कडून या भागात मलमपट्टी खड्डे भरण्यात आले मात्र पावसाची सर आली की पुन्हा तीच अवस्था निर्माण होत असून विकेंड चे दिवशी या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.त्यात नेरळ माथेरान मिनी ट्रेनचे फाटकातील रस्ता अत्यंत अरुंद असल्याने दोन वाहने तेथून ये जा करतात.
या फाटकाच्या दोन्ही बाजूला दोन पदरी रस्ता असल्याने त्याचा परिणाम फाटक येथे आल्यानंतर वाहनांना एकच रांग लावावी लागते.त्यामुळे देखील त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते,तर आता फाटकात निर्माण झालेल्या रस्त्यामुळे वाहनांसाठी हा रस्ता खड्ड्यांनी रोखण्याचे चित्र आहे.त्यामुळे वाहनचालक यांची गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वे आय डबलू आय विभागाकडून तत्काळ नवीन डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी मानवाधिकार संस्थेचे कार्यकर्ते गोरख शेप यांनी केली आहे.
सध्या पावासाळ्यात दिवसात अनेक पर्यटक माथेरान भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीकोनातून याचा विचार केला असता ही बाब अत्यंत दुर्देवाची आहे. त्यामुळे याचा मोठा फटका पर्यटन व्यवसायाला देखील होऊ शकतो. त्यामुळे प्रशासन याबाबत काय ठोस पाऊस उचलणार आहे, हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.