Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News LIVE Updates Today: राजकारणात उलथापालथ! सुनेत्रा पवार होणार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

Marathi news Live Blog- आज संध्याकाळी ५ वाजता राजभवनावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून इतिहासात नाव नोंदवणार आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 31, 2026 | 01:55 PM
LIVE
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • 31 Jan 2026 01:55 PM (IST)

    31 Jan 2026 01:55 PM (IST)

    पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; गुन्हेगारी रोखण्यासाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

    पुणे शहर पोलिस दलात नुकतेच नव्याने पाच पोलिस ठाणी तसेच दोन परिमंडळे कार्यान्वित झाली आहेत. पोलिस ठाण्यांची संख्या तसेच वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासोबतच गुन्हेगारी नियत्रंण ठेवण्यासाठी आणि तपासाला गती देण्यास शहर गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्यात आली आहे. आजवर शहरात गुन्हे शाखेचे ६ युनिट होते. ते आता सात झाले असून, एक एसीपी पदही वाढविण्यात आले आहे. त्यामुळे आता शहरात असलेल्या ७ परिमंडळसाठी ७ युनिट कार्यरत असणार आहेत.

  • 31 Jan 2026 01:50 PM (IST)

    31 Jan 2026 01:50 PM (IST)

    ट्रेनमध्ये फोन चोरीला गेला? घाबरू नका… ‘Sanchar Saathi’वर लगेच तक्रार करा

    गर्दी असलेल्या ठिकाणी किंवा प्रवासादरम्यान जर तुमचा स्मार्टफोन हरवला तर तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. काही वेळेस आपल्याला समजत नाही की आपला स्मार्टफोन हरवला आहे. अशा वेळेस लोक घाबरतात आणि काय करावे हे त्यांना सुचत नाही. मात्र अशा परिस्थितीत घाबरून न जाता तुम्ही संचार मंत्रालयाच्या संचार साथीची मदत घेऊ शकता. संचार साथीच्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला फोन शोधण्यासाठी तक्रार करू शकता. जर तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर तुमचा स्मार्टफोन हरवल्यामुळे चिंतेत असाल तर टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही तुमचे डिवाइस पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता.

  • 31 Jan 2026 01:45 PM (IST)

    31 Jan 2026 01:45 PM (IST)

    पाकिस्तानने घरच्या मैदानावर घालवली इज्जत…

    पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला तर आज या मालिकेचा दुसरा सामना खेळवला जाणार आहे. या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्याचे मुख्य खेळाडू खेळवले नाहीत हे देखील एक पराभवाचे कारण होते. पाकिस्तानच्या संघाने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली आणि त्यांच्या संघाला विजय मिळवून दिला. तथापि, पाकिस्तानी चाहते अजूनही नाखूष आहेत. त्यांना वाटते की त्यांच्या घरच्या मैदानावर त्यांचा अपमान झाला आहे.

  • 31 Jan 2026 01:40 PM (IST)

    31 Jan 2026 01:40 PM (IST)

    सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार! शरद पवार म्हणाले...

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज (31 जानेवारी 2026) महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आता सुनेत्रा यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मला याबद्दल कोणतीही माहिती नाही.” दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाबाबत त्यांनी एक मोठे विधान देखील केले. सुनेत्रा आज शपथ घेणार का असे विचारले असता शरद पवार म्हणाले, “मला याबद्दल कोणतीही माहिती नाही.” हा निर्णय त्यांच्या पक्षाने घेतला असावा, कारण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अशी काही नावे समोर येत आहेत – कदाचित त्यांनीच हा निर्णय घेतला असावा. पक्षाच्या पातळीवर अंतर्गत निर्णय घेतला असावा.

  • 31 Jan 2026 01:35 PM (IST)

    31 Jan 2026 01:35 PM (IST)

    ट्रम्प यांचा ‘आर्माडा’ आणि सौदीची अस्पष्ट पण स्वार्थी भूमिका

    मध्यपूर्वेतील राजकारण हे नेहमीच ‘धुर्त’ खेळींसाठी ओळखले जाते, पण सध्या सौदी अरेबियाने (Saudi Arabia) जे धोरण स्वीकारले आहे, त्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. सौदीचे सामर्थ्यवान युवराज मोहम्मद बिन सलमान (MBS) हे जगासमोर इराणसोबतच्या संबंधांत ‘नवा अध्याय’ सुरू करत असल्याचे भासवत आहेत. मात्र, अ‍ॅक्सिओस (Axios) या प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेल्या एका खळबळजनक अहवालानुसार, सौदीचे संरक्षण मंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान (KBS) यांनी अमेरिकेत जाऊन वेगळीच खेळी खेळली आहे.

  • 31 Jan 2026 01:25 PM (IST)

    31 Jan 2026 01:25 PM (IST)

    ‘Home Alone’ फेम अभिनेत्रीचे ७१ व्या वर्षी निधन

    हॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री कॅथरीन ओ’हाराचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. या अभिनेत्री बऱ्याच काळापासून आजारी होत्या आणि लॉस एंजेलिसमधील तिच्या घरी तिचे निधन झाले. १९९० च्या दशकातील “होम अलोन” या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या या अभिनेत्रीच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

  • 31 Jan 2026 01:20 PM (IST)

    31 Jan 2026 01:20 PM (IST)

    Filesचा महास्फोट! 30 लाख कागदपत्रात मीरा नायर सहित ‘या’ दिग्गजांची नावे

    जगाला हादरवून सोडणाऱ्या जेफ्री एपस्टाईन (Jeffrey Epstein) लैंगिक तस्करी प्रकरणाने आता एक नवीन आणि धक्कादायक वळण घेतले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने (Department of Justice) या प्रकरणाशी संबंधित आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा सार्वजनिक केला आहे. यामध्ये ३० लाखांहून अधिक कागदपत्रे, लाखो छायाचित्रे आणि हजारो व्हिडिओंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या नव्या कागदपत्रांमध्ये भारतीय वंशाच्या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मीरा नायर यांच्यासह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आणि जेफ बेझोस यांची नावे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

  • 31 Jan 2026 01:10 PM (IST)

    31 Jan 2026 01:10 PM (IST)

    जुनी टॅक्स पद्धत रद्द होणार की नवीन टॅक्स प्रणालीमध्ये बदल होणार?

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. दरवर्षीप्रमाणे, सामान्य माणूस आणि करदाते, विशेषतः नोकरी करणारे, दोघेही, प्राप्तिकराशी संबंधित संभाव्य बदलांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांना किती कराचा भरणा करावा लागेल हे मुख्यत्वे ते जुन्या कर प्रणाली अंतर्गत त्यांचे उत्पन्न कर रिटर्न भरतात की नवीन कर प्रणाली अंतर्गत यावर अवलंबून असते.

  • 31 Jan 2026 01:00 PM (IST)

    31 Jan 2026 01:00 PM (IST)

    Scam Alert: ‘मला कॉल करायला फोन मिळेल का..’ अनोळखी व्यक्तीच्या जाळ्यात अडकलात तर क्षणातच रिकामं होईल बँक अकाऊंट

    गेल्या काही काळापासून स्कॅमच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी हॅकर्स आणि स्कॅमर्स वेगवेगळ्या पद्धती वापरत आहेत. लोकांकडून पैसे उकळण्यासाठी नवीन स्कॅमचा वापर केला जात आहे. असाच नवीन स्कॅम आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. हा स्कॅम अतिशय धोकादायक असून अनेक लोकं या स्कॅममध्ये अगदी सहज अडकू शकतात. स्कॅमर्स अत्यंत हुशारीने लोकांचा फोन वापरून त्यांची फसवणूक करत आहेत. अगदी क्षणातच लोकांच्या फोनमधून ओटीपी चोरून त्यांचे बँक अकाऊंट रिकामे केले जात आहे. हा स्कॅम इतका खरा भासवला जातो की अगदी सहज कोणीही स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकू शकते.

  • 31 Jan 2026 12:55 PM (IST)

    31 Jan 2026 12:55 PM (IST)

    दिल्लीच्या हातात मुंबईचं भविष्य! DC ने सामना गमावला तर…जेमिमा लढणार आज यूपी वाॅरियर्सशी

    मुंबई अजूनही प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडलेली नाही. WPL पॉइंट टेबलमध्ये मुंबई सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आज, सर्व मुंबई इंडियन्स खेळाडू दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध UP वॉरियर्स सामन्यावर लक्ष केंद्रित करतील.

  • 31 Jan 2026 12:50 PM (IST)

    31 Jan 2026 12:50 PM (IST)

    बिडकरांची लागणार पुन्हा सभागृह नेतेपदी वर्णी

    अनुभवाचा विचार करताना अपेक्षेनुसार नगरसेवक गणेश बिडकर यांच्या गळ्यात महापालिकेच्या सभागृह नेत्याची माळ पडणार आहे. पक्षाच्या महापालिकेच्या गटनेतेपदी बिडकर यांची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नियुक्ती केली आहे. आता भाजपमध्ये महापाैर, स्थायी समिती, शहर सुधारणा समितीसह इतर विषय समितींच्या अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.

  • 31 Jan 2026 12:40 PM (IST)

    31 Jan 2026 12:40 PM (IST)

    ‘आमचं डोकं झुकलेलं होतं!’ शाहबाज शरीफ यांच्या अब्रूची राखरांगोळी

    पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती भयानक आहे. शाहबाज शरीफ यांनी कबूल केले की त्यांना कर्ज घेण्यासाठी, मदतीसाठी भीक मागण्यासाठी आणि स्वाभिमानाशी तडजोड करण्यासाठी परदेश दौऱ्यांवर जावे लागले.

  • 31 Jan 2026 12:30 PM (IST)

    31 Jan 2026 12:30 PM (IST)

    जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुकांबाबत सपकाळांचा मोठा विश्वास; म्हणाले…

    राज्यात व केंद्रात १९९९ नंतर आघाडीचे राजकारण सुरु झालेले आहे. आघाडीच्या राजकारणात दोन पावलं मागे घ्यावी लागतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. जेथे शक्य आहे तेथे आघाडी करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना दिले होते. नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

  • 31 Jan 2026 12:20 PM (IST)

    31 Jan 2026 12:20 PM (IST)

    रविवारी इराणवर बॉम्बवर्षाव? अमेरिकेचा ‘फायनल वॉर्निंग’ नंतर मोठा निर्णय; ट्रम्प सरकार तेहरान उलटवून टाकण्याच्या तयारीत

    मध्य पूर्वेतील (Middle East) वातावरण आता ज्वालाग्राही बनले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्ध आता थेट लष्करी संघर्षात बदलताना दिसत आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) होर्मुझच्या सामुद्रधुनीत अचानक ‘लाईव्ह-फायर’ नौदल सराव जाहीर केल्यामुळे अमेरिकन सैन्य आक्रमक झाले आहे. सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रविवारी इराणवर हवाई हल्ल्याची अधिकृत घोषणा करू शकतात, ज्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले आहे.

  • 31 Jan 2026 12:05 PM (IST)

    31 Jan 2026 12:05 PM (IST)

    Sangli News : बिऊर‌मध्ये बिबट्याची बालकावर झडप; काही क्षणांतच झालं होत्याचं नव्हतं

    बिऊर‌ (ता शिराळा) च्या अमृतनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर हणमंत पाटील (वय ६) या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.३०) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी वन विभागाला अनेकवेळा फोन लावला तरीही कुणीही फोन उचलला नाही. त्या कारणाने संतप्त हजारोच्या जमावाने वन विभागाचे कार्यालय फोडले.

  • 31 Jan 2026 12:00 PM (IST)

    31 Jan 2026 12:00 PM (IST)

    सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेची घाई का? संजय राऊतांचा खळबळजनक दावा

    अजितदादांच्या कुटुंबातील व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने उपमुख्यमंत्री होणार असेल, तर ही त्यावर मत व्यक्त करण्याची वेळ नाही, अशी प्रतिक्रीया ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते सकाळी माध्यमांशी बोलत होते. तसेच, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेणार असल्याच्या बातम्या वाचल्या. पण हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. महाराष्ट्र अजूनही अजित पवार यांच्या निधनाच्या दु:खातून सावरलेला नाही, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

  • 31 Jan 2026 11:50 AM (IST)

    31 Jan 2026 11:50 AM (IST)

    कोणाचा होणार पत्ता कट, इशान किशनचे पुनरागमन? कोचने दिली खेळाडूंची अपडेट

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेचा शेवटचा सामना तिरुवनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. भारत मालिकेत ३-१ ने आघाडीवर आहे आणि टी-२० विश्वचषकाची तयारी करण्याची ही भारताची शेवटची संधी आहे. इशान किशन दुखापतीमुळे मागील सामना गमावू शकला नाही. किशन चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि चाहते त्याच्या अनुपस्थितीमुळे नाराज होते. आता, सर्वांनाच प्रश्न पडला आहे की किशन तिरुवनंतपुरम येथे होणाऱ्या पाचव्या टी-२० मध्ये सहभागी होईल का. भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांनी आता किशनच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले आहे.

  • 31 Jan 2026 11:40 AM (IST)

    31 Jan 2026 11:40 AM (IST)

    आईच्या डोळ्यांसमोर अपहरण! मुंब्र्यातून तीन महिन्यांचं बाळ पळवलं

    ठाण्यात अपहरणाची एक धक्कदायक घटना समोर आली. तीन महिन्यांच्या मुलीचं अपहरण तिच्या आईच्या डोळ्या देखत मुंब्र्यातून झालं होत. एका बुरखा घातलेल्या महिनेने हे अपहरण केले होते. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सहा दिवसात या लहान बाळाची सुखरूप सुटका केली. त्या बाळाला पोलिसांनी त्याच्या आईच्या कुशीत सुरक्षित सोपवलं आहे. मात्र, या अपहरणामागचे कारण काय? असा सवाल तुम्हाला पडला असेल. याचा अपहरणामागचे कारण धक्कदायक आहे.

  • 31 Jan 2026 11:30 AM (IST)

    31 Jan 2026 11:30 AM (IST)

    भारताची मोठी चाल! ‘या’ दोन आफ्रिकन देशांसोबत केला मोठा करार

    भारताने ग्लोबल साउथमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी एक मोठे सकारात्मक पाऊल उचलले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) शुक्रवारी (३० जानेवारी २०२६) आफ्रिकी देश सोमालिया आणि लिबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्ली भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी या दोन्ही देशांशी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा केली. व्यापार, उर्जा, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि क्षमता निर्माण यांसारख्या मुद्यांवर या भेटी चर्चा झाली. या वाढत्या सहकार्यामुळे भारताचा ग्लोबल साउथमधील प्रभाव अधिक बळकट होणार आहे. मात्र यामुळे पाकिस्तान आणि चीनला मोठा झटका बसला आहे.

  • 31 Jan 2026 11:20 AM (IST)

    31 Jan 2026 11:20 AM (IST)

    लक्झरी नाही तर गरजेसाठी वापरा तंत्रज्ञान! अंतराळवीर Sunita Williams

    तंत्रज्ञान आणि गॅझेट्सचा वापर लक्झरी किंवा शो-ऑफसाठी नाही तर गरजेसाठी करावा, असं अनेकजण म्हणतात. याचेच एक उदाहरण म्हणजे अंतराळवीर सुनीता विल्यम्स. अलीकडेच सुनीता विल्यम्स यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सुनीता विल्यम्स यांच्या हातात मोटोरोलाचा एक स्मार्टफोन आणि हातामध्ये एक वॉच दिसत आहे. सुनीता विल्यम्स Motorola Edge 50 Neo 5G वापर असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. तसेच सुनीता विल्यम्स यांच्या हातामध्ये Garmin Instinct नावाचे घड्याळ दिसत आहे.

  • 31 Jan 2026 11:10 AM (IST)

    31 Jan 2026 11:10 AM (IST)

    Jannik Sinner ला हरवून Novak Djokovic ने अंतिम फेरीत केला प्रवेश

    ऑस्ट्रेलियन ओपनचा दुसरा सेमीफायनल ३० जानेवारी रोजी खेळवण्यात आला. सर्बियाच्या नोवाक जोकोविचने शानदार कामगिरी करत ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये जोकोविचने इटलीच्या यानिक सिन्नरचा ३-६, ६-३, ४-६, ६-४, ६-४ असा पराभव करून जेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. जोकोविच आता त्याचे २५ वे ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे.

  • 31 Jan 2026 10:59 AM (IST)

    31 Jan 2026 10:59 AM (IST)

    सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यपदाची इतकी घाई कशासाठी?

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील राजकीय हालचाली वेगाने वाढल्या आहेत.  सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या निर्णयामुळे  पवार कुटुंबातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.  अजित पवार यांच्या निधनाला चार दिवस उलटत नाहीत तोच सुनेत्रा पवार आज (31 जानेवारी) सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्याचवेळी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत इतकी घाई का करण्यात आली असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

  • 31 Jan 2026 10:51 AM (IST)

    31 Jan 2026 10:51 AM (IST)

    U19 World Cup 2026 मध्ये सेमीफायनलचे तीन संघ ठरले!

    १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियानंतर अफगाणिस्तान आणि इंग्लंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्य फेरीत फक्त एकच संघ उरला आहे आणि शर्यतीत फक्त भारत आणि पाकिस्तान उरले आहेत. १९ वर्षांखालील विश्वचषकातील हा हाय-व्होल्टेज सामना रविवार, १ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. तथापि, भारताचा फायदा आहे; टीम इंडियाच्या खात्यात आधीच ६ गुण आहेत आणि त्याचा नेट रन रेट देखील पाकिस्तानपेक्षा खूपच चांगला आहे. सध्या पाकिस्तानच्या खात्यात ४ गुण आहेत. जर पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल तर त्याला भारतावर मोठा विजय मिळवावा लागेल.

  • 31 Jan 2026 10:43 AM (IST)

    31 Jan 2026 10:43 AM (IST)

    खंबाटकी घाटातून प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

    पुणे-सातारा महामार्गावरील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. अपघातप्रवण आणि वेळखाऊ ठरणाऱ्या खंबाटकी घाट परिसरात उभारण्यात आलेला नवा बोगदा (टनेल) आणि व्हायाडक्ट येत्या जून महिन्यापासून सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला होणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील धोकादायक वळणांचा त्रास संपून प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.

  • 31 Jan 2026 10:35 AM (IST)

    31 Jan 2026 10:35 AM (IST)

    ट्रम्प यांच्या दबावानंतरही व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचा PM मोदींनी फोन

    जागतकि राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे, यामागचे कारण म्हणजे व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगज आणि पंतप्रधान मोदींचा शुक्रवारी (३० जानेवारी) झालेल्या संवाद आहे. या संवादानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली असून हा डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या साठी देखील मोठा झटका मानला जात आहे. ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

  • 31 Jan 2026 10:27 AM (IST)

    31 Jan 2026 10:27 AM (IST)

    तगडा प्रोसेसर, मिड-रेंज किंमत आणि 7,560mAh बॅटरी…

    Redmi Turbo 5 सीरीज चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. कंपनीने या स्मार्टफोन सिरीजअतंर्गत दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Redmi Turbo 5 आणि Redmi Turbo 5 Max यांचा समावेश आहे. Redmi Turbo 5 Max डिव्हाईसमध्ये 9000mAh बॅटरी आणि मीडियाटेक डेमेन्सिटी 9500s चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे.

  • 31 Jan 2026 10:19 AM (IST)

    31 Jan 2026 10:19 AM (IST)

    T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी सामना अधिकाऱ्यांची यादी जाहीर

    ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी सामना अधिकाऱ्यांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार, १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या भारत-पाकिस्तानच्या हाय-व्होल्टेज सामन्यात रिचर्ड इलिंगवर्थ आणि कुमार धर्मसेना मैदानी पंच असतील. भारताचे नितीन मेनन या स्पर्धेतील त्यांच्या चौथ्या टी-२० विश्वचषकात पंच म्हणून काम पाहणार आहेत आणि भारताचे अनंत पद्मनाभन पंच म्हणून पदार्पण करणार आहेत. आयसीसी एलिट पॅनेलमधील एकमेव भारतीय मेनन यांनी यापूर्वी २०२१, २०२२ आणि २०२४ च्या टी-२० विश्वचषकात पंचगिरी केली आहे.

  • 31 Jan 2026 10:11 AM (IST)

    31 Jan 2026 10:11 AM (IST)

    इराणचा ‘अणू’ डाव! उद्ध्वस्त केंद्रांवर उभारली रहस्यमय छप्परं

    मध्य पूर्वेतील तणाव आता एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. इस्रायलने जून २०२५ मध्ये केलेल्या भीषण हल्ल्यानंतर इराणचा (Iran) अणू कार्यक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला जात होता. मात्र, ताज्या उपग्रह प्रतिमांनी (Satellite Images) संपूर्ण जगाला चकित केले आहे. इराणने आपल्या इस्फहान आणि नतान्झ या दोन प्रमुख अणू केंद्रांवरील उद्ध्वस्त भागांवर घाईघाईने नवीन छप्परं आणि आच्छादनं उभारली आहेत. या मूक हालचालींमुळे अमेरिका (America) आणि इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

  • 31 Jan 2026 09:59 AM (IST)

    31 Jan 2026 09:59 AM (IST)

    इराणचा ‘अणू’ डाव! उद्ध्वस्त केंद्रांवर उभारली रहस्यमय छप्परं

    Iran nuclear site satellite images 2026 : मध्य पूर्वेतील तणाव आता एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. इस्रायलने जून २०२५ मध्ये केलेल्या भीषण हल्ल्यानंतर इराणचा (Iran) अणू कार्यक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला जात होता. मात्र, ताज्या उपग्रह प्रतिमांनी (Satellite Images) संपूर्ण जगाला चकित केले आहे. इराणने आपल्या इस्फहान आणि नतान्झ या दोन प्रमुख अणू केंद्रांवरील उद्ध्वस्त भागांवर घाईघाईने नवीन छप्परं आणि आच्छादनं उभारली आहेत. या मूक हालचालींमुळे अमेरिका (America) आणि इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

  • 31 Jan 2026 09:42 AM (IST)

    31 Jan 2026 09:42 AM (IST)

    मुंबईत बेशिस्त चालकांकडून वसूल केला तब्बल 2330 कोटींचा दंड

    मुंबई : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून वर्षभरात ५० लाख ९६ हजार ई-चलान जारी करत तब्बल ४९६ कोटींचा दंड ठोठावला आहे. तर गेल्या आठ महिन्यांत ४ कोटी २९ लाख १६ हजार जणांना २ हजार ३३० कोटी ८२ लाखांचा दंड केला. पण, ५४ टक्के दंड वसूली झाली. गेल्या वर्षात मुंबईत २ हजार ६४५ अपघात घडले. त्यात ३६३ जणांचा मृत्यू, तर १ हजार ९७४ जण गंभीर जखमी झाले.

  • 31 Jan 2026 09:03 AM (IST)

    31 Jan 2026 09:03 AM (IST)

    सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत कोणतीही माहिती नाही- शरद पवार

    सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. सध्याच्या स्थिती आमच्यासाठी आव्हानात्मक आहे.  जो गेला त्याला परत आणू  शकत नाही.  कुणी ना कुणी अजित पवार यांची जबाबदारी घेतली पाहिजे, म्हणून हे निर्णय घेतले जात असावेत, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे. ते सकाळी माध्यमांशी बोलत होते.

     

     

     

  • 31 Jan 2026 08:48 AM (IST)

    31 Jan 2026 08:48 AM (IST)

     एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ते महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

    अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून सुनेत्रा पवार आज (३१ जानेवारी २०२६) राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत.  सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी झाला. त्यांचे माहेर धाराशिवमधील एका प्रतिष्ठित राजकीय घराण्यातील आहे. त्या माजी मंत्री आणि खासदार पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. १९८० मध्ये त्यांचा विवाह अजित पवार यांच्याशी झाला. तेव्हापासून त्या पवार कुटुंबाचा आणि बारामतीचा अविभाज्य भाग बनल्या.

Maharashtra to World Breaking News:  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. अजितदादांच्या रिक्त झालेल्या पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली असून, त्या आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

राजकीय समीकरणे आणि शरद पवार गटाची भूमिका

या शपथविधी सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. अजित पवारांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळीक वाढली होती.

 

 

 

Web Title: Maharashtra breaking news live updates today marathi political national international war sports crime maharashtra zilla parishad election 2026 union budget 2026 live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 08:46 AM

Topics:  

  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजकीय गणिते बदलणार; आकडा ठरेल निर्णायक
1

Maharashtra Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजकीय गणिते बदलणार; आकडा ठरेल निर्णायक

सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री; आज होणार शपथविधी सोहळा?
2

सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री; आज होणार शपथविधी सोहळा?

Maharashtra Politics: सुनेत्रा पवार रचणार इतिहास! पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ
3

Maharashtra Politics: सुनेत्रा पवार रचणार इतिहास! पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ

Maharashtra Politics: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? सुनील तटकरे म्हणाले, “दादांच्या अनुपस्थितीत…”
4

Maharashtra Politics: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? सुनील तटकरे म्हणाले, “दादांच्या अनुपस्थितीत…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.