Bribe News : 7 हजाराची लाच घेणं भोवलं; शिरूर तालुक्यातील महिला तलाठ्याला रंगेहात पकडले
काय घडलं नेमकं?
सुरुवातीला पोलिसांना रशियन महिला एलेना कस्थानोवाचा मृतदेह सापडला होता. या महिलेचे हात- पाय बांधलेले होते आणि तिच्या शरीरावर अनेख जखमा होत्या. पोलिसांनी आधी ही महिला कोण आहे याचा तपास केला. पोलिसांना महिलेची ओळख पटताच रशियन महिलेच्या लिव्ह-इन-पार्टनर अलेक्सी लिओनोव्हला अटक केली. तेव्हा त्याने एलेनाची हत्याची कबुली तर दिली. यासोबत त्याने आणखी एका हत्येची कबुली दिली.
दोन महिलांच्या हत्येची दिली कबुली
आरोपीने सुरूवातीला त्याची लिव्ह इन पार्टनर एलेनावर हल्ला केला. त्यानंतर त्याने तिचे हात-पाय बांधले आणि तिच्यावर चाकूने अनेक वेळा वार केले. आरोपी ऐवढ्यावर थांबला नाही. नंतर त्याने ऐलेनाचा गाळा चाकूने चिरला. यात ती गंभीर जखमी झाली आणि महिलेचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना मृतदेह सापडताच पोलिसांनी तपास वेगाने फिरवत पोलिसांनी आरोपी अलेक्सी लिओनोव्ह याला अटक केली.
त्याने चौकशीत दोन हत्येची कबुली दिली. तो स्वतः दुसऱ्या महिलेच्या मृतदेहापर्यंत पोलिसांना घेऊन गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलेक्सी लिओनोव्ह असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा रशियाचा आहे आणि तो बऱ्याच काळापासून गोव्यात राहत होता. लिओनोव्हने एलेना कस्थानोवा आणि एलिना वानीवा या दोन महिलांची हत्या केली. पोलिस सध्या या दोन्ही हत्याकांडाचा तपास करत आहेत. दोन्ही महिलांची हत्या एकाच पद्धतीने करण्यात आली होती. दोघींचे हात-पाय बांधून त्यांच्या गळ्यावरून चाकू फिरवत हत्या करण्यात आली होती.
हत्या का केली?
या दोन्ही महिलांची त्याने हत्या का केली? या मागचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या दोन्ही हत्याकांडाच्या घटनेमुळे गोव्यात खळबळ उडाली आहे.
Ans: दोन रशियन महिलांचा निघृण हत्या करण्यात आली आहे.
Ans: अलेक्सी लिओनोव्ह हा रशियन नागरिक असून तो एलेनाचा लिव्ह-इन पार्टनर होता.
Ans: दोन्ही महिलांचे हात-पाय बांधून चाकूने गळा चिरत हत्या करण्यात आली.






