फोटो सौजन्य- प्रतिनिधी
सावन वैश्य/ नवी मुंबई :- आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बांगलादेशींचा विळखा पडला आहे. अनधिकृतपणे घुसखोरी करून राहणाऱ्या या बांगलादेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमामात अवैध धंदे केले जात आहेत. गुन्हेगारी कृत्यांमध्ये त्यांचा वावर वाढला असल्याने गुन्हेगारीत वाढ झाली आहे. या परिसरात गांजा, गुटखा, दारुच्या अवैध विक्रीसह खंडणी, चोरी, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी देखील सापडले आहेत. आतापर्यंत बांगलादेशी नागरिकांचे आश्रयस्थान असलेल्या मार्केटमध्ये काही वर्षांपूर्वी गाडीमधून स्फोट घडवून आणण्यात आला होता. बाहेरील गुंडानी येऊन व्यापाऱ्याला मारहाण केली होती. पण यानंतरही येथील सुरक्षा व्यवस्थेमध्ये आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामध्ये काहीही फरक पडलेला नाही, असेच दिसून येत आहे. मुख्य म्हणजे व्यापाऱ्यांकडून या बांगलादेशी नागरीकांना कामगार म्हणून रोजगार दिला जात असून, त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मूळ माथाडी कामगारांचे रोजगार देखील पळवले जात आहेत.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठेत कांदा – बटाटा मार्केट, मसाला मार्केट, धान्य मार्केट, तसेच भाजी व फळ मार्केटचा समावेश आहे. देशभराच्या विविध कानाकोपऱ्यातून या एपीएमसी मार्केटमध्ये माल येतो, व आलेला माल नवी मुंबई, मुंबईला तसेच आसपासच्या भागात वितरित केला जातो. एपीएमसीमधील या बाजारात विशेषतः फळ बाजारात बांगलादेशी नागरिक मोठ्याप्रमाणात वास्तव्य करत आहेत. याबाबतची धोक्याची सूचना माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर माथाडी मेळाव्यात व्यक्त केली होती. या बांगलादेशी नागरिकांमुळे गुन्हेगारी वाढीस लागली असून, दिवसभर एपीएमसीत काम करून रात्री चोऱ्या देखील केल्या जात आहेत. तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाला याबाबत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी अनेकदा पत्रव्यवहार करून कळवले देखील होते. मात्र यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचं पाटील यांनी दैनिक नवराष्ट्रशी बोलताना सांगिले
भविष्यात घडणाऱ्या घटनेला जबाबदार कोण ?
एपीएमसीतील या फळ बाजारात देशातील विविध भागातून माल येतो. व विविध ठिकाणी विक्रीसाठी पाठवला जातो. मालाच्या या देवाणघेवाणीच्या आड समाज अहिताची कृती घडवून एखादी अप्रिय घटना घडली तर याला जबाबदार कोण ? कारण गाळा धारक अश्या बांगलादेशी नागरिकांची कोणतीही शाहानिशा न करता त्यांना कामगार म्हणून ठेवत आहेत.पोलीस प्रशासनाने सदर ठिकाणी छापा मारून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना तात्काळ अटक करावी तसेच त्यांना वास्तव्य करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या गाळा धारकांवर देखील कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
याबद्दल बोलताना माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, एपीएमसी बाजार पेठेत विशेषतः फळ बाजारात अनधिकृत बांगलादेशी वास्तव्य करत आहेत. 25 सप्टेंबर ला याबाबत मी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर माथाडी मेळाव्यात भाष्यता करत चिंता व्यक्त केली होती. तसेच एपीएमसी प्रशसनाला देखील याबाबत पत्रव्यवहार करून कल्पना दिली होती. मात्र त्यावर अजून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे लवकरच बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात एक मोठं जन आंदोलन फळ बाजारात घेणार आहोत.
अनधिकृतपणे घुसखोरी करून राहणाऱ्या या बांगलादेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमामात अवैध धंदे केले जात आहेत. गुन्हेगारी कृत्यांमध्ये त्यांचा वावर वाढला असल्याने गुन