Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Top Live Stories India- मंगळवारी, अमेरिका-इराण युद्धातील तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली आणि बेंचमार्क निफ्टी ५० २२,९०० च्या पातळीच्या वर बंद झाला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 25, 2026 | 12:08 PM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:
  • 25 Mar 2026 12:08 PM (IST)

    25 Mar 2026 12:08 PM (IST)

    प्रवाशांनो आता बिनधास्त फिरा!

     पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून, सध्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रत्येक प्रवाशाची आणि त्यांच्या सामानाची तपासणी करूनच आत प्रवेश दिला जात आहे. ही व्यवस्था सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असून पुणे रेल्वे स्टेशनवर दुहेरी गेट प्रणाली राबविली जाणार आहे.एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे.

  • 25 Mar 2026 11:55 AM (IST)

    25 Mar 2026 11:55 AM (IST)

    ट्रम्पची खोड जिरवणार इराण! जेडी व्हान्स पाकिस्तानात पोहोचण्यापूर्वीच उभा केला ‘

    जग ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता जवळ आला आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स (JD Vance) शांतता चर्चेसाठी पाकिस्तानला रवाना होत आहेत. मात्र, त्यांच्या विमानाने पाकिस्तानात लँडिंग करण्यापूर्वीच इराणने (Iran) अशा अटी मांडल्या आहेत, ज्या वाचून व्हाईट हाऊसमध्ये खळबळ उडाली आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, केवळ युद्ध संपवणे पुरेसे नाही; तर अमेरिकेला आता विनाशाची किंमत मोजावी लागेल. या अटी म्हणजे शांततेचा प्रस्ताव नसून अमेरिकेला झुकवण्याचा प्रयत्न असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

  • 25 Mar 2026 11:45 AM (IST)

    25 Mar 2026 11:45 AM (IST)

    Meta Platforms ला मोठा झटका; अमेरिकन न्यायालयाकडून ३७५ दशलक्ष डॉलर दंड

    सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘मेटा’ (Meta) जी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मूळ कंपनी आहे. सध्या एका गंभीर कायदेशीर संकटाचा सामना करत आहे. अमेरिकेतील ‘न्यू मेक्सिको’ राज्याच्या एका ज्युरीने एका ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निकालाद्वारे, या कंपनीवर ३७५ दशलक्ष डॉलर्सचा (सुमारे ३,१०० कोटी रुपये) प्रचंड मोठा दंड ठोठावला आहे.

  • 25 Mar 2026 11:35 AM (IST)

    25 Mar 2026 11:35 AM (IST)

    OnePlus चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! डिझाईन आणि फीचर्स आहेत टॉपक्लास

    टेक कंपनी वनप्लसने मंगळवारी चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीच्या फ्लॅगशिप लाईनअपमधील सर्वात लेटेस्ट एडीशन OnePlus 15T या नावाने लाँच करण्यात आले आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 सीरीजचा चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन प्रिमियम रेंजमध्ये लाँच केला आहे. या डिव्हाईचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील दमदार आहेत.

  • 25 Mar 2026 11:25 AM (IST)

    25 Mar 2026 11:25 AM (IST)

    पुण्यात मेट्रो लाईनच्या बोगद्याला छिद्र ! घरासाठी बोअरवेल घेताना घडला प्रकार

    शहरात मेट्रो प्रकल्पाच्या कामाला वेग आलेला असताना एक सुरक्षिततेबाबत गंभीर बाबसमोर आली असून, भूमिगत मेट्रो बोगद्यावर बोअरवेल घेताना बोगद्यावर खड्डा पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी संबंधित घरमालक व ठेकेदारावर गुन्हा नोंद केला आहे.

    याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात धनंजय मोटे व ठेकेदार जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापक शंतनु गोरात्रा यांनी तक्रार दाखल केली आहे. दि. १४ मार्च रोजी ही घटना घडली असून, हा प्रकार समोर आल्यानंतर सोमवारी याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.

  • 25 Mar 2026 11:14 AM (IST)

    25 Mar 2026 11:14 AM (IST)

    Operation Searchlight’चा तो भयानक इतिहास! बांगलादेशने पाकिस्तानला का सुनावलं

    इतिहासाच्या पानात काही तारखा अशा असतात ज्या विसरणे कोणत्याही राष्ट्राला अशक्य असते. बांगलादेशसाठी २५ मार्च हा असाच एक दिवस आहे ‘नरसंहार दिन’ (Genocide Day). १९७१ च्या याच दिवशी पाकिस्तानी लष्कराने मानवतेला काळिमा फासणारे ‘ऑपरेशन सर्चलाइट’ राबवले होते. आज, इतक्या वर्षांनंतर बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी या जखमा पुन्हा ताज्या केल्या असून, पाकिस्तानच्या क्रूरतेचा पाढा जगासमोर वाचला आहे. त्यांच्या या विधानामुळे दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा नवे वारे वाहू लागले आहेत.

  • 25 Mar 2026 10:55 AM (IST)

    25 Mar 2026 10:55 AM (IST)

    पोलिस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनावर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

    मुंबई : साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. त्या आदेशावरूनच राजकारण तापले आहे. असे असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आदेशावरून महत्त्वपूर्ण विधान केले. ‘सभापती आपल्या अधिकारात आदेश देऊ शकतात. मात्र, त्यांचा आदेश म्हणजे ‘ब्रह्मवाक्य’ नाही’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर आणि घटनात्मक पेचप्रसंगावर भाष्य केले.

  • 25 Mar 2026 10:45 AM (IST)

    25 Mar 2026 10:45 AM (IST)

    आता ‘दलदली’तून बाहेर पडायची वेळी संपली…; इराणचा डोनाल्ड ट्रम्प ‘आरपार’चा इशारा

    Iran’s Threat To Donald Trump : वॉशिंग्टन/तेहरान : पश्चिम आशियातील तणाव आता नियंत्रणाबाहेर गेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतरही इस्रायलचे इराणवर तीव्र हल्ले सुरुच आहेत. यामुळे इराण चवताळला असून त्यांनी ट्रम्प यांचा 5 दिवसांचा युद्धविराम नाकारला आहे. तसेच अमेरिकेने पाठवलेल्या 15 कलमी प्रस्तावलाही नकार दिला आहे. इराणने थेट डोनाल्ड ट्रम्प यांना युद्धाची अंतिम चिथावणी दिली आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ स्पष्ट केले आहे.

  • 25 Mar 2026 10:35 AM (IST)

    25 Mar 2026 10:35 AM (IST)

    ‘आम्ही जिंकलो!’ तेहरानच्या आकाशात अमेरिकन विमानांची गर्जना

    Donald Trump Iran War Victory Claim : जागतिक राजकारणात आज एक मोठा भूकंप झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-अमेरिका संघर्षात (US-Israel Iran War) आता अमेरिकेने आपला विजय जाहीर केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका जाहीर कार्यक्रमात स्पष्ट केले की, इराण आता लष्करीदृष्ट्या पूर्णपणे संपला आहे. गृह सुरक्षा सचिवांच्या शपथविधी सोहळ्यात बोलताना ट्रम्प यांनी जे विधान केले, त्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. “आम्ही हे युद्ध जिंकलो आहोत,” या ट्रम्प यांच्या वाक्याने मध्य-पूर्वेतील युद्धाचे चित्रच बदलून टाकले आहे.

  • 25 Mar 2026 10:25 AM (IST)

    25 Mar 2026 10:25 AM (IST)

    मोफत मिळणार व्हॅम्पायर बॅकपॅक आणि गोल्ड

    गेममध्ये सध्या बाइंड योर अकाऊंट ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना व्हॅम्पायर बॅकपॅक आणि 999 गोल्ड मोफत जिंकण्याची संधी मिळणार आहे. हे दोन्ही रिवॉर्ड्स टास्क पूर्ण प्लेअर्स क्लेम करू शकणार आहेत. गरेनाचं असं म्हणणं आहे की, या प्रकारच्या ईव्हेंटमध्ये डायमंड्सची बचत होते आणि प्लेअर्स विविध रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात.

  • 25 Mar 2026 10:15 AM (IST)

    25 Mar 2026 10:15 AM (IST)

    त्वचेसाठी बटाटा ठरेल वरदान!

    बटाटा त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर मानला जातो. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करते. चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग किंवा पिंपल्स कमी करण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसाचा वापर करू शकता. यामध्ये असलेले विटामिन सी, अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक त्वचा उजळदार करण्यास मदत करतात. त्वचेचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करावा. यामध्ये असलेले नैसर्गिक एन्झाइम्स आणि स्टार्च त्वचेला आतून थंडावा देतात. उन्हामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ, लालसरपणा आणि रॅश कमी करण्यासाठी बटाट्याचा रस अतिशय प्रभावी ठरतो. यामध्ये असलेले नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यास मदत करते.

  • 25 Mar 2026 10:05 AM (IST)

    25 Mar 2026 10:05 AM (IST)

    PCMC Budget चा धमाका! ९७३६ कोटींचा अर्थसंकल्प सादर

    PCMC Budget 2026-27: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या ९३२२.१७ कोटी रुपयांच्या मूळ अर्थसंकल्पात स्थायी समितीने ४१४.२२ कोटी रुपयांची महत्त्वपूर्ण वाढ सुचविली आहे. जुन्या कामांसाठी १३०० कोटी आणि नवीन कामांसाठी २०० कोटींची तरतूद असलेला हा अर्थसंकल्प आता महापालिका सभेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वांगीण विकासाचा दावा करत असला, तरी धकीत ६२२ कोटींचा मालमत्ता कर वसूल करणे आणि वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे.

  • 25 Mar 2026 09:51 AM (IST)

    25 Mar 2026 09:51 AM (IST)

    नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु

    पुणे : पुणे येथील नवले पुलावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपयांचा एलिव्हेटेड रोड प्रकल्प केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत सांगितले. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी नवले पुलावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांबाबत तसेच ते रोखण्याबाबत सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. संबंधित राष्ट्रीय महामार्गाचा सुमारे पाच ते सहा किलोमीटरचा भाग तांत्रिकदृष्ट्या संवेदनशील आहे. रस्त्याचा उतार अत्यंत तीव्र नसला तरी ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण आहे. पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून एलिव्हेटेड रोड उभारणे आवश्यक आहे, असे कदम म्हणाले.

  • 25 Mar 2026 09:35 AM (IST)

    25 Mar 2026 09:35 AM (IST)

    भोंदू खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना दुसरा मोठा धक्का 

    अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात याच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे रुपाली चाकणकर यांना आधीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    पक्षांतर्गत नाराजी आणि उचलबांगडीचे संकेत रुपाली चाकणकर यांच्याकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) महिला प्रदेशाध्यक्षपद आहे. मात्र, खरात प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा डागाळल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेतूनच चाकणकर यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. "अशा प्रकरणांमुळे पक्षाला जनतेसमोर जाणे कठीण होत आहे," अशी भूमिका अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

  • 25 Mar 2026 09:30 AM (IST)

    25 Mar 2026 09:30 AM (IST)

    राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीला मिळाले नवीन मालक

    मुंबई: क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत लीग असलेल्या आयपीएलमध्ये दोन दिग्गज संघांच्या मालकीमध्ये मोठे बदल झाले आहेत. राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी या दोन्ही संघांना आता जागतिक स्तरावरील मोठे उद्योजक आणि कंपन्यांनी विकत घेतले आहे. राजस्थान रॉयल्स (RR): अमेरिकन उद्योजकाचा ताबा राजस्थान रॉयल्स या संघाची विक्री पूर्ण झाली असून, अमेरिकन उद्योजक कल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाने हा संघ विकत घेतला आहे. १.६३ अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे १५,२८६ कोटी रुपये) इतकी आहे.  या व्यवहारामुळे राजस्थान रॉयल्स ही आता आयपीएलमधील अत्यंत मौल्यवान फ्रँचायझी बनली आहे.

  • 25 Mar 2026 09:25 AM (IST)

    25 Mar 2026 09:25 AM (IST)

    भोंदू अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी 

    नाशिक: अंधश्रद्धेचा बाजार मांडून अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या 'कॅप्टन' अशोक खरातला नाशिक सत्र न्यायालयाने २९ मार्चपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. २४ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालेली धक्कादायक माहिती न्यायालयासमोर मांडली.

    पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली की, तपासादरम्यान खरातने केवळ नाशिकच नव्हे, तर राज्याच्या इतर भागांतील महिलांचीही फसवणूक केल्याचे धागेदोरे हाती लागले आहेत. ज्योतिषविद्या आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली त्याने गोळा केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा आणि संशयास्पद बँक व्यवहारांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अधिक कोठडीची मागणी केली होती

  • 25 Mar 2026 09:20 AM (IST)

    25 Mar 2026 09:20 AM (IST)

    अंकशास्त्र शिकवणारा  'कॅप्टन' अशोक खरात स्वतःच गणितात नापास 

    लोकांना ग्रहांची चाल आणि अंकांची किमया सांगून फसवणाऱ्या अशोक खरातचे शैक्षणिक वास्तव आता समोर आले आहे. सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथील रहिवासी असलेला आणि वावी येथील माध्यमिक शाळेचा विद्यार्थी असलेल्या खरातचा धाकधूक वाढवणारा निकाल आता सार्वजनिक झाला आहे. गुणपत्रिकेतील धक्कादायक वास्तव: अशोक खरात हा दहावीच्या परीक्षेत दोन विषयांत नापास झाला होता. विशेष म्हणजे, ज्या अंकशास्त्राच्या जोरावर तो लोकांची फसवणूक करायचा, त्याच गणित विषयात त्याला केवळ २८ गुण मिळाले होते. त्याच्या गुणपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

  • 25 Mar 2026 09:10 AM (IST)

    25 Mar 2026 09:10 AM (IST)

    पोलिस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनावर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

    मुंबई : साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. त्या आदेशावरूनच राजकारण तापले आहे. असे असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आदेशावरून महत्त्वपूर्ण विधान केले. ‘सभापती आपल्या अधिकारात आदेश देऊ शकतात. मात्र, त्यांचा आदेश म्हणजे ‘ब्रह्मवाक्य’ नाही’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर आणि घटनात्मक पेचप्रसंगावर भाष्य केले. वाचा सविस्तर- 

  • 25 Mar 2026 09:05 AM (IST)

    25 Mar 2026 09:05 AM (IST)

    Tech Tips: YouTube चॅनेलचे नावच ठरवणार व्ह्युज आणि सबस्क्रायबर्स

    तुम्ही देखील युट्युब चॅनेल सुरू करण्याचा विचार करताय का? तुमच्या यूट्यूब चॅनेलचे संपूर्ण भवितव्य चॅनेलच्या नावावर अवलंबून असते. यासाठीच तुमच्या चॅनेलचे नाव अत्यंत प्रभावी असणे गरजेचे आहे. अनेक युट्यूबर्सची ओळख त्यांच्या चॅनेलचे नावच आहे. कारण लोकं तुमच्या चेहऱ्यापेक्षा जास्त तुमच्या चॅनेलचे नाव लक्षात ठेवता. यामुळे तुम्ही जर यूट्यूब चॅनेल सुरू करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्या चॅनेलचे नाव काय असावे यामध्ये तुम्ही गोंधळले असाल तर सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या चॅनेलचे नाव अतिशय सोपे आणि लोकांना समजेल असे असले पाहिजे. यामुळे युजर्सना समजेल की त्यांना तुमच्या चॅनेलवर कोणत्या प्रकाराचा कंटेंट पाहायला मिळणार आहे. तुमच्या चॅनेलचे नाव नक्की कसे असले पाहिजे, याबाबत आता आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत.

Maharashtra to World Breaking News:

Stock Market Today: ल्युपिन लिमिटेड आणि टेक महिंद्रासह आज ‘हे’ शेअर्स पालटणार तुमचं नशिब

India Share Market Update: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील इराणमध्ये सुरु असलेले युद्ध पाच दिवसांसाठी थांबल्याची घोषण केली आहे. तसेच याबाबत वरिष्ठ नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा सुरु असल्याची असल्याचे देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. याचाच सकारात्मक परिणाम आता शेअर बाजारावर देखील होत आहे. जागतिक बाजारातील तेजीच्या अनुषंगाने भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, बुधवारी वाढीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास १९२ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २३,१२० च्या पातळीवर व्यवहार करत होता.

 

 

Web Title: Maharashtra breaking news 25st march live updates maharashtra politics national international politics crime viral video sports world war3 share market gold rate breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Minor Girls Missing: अल्पवयीन मुलींच्या अपहरणात चिंताजनक वाढ; विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक
1

Minor Girls Missing: अल्पवयीन मुलींच्या अपहरणात चिंताजनक वाढ; विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक

पोलिस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनावर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘सभापतींचा आदेश म्हणजे…’
2

पोलिस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनावर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘सभापतींचा आदेश म्हणजे…’

Satara Politics: मराठा आरक्षण लाठीमार ते सातारा राडा! कोण आहेत आयपीएस तुषार दोशी?
3

Satara Politics: मराठा आरक्षण लाठीमार ते सातारा राडा! कोण आहेत आयपीएस तुषार दोशी?

दापोलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश; योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ‘धनुष्यबाण’ हाती
4

दापोलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश; योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ‘धनुष्यबाण’ हाती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.