यामध्ये 68 लाख रुपये किंमतीची सुतळी बारदानमधील 34 किलो चांदी, 52 लाख रुपये किंमतीचे पांढऱ्या रंगाचे बारदानचे पॅकिंग असलेले पार्सल, त्यामधील २६ किलो चांदी, 2 लाख किमतीचे मशनरीचे स्पेअरपार्ट व 10 ग्रॅम सोने,10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, 5 हजार रुपये किंमतीचा काळ्या रंगाचा मोबाईल असा एकूण 1 कोटी 22लाख 15हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. पसार होताना चालकाला जीवे मारण्याची धमकी दिली.
भीतीने चालकाने गाडी सांगली जिल्ह्यातील कणेगाव याठिकाणी थांबऊन 112 क्रमांकावर घटनेची माहिती दिली, तत्काळ सांगली पोलिस बस जवळ पोहोचले, त्यांनी पेठवडगाव पोलिसांना माहिती दिली. बसमध्ये असणारे प्रवासी दुसऱ्या बसने मुंबईला पाठवून ती बस पेठवडगाव पोलिस ठाण्यात आणण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिस स्टेशनचे पथक, गुन्हेशोध पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहेत.
एकीकडे कोल्हापूर तर दुसरीकडे जावळीमध्ये देखील दरोडेखोरांनी एका महिलेला लुटण्याचा प्रयत्न केला. जावळी तालुक्यातील कुडाळ परिसरात सोमवारी मध्यरात्री सात ते आठ दरोडेखोरांनी सशख दरोड्याचा प्रयत्न केला. दरवाजा तोडण्यास विरोध करताना दरोडेखोरांनी महिलेवर चाकूने वार केला. यात महिला गंभीर जखमी झाली. धनश्री कदम असे त्यांचे नाव आहे. सोमवारी रात्री कुडाळजवळील पुनर्वसित पानस गावात दरोडेखोरांनी बंद घर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच हाती न लागल्याने त्यांनी कुडाळचे उपसरपंच सोमनाथ कदम यांच्या शेतातील घरात चोरीचा प्रयत्न केला. तेथेही अपयश आल्याने त्यांनी तानाजी कदम यांच्या घराकडे मोर्चा वळवला. घरात तानाजी कदम, त्यांची पत्नी धनश्री आणि मुलगी होती.
दरोडेखोरांनी लाथा मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. दरवाजा कोसळण्याच्या बेतात असतानाच तानाजी कदम यांच्या पत्नी धनश्री यांनी तो रोखला. याचवेळी तानाजी कदम यांनी स्वसंरक्षणासाठी हातात फावडे घेतले. हे पाहून दरोडेखोरांनी थेट धनश्री यांच्यावरच हल्ला चढवत हातावर चाकूने वार केले. याचवेळी तानाजी कदम यांच्या मुलीने शेजाऱ्यांना फोन करून मदतीसाठी बोलावल्याचे दरोडेखोरांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
Ans: सोमवारी (दि. 22) मध्यरात्रीच्या सुमारास किणी (ता. हातकणंगले) गावच्या हद्दीत कोल्हापूर–भायखळा, मुंबई जाणाऱ्या अशोका ट्रॅव्हल्सच्या खासगी आराम बसवर दरोडा टाकण्यात आला.
Ans: तावडे हॉटेल येथे प्रवासी म्हणून तीन जण बसमध्ये चढले. पुढे किणी हद्दीत बस मागून आलेल्या साथीदारांच्या मदतीने त्यांनी चाकू व कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकला.
Ans: भीतीने चालकाने सांगली जिल्ह्यातील कणेगाव येथे बस थांबवून 112 क्रमांकावर माहिती दिली. सांगली व पेठवडगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी व पोलिस ठाण्यात कारवाई सुरू केली. गुन्हेशोध पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.






