"वाल्मिक कराडने मला बाथरुम...., धनंजय मुंडेंवरही तीच वेळ येईल", करुणा शर्मांचा संताप (फोटो सौजन्य-X)
Karuna Sharma Munde News Marathi : वाल्मिक कराड याने मला काही महिन्यांपूर्वी बाथरूमला येईपर्यंत मारलं होतं. आता तुरुंगात सडत आहे. आयुष्यभर तुरुंगातच सडावं लागणार आहे. धनंजय मुंडेवरही तीच वेळ येणार असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे. लोकांच्या जमिनी बळकावण्याचा, महिलांवर अत्याचार करणे असो या सगळ्यांचे पुरावे मी देणार आहे. मी या विरोधात आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही करुणा शर्मा यांनी दिला आहे.
करुण शर्मा मुंडे यांनी गुरुवारी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मनातील खदखद व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांच्यासोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्यांच्याशीही चर्चा केली.माझ्या कारमध्ये कशाप्रकारे रिव्हॉल्व्हर ठेवण्यात आली. पोलिसांचा गैरवापर करत मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. अजित पवार गटात भ्रष्ट मंत्री असल्याचे सुप्रिया सुळेंना सांगितले असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले. पुण्यातील लोकांची जमीन धनजंय मुंडे खाल्ली असून त्यांना घेऊन सुप्रिया सुळेंची भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
करुणा शर्मा यांनी सांगितले की, वाल्मिकी कराड हे दोन पैशांची किंमत नसलेला गुंड आहे. त्याने मला 8 महिन्यांपूर्वी मारले होते. मला बाथरूमला येईपर्यंत तो मला मारत होता.या राजकारण्यांनी न्याय केला नाही पण देव न्याय करेल. वाल्मिकी कराडने मला मारून आठ महिने ही झाले नसतील आता तो तुरुंगात सडत आहे. त्याच्यासोबत लवकरच धनंजय मुंडेही तुरुंगात जाणार आहे. लोकांची जमीन हडपण्याचा प्रकार असो, महिलांवर अत्याचार करणे असो या सगळ्यांचे पुरावे मी देणार असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सनदी अधिकारी दीपा मुधोळ या जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीला वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे उपस्थित राहिले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी ते पाहिले होते. त्या ठिकाणी वाल्मिक कराडने मला सगळ्यांसमोर मारहाण केली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज धनंजय मुंडे यांच्यामुळे मला मिळाले नसल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला. मला हे सीसीटीव्ही फूटेज मिळाले पाहिजे अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली.