चिपळूणमध्ये चोरीची घटना (फोटो- istockphoto)
गर्दीचा फायदा घेत चोरी; अज्ञातावर गुन्हा
पाच लाख हातोहात लंपास
चिपळूण स्टँडवरील धक्कादायक प्रकार
चिपळूण: येथील एस.टी. स्टैंड परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चिपळूण ते वीरबंदर जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये चढत असताना अज्ञात इसमाने एका प्रवाशाच्या सॅकमधून तब्बल पाच लाख रुपयांची रोख रक्कम लांबविल्याची घटना गुरुवारी (दि. ५ फेब्रुवारी) पावणेचारच्या सुमारास घडली. याबाचत प्रज्ञा प्रशांत हरेकर (वय ३८, व्यवसाय गृहिणी, रा. मुंडे तर्फे सावर्डे, पोरनाकवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चिपळूण एस.टी.स्टैंड येथे त्या चिपळूण ते वीरबंदर जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये चढत असताना, गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने सॅकमधील रोख रक्कम चोरून नेली.
रोकड लांबविली
या घटनेत ५०० रुपयांच्या १०० नोटांचे एक बंडल असे एकूण १० बंडल, म्हणजेच एकूण रोख रक्कम ५,००,००० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची नोंद रात्री १०.१५ वाजता करण्यात आली. घटनेनंतर पोलिसांनी एस.टी.स्टेंड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. एस.टी. स्टैंडसारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांनी मौल्यवान वस्तू व रोख रक्कम बाळगताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Crime News: शिक्षक की भक्षक! अल्पवयीन मुलीवर सतत ५ वर्षे अत्याचार अन्…; कुठे घडली घटना?
अल्पवयीन मुलीवर सतत ५ वर्षे अत्याचार
रत्नागिरी शहरात एका महाविद्यालयात नामांकित शिकवणाऱ्या शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीवर सतत पाच वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या नराधम शिक्षकाला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी ही केली जात आहे.
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर रत्नागिरी शहर पोलिस स्थानकत या प्रकरणी बॉक अंतर्गत संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महाविद्यालयातील शिक्षकाने त्याच महाविद्यालयातील या मुलीवर २०२१ पासून अत्याचार सुरू ठेवले होते. अत्याचार २०२६ जानेवारी पर्यंत सुरू होते. या पाच वर्षांच्या कालावधीत या नराधम शिक्षकाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






