
Maharashtra breaking News Marathi
19 Jan 2026 12:25 PM (IST)
ऑस्ट्रेलियन संघाने आता या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. २०२६ च्या टी२० विश्वचषक संघातील फक्त १० खेळाडू खेळणार आहेत. या मालिकेत पाच स्टार खेळाडू दिसणार नाहीत.
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, महली बियर्डमन, कूपर कॉनोली, बेन द्वारशुइस, जॅक एडवर्ड्स, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, जोश फिलिप, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, अॅडम झांपा.
19 Jan 2026 12:20 PM (IST)
वसईत लग्नाचा खोटा भास निर्माण करून अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मंदिरात मंगळसूत्र बांधून फसवणूक केली. नायगाव पोलिसांनी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
19 Jan 2026 12:15 PM (IST)
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये कोणताही चर्चा झालेली नाही. भाजप आणि ठाकरेंमधील चर्चा सुरू असल्याच्या बातम्या या केवळ अफवा आहेत. कुणाला महापौर करायचं हे भाजप आणि गौतम अदानी ठरवतील.
19 Jan 2026 12:10 PM (IST)
धाराशिव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिव शहरातील बेगडा शिवारात एका ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेनऊच्या सुमारास घडली आहे. धनंजय तात्याराव राउत (३८ वर्षे, रा. एसटी कॉलनी, सांजा रोड, धाराशिव) असे मयताचे नाव आहे.
19 Jan 2026 12:05 PM (IST)
मध्य रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली. 26 जानेवारीपासून मुंबई लोकलच्या हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दोन नवीन एसी लोकल चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकल प्रवास आणखी गारेगार होणार आहे.
19 Jan 2026 12:00 PM (IST)
चंद्रपूरकरांना दिवसेंदिवस प्रदूषण, वाढती वाहतूक समस्या, तुंबलेले गटार अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. या समस्यांवर उपाययोजनांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तब्बल ४९ नव्या चेहऱ्यांना निवडून देण्यात आले आहे. त्यामुळे आता नवनियुक्त नगरसेवकांकडून विकासाच्या व शहरातील बदलाच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत.
19 Jan 2026 11:51 AM (IST)
गायक अरमान मलिकने नुकतेच सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याच्या हातात ड्रिप असल्याचे दिसून आले आहे. ते पाहून चाहते घाबरलेले दिसत आहेत आणि त्यांनी गायकाला काय झाले आहे असे विचारण्यास सुरुवात केली. अरमानने त्याच्या आरोग्याची माहिती दिली, परंतु त्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले हे स्पष्ट केले नाही. अरमानने सांगितले की गेल्या काही दिवस त्याच्यासाठी कठीण गेले आहेत. त्याची तब्येत खराब होती. परंतु, तो आता बरा होत आहे. अरमान मलिक लवकर बरे होण्यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.
19 Jan 2026 11:41 AM (IST)
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, अनेक प्रमुख नेते व पदाधिकारी विविध गुन्ह्यांमध्ये अडकले असल्याने जिल्ह्यात सध्या मोठा राजकीय संभ्रम निर्माण झाला आहे. तटकरे-गोगावले संघर्ष अधिक तीव्र झाला असून महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या हाणामारीनंतर शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत ऊर्फ नाना जगताप, सुशांत जाबरे, श्रीयश जगताप यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आरोपी म्हणून करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे.
19 Jan 2026 11:31 AM (IST)
चिलीमध्ये नैसर्गिक आपत्तीने कहर केला आहे. चिलीच्या मध्य आणि दक्षिण भागातील जंगलाला भीषण आग लागली आहे. या आगीत 18 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त मिळाले आहे. तसेच या आगीमुळे हजारो एकर जंगल आणि शेकडो घरे जळून खाक झाली आहेत. आगाच्या ज्वाळा तीव्र झाल्या आहेत. तसेच उष्णतेमुळे उच्च तापमानाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. या आगीचे भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
19 Jan 2026 11:21 AM (IST)
गोव्यातून एक धक्कदायक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी गोव्यात एका रशियन महिलेचा मृतदेह आढळून आला होता. हात पाय बांधलेले आणि गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात ३७ वर्षीय अलेक्सी लियोनोव याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याने यावेळी एक नाही तर दोन महिलांची हत्या केल्याची कबुली दिली.
19 Jan 2026 10:55 AM (IST)
Share market today: आंतरराष्ट्रीय व्यापारातील वाढत्या जोखमीमुळे आणि 'टॅरिफ टेन्ट्रम्स'च्या भीतीमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात कमकुवत झाली. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी ५० (NSE Nifty 50) या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी लाल रंगात व्यवहार सुरू केला.
सकाळी ९:१७ च्या सुमारास सेन्सेक्स ३५२.३५ अंकांच्या घसरणीसह ८३,२१८.०० वर, तर निफ्टी १०९.१५ अंकांच्या घसरणीसह २५,५८५.२० वर व्यवहार करत होता. देशांतर्गत महत्त्वाच्या सकारात्मक घडामोडींचा अभाव आणि जागतिक व्यापार तणावाचा परिणाम गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर झाल्याचे दिसून आले.
19 Jan 2026 10:47 AM (IST)
छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात बिजापूरच्या जंगलात मोठी चकमक झाली. सुरक्षा दलांनी 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये कॅडर आणि बक्षीस असलेल्यांसा समावेश आहे.
19 Jan 2026 10:43 AM (IST)
Earthquake in Delhi-NCR: दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवलेले हे भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. एकाच आठवड्यात दोनदा अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाची खोली केवळ ५ किमी होती. सामान्यतः भूकंपाचे केंद्र जमिनीच्या जितके जवळ असते, तितके त्याचे धक्के अधिक तीव्रतेने जाणवतात. २.८ तीव्रता हानीकारक नसली, तरी दाट लोकवस्तीच्या भागात यामुळे इमारतींना सौम्य कंपने जाणवली, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
19 Jan 2026 10:40 AM (IST)
गायक अरमान मलिकने नुकतेच सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याच्या हातात ड्रिप असल्याचे दिसून आले आहे. ते पाहून चाहते घाबरलेले दिसत आहेत आणि त्यांनी गायकाला काय झाले आहे असे विचारण्यास सुरुवात केली. अरमानने त्याच्या आरोग्याची माहिती दिली, परंतु त्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले हे स्पष्ट केले नाही. अरमानने सांगितले की गेल्या काही दिवस त्याच्यासाठी कठीण गेले आहेत. त्याची तब्येत खराब होती. परंतु, तो आता बरा होत आहे. अरमान मलिक लवकर बरे होण्यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.
19 Jan 2026 10:32 AM (IST)
चिलीमध्ये नैसर्गिक आपत्तीने कहर केला आहे. चिलीच्या मध्य आणि दक्षिण भागातील जंगलाला भीषण आग लागली आहे. या आगीत 18 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त मिळाले आहे. तसेच या आगीमुळे हजारो एकर जंगल आणि शेकडो घरे जळून खाक झाली आहेत. आगाच्या ज्वाळा तीव्र झाल्या आहेत. तसेच उष्णतेमुळे उच्च तापमानाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. या आगीचे भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
19 Jan 2026 10:23 AM (IST)
गोव्यातून एक धक्कदायक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी गोव्यात एका रशियन महिलेचा मृतदेह आढळून आला होता. हात पाय बांधलेले आणि गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात ३७ वर्षीय अलेक्सी लियोनोव याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याने यावेळी एक नाही तर दोन महिलांची हत्या केल्याची कबुली दिली.
19 Jan 2026 10:18 AM (IST)
अंडर-१९ विश्वचषक अपडेटेड पॉइंट्स टेबल: अफगाणिस्तानने अंडर-१९ विश्वचषक २०२६ मध्ये आणखी एक मोठा अपसेट निर्माण केला, यावेळी त्यांनी वेस्ट इंडिजचा पराभव केला. अफगाणिस्तान संघ या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा २८ धावांनी पराभव केला. आता त्यांच्या दुसऱ्या सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिजचा १३८ धावांनी पराभव केला. अफगाणिस्तान सुपर-६ मध्ये स्थान मिळवण्याच्या मार्गावर आहे, अशा परिस्थितीत वेस्ट इंडिज किंवा दक्षिण आफ्रिका यापैकी एकही संघ त्यांच्या गटातून बाहेर पडू शकतो.
19 Jan 2026 09:59 AM (IST)
India Share Market Update: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ प्लॅनबाबत केलेल्या वक्तव्यांचा परिणाम जागतिक बाजारावर होत आहे. कमकुवत जागतिक बाजारातील संकेत लक्षात घेता, भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सोमवारी १९ जानेवारी रोजी नकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-डाउनची सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,५७१ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १८० अंकांनी कमी होता.
19 Jan 2026 09:50 AM (IST)
भारतात 19 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,377 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,179 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,783 रुपये आहे. भारतात 19 जानेवारी रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,31,790 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,43,770 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,07,830 रुपये आहे. भारतात 19 जानेवारी रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 294.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,94,900 रुपये आहे.
19 Jan 2026 09:40 AM (IST)
पुणे: पुणे शहरात १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांलगत असलेल्या शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी निर्गमित केला आहे. त्यानिमित वाहूतकीसाठी काही प्रमुख रस्ते बंद असणार आहेत.
19 Jan 2026 09:35 AM (IST)
पुणे: पुणे शहरात १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांलगत असलेल्या शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी निर्गमित केला आहे. त्यानिमित वाहतुकीसाठी काही प्रमुख रस्ते बंद असणार आहेत. वाचा सविस्तर-
19 Jan 2026 09:30 AM (IST)
१६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या निकालांनुसार, नागपूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने (BJP) बहुमत मिळवून आपली सत्ता राखली असली, तरी AIMIM ने ६ जागा जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.फहीम खान यांच्या पत्नी, अलीशा खान यांनी प्रभाग क्रमांक ३ मधून मोठा विजय मिळवला आहे.भाजपला १०२ जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला ३५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
फहीम खान यांनी त्यांच्या घरावरील कारवाई आणि अटकेचा संदर्भ देत सत्ताधारी पक्षावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. "तुम्ही एक घर तोडाल, तर मुस्लिमांमध्ये १०० नेते निर्माण कराल," असे म्हणत त्यांनी सरकारला आव्हान दिले आहे. जर चुकीच्या पद्धतीने कारवाया सुरूच राहिल्या, तर आज जो पक्ष केवळ दोन प्रभागातून बाहेर पडला आहे, तो भविष्यात संपूर्ण शहरातून साफ होईल, असा इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्रात "बुलडोझर राजकारण" खपवून घेतले जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
19 Jan 2026 09:25 AM (IST)
एसबीआयने डिजिटल चॅनेलद्वारे (YONO, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग) केल्या जाणाऱ्या IMPS व्यवहारांवर पहिल्यांदाच शुल्क लागू केले आहे. बँकेच्या शाखेतून (Branch) केल्या जाणाऱ्या IMPS व्यवहारांच्या शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही (ते ₹२ ते ₹२० दरम्यान आहेत).
| व्यवहाराची रक्कम | नवीन शुल्क (अधिक GST) |
| ₹२५,००० पर्यंत | मोफत |
| ₹२५,००१ ते ₹१ लाख | ₹२ |
| ₹१ लाख ते ₹२ लाख | ₹६ |
| ₹२ लाख ते ₹५ लाख | ₹१० |
19 Jan 2026 09:20 AM (IST)
न्यूझीलंडने भारतामध्ये पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकून नवा इतिहास रचला आहे. तिसऱ्या सामन्यात त्यांनी 337 धावांचा डोंगर उभा केला होता. या मोठ्या धावसंख्येचा पाया डेरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्या शतकी खेळींनी रचला गेला. या दोघांनी भारतीय गोलंदाजीचा पूर्णपणे समाचार घेतला आणि संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले.
भारतातर्फे विराट कोहलीने 124 धावांची अप्रतिम खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने एका बाजूने किल्ला लढवला, मात्र दुसऱ्या बाजूने त्याला हवी तशी साथ मिळाली नाही. अखेर भारताचा 41 धावांनी पराभव झाला आणि कोहलीचे हे शानदार शतक दुर्दैवाने व्यर्थ ठरले.
19 Jan 2026 09:10 AM (IST)
धाराशिव: जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी "शिवसेनेतील गद्दारांचा एक गट भाजप आमदाराच्या खिशात आहे", असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धाराशिव येथील विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.
तानाजी सावंत यांनी थेट भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधल्याने महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. एका बाजूला शिवसेनेचा एक गट भाजपशी युती करण्यास अनुकूल असताना, दुसऱ्या बाजूला सावंतांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेत दोन गट पडल्याचे स्पष्ट दिसत आहे.
19 Jan 2026 09:05 AM (IST)
Malegaon Accident : मालेगाव-मनमाड महामार्गावरील वऱ्हाणे गावाजवळ आज पहाटे एक भीषण दुर्घटना घडली. खाजगी ट्रॅव्हल्स आणि पिकअप व्हॅन यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात २ जण गंभीर जखमी असून २० हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे ३ वाजेच्या सुमारास झाला. पुण्याकडून मालेगावच्या दिशेने जाणारी खासगी बस आणि समोरून येणारी पिकअप यांच्यात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहन थेट बसच्या पुढच्या भागात घुसले, ज्यामुळे दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
19 Jan 2026 09:01 AM (IST)
US invite India to Gaza Peace Board: गाझा पट्ट्यातील युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी आणि तिथे दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रस्तावित केलेल्या 'गाझा शांतता मंडळा'मध्ये सामील होण्यासाठी भारताला औपचारिक निमंत्रण देण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या शांतता योजनेचा हा दुसरा टप्पा असल्याचे मानले जात आहे.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी या मंडळाच्या स्थापनेची घोषणा केली. हे मंडळ केवळ लष्करी नव्हे, तर प्रशासकीय आणि मानवतावादी पातळीवरही काम करणार आहे.
तांत्रिक समितीचे नियंत्रण: गाझामधील दैनंदिन प्रशासकीय कामकाज हाताळण्यासाठी एका तांत्रिक समितीची स्थापना केली जाईल, ज्याचे निरीक्षण हे 'शांतता मंडळ' करेल.
स्थिरतेवर भर: इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष कायमचा संपवून गाझामध्ये स्थैर्य निर्माण करणे हे या मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
युद्धबंदीची अंमलबजावणी: सध्या युद्धबंदी लागू असली तरी सुरू असलेले तुरळक हल्ले थांबवून ही प्रक्रिया शांततामय मार्गाने पुढे नेण्यावर मंडळाचा भर असेल.
Eknath Shinde/BMC Election 2026: राज्यात नुकत्याच 29 महानगरपालिकांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महायुतीने मोठे यश संपादन एले आहे. राज्यातील 29 पैकी जवळपास 25 महापालिकेत महायुतीची सत्ता आली आहे. त्यात मुंबई महानगरपालिकेत देखील महायुतीची सत्ता आली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल असे विधान केले होते. मात्र आता त्यांचेच नगरसवेक फुटणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदेंचे 29 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत निवडून आले आहेत. भाजपचे देखील 80 च्या वर नगरसेवक आले आहेत. त्यामुळे मुंबईत महायुतीची सत्ता येणार जे स्पष्ट झाले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपले 29 नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले आहेत. नगरसेवक फुटू नयेत याची काळजी घेतली जास्त असल्याचे म्हटले जात आहे.