पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला (Lok Sabha Elections Result 2024) उत्सुकता ताणली गेली आहे. सकाळी आठला मतमोजणी सुरु झाली असून, आज सायंकाळपर्यंत बहुतांश निकालाचं चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी दिसत आहे. नंदूरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांचा विजय झाला.
महाविकास आघाडी सहा ठिकाणी आघाडीवर
पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी सहा ठिकाणी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आहेत. उत्तर मध्य मुंबईत उज्ज्वल निकम आघाडीवर आहेत. तसेच संजय दिना पाटील आघाडीवर आहेत. संभाजीनगरमधून चंद्रकात खैरे पिछाडीवर आहेत. तर इम्तियाज जलिल सध्या आघाडीवर आहेत. उत्तर मुंबईतून पियूष गोयल आघाडीवर आहेत. तर धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर आघाडीवर आहेत. याशिवाय, उत्तर पश्चिममधून रविंद्र वायकर आघाडीवर आहेत.
नंदूरबारमध्ये पाडवी विजयी
नंदूरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांचा विजय झाला असून, महाविकास आघाडीसाठी हे मोठं यश मानलं जातं. तर भाजपच्या हिना गावित यांचा पराभव झाला.
सातारा लोकसभेत शशिकांत शिंदेंची आघाडी
महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी पाहिला मिळत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात शशिकांत शिंदेंनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. तर भाजपचे उदयनराजे भोसले हे कमालीचे पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.
कल्याण लोकसभा
कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांनी दीड लाखांहून अधिक आघाडी घेतल्यानंतर डोंबिवलीत कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात बाराव्या फेरीतच दीड लाखाहून अधिक आघाडी घेतल्यानंतर डोंबिवली ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला आहे. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘एक खबर पक्की है, हॅट्रिक नक्की है’ अशी जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला आहे.
सोलापुरात प्रणिती शिंदे आघाडीवर
सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राम सातपुते हे पिछाडीवर आहेत.
विशाल पाटील यांच्या कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी
सांगली लोकसभेच्या निकालाची पाचवी फेरी जाहीर झाली असून, या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे 23,250 मतांनी आघाडीवर आहेत. प्रत्येक फेरीनिहाय विशाल पाटील हे आघाडीवर असल्याने त्यांच्या कार्यालयाबाहेर आता जल्लोष सुरू झाला आहे. फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे.
शिरूरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर
शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे हे आघाडीवर असून, त्यांनी 27 हजार मतांची आघाडी घेतल्याचे सांगितले जात आहे. तर शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.
ठाणे लोकसभा
नरेश म्हस्के यांना विधानसभानिहाय मिळालेला लीड (सहावी फेरी)
– मीरा भाईंदर – ८७७१
– ओवळा माजीवडा – २१३००
– ठाणे – १४५९५
– बेलापूर – ३०५९
– कोपरी पाचपाखडी – १००००
– ऐरोली – २०१०
बीड लोकसभा मतदारसंघ
बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत. त्या ठिकाणी बजरंग सोनावणे यांनी मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली. बीड लोकसभेत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी घेतल्याचे पाहिला मिळत आहे.
उज्ज्वल निकम आघाडीवर
उज्ज्वल निकम हे सध्या आघाडीवर आहेत. तर वर्षा गायकवाड या पिछाडीवर असल्याची माहिती दिली जात आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघ
अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा या आघाडीवर आहेत. नवनीत राणा यांनी 56 हजार मतांची आघाडी घेतली आहे.
मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत 32 हजार मतांनी आघाडीवर
अमरावती – नवनीत राणा मतांनी आघाडीवर
सातारा – उदयनराजे भोसले 795 मतांनी पिछाडीवर
नागपूर – नितीन गडकरी 47 हजार मतांनी आघाडीवर
बारामती – सुप्रिया सुळे 26 हजार मतांनी आघाडीवर
भिवंडीतून मविआचे बाळ्यामामा म्हात्रे 17 हजार मतांनी पुढे
रायगड – 15 व्या फेरीअखेर सुनील तटकरे यांना 44 हजार 429 मतांची आघाडी