चूक कोणाची? भरधाव ऑटो आणि दुचाकीची जोरदार धडक; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ऑटो चालक वेगाने जात आहे. सुरुवारतील सर्व काही सामान्य दिसत असून एका वळणाजवळ ऑटो येताच असे काही घडले की ऑटो पलटी झाली आहे. व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, रिक्षा जोरदार वेगात आहे. याच वेळी त्याच्याजवळून एक बाईक जात आहे. परंतु वळणावर अचानक रिक्षा रस्ता बदलत असताना बाईक मध्ये येते. ऑटोचा वेग जोरात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटते. ज्यामुळे ऑटो जोरात पलटी होते. दुचाकी स्वार मागे काय घडलं हे पाहतही नाही. त्याला काय घडलं हेही समजलेले नाही. परंतु ऑटो पलटी झाल्याने सर्व प्रवासी खाली पडले आहेत. तुम्ही पाहू शकता की लोक गंभीर जखमी झाले आहेत.
बाप रे! चीनमध्ये लोक मिरचीच्या पाण्यात मारतायत डुबक्या; VIDEO पाहून नेटकरी हैराण
व्हायरल व्हिडिओ
Caught on CCTV: Auto-rickshaw overturns while trying to save scooter rider on NH-55 in #Odisha, 5 injured. At least five people were injured after an auto-rickshaw overturned on National Highway 55 near Mangalpur on the outskirts of Jagatsinghpur. A scooter suddenly came from… pic.twitter.com/vV1eb2mRl6 — Sambad English (@Sambad_English) February 5, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Sambad_English या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर सध्या लोकांच्या चूक नेमकी कोणाची होती यावर चर्चा सुरु आहे. एका नेटकऱ्याने दुचाकी स्वार मध्ये आल्याने अपघात घडला असल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने रिक्षा चालकानेही वेग जरा कमी ठेवायला हवा होता असे म्हटले आहे.
वय तर फक्त एक आकडा! ९६ वर्षीय आजींचा भन्नाट डान्स; एनर्जी अशी की तरुणाईलाही लाजवेल, VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






