संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट: वाल्मीक कराडसह ८ जणांवर CID दाखल करणार चार्जशीट
बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच तापले आहे. एक आरोपी अजून फरार आहे. बाकीचे आरोपी अटकेत आहेत. विरोधक आणि देशमुख कुटुंबीय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दरम्यान या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडून केला जात आहे. मात्र आता या प्रकरणात आता नवीन अपडेट समोर आली आहे. आता जुनी एसआयटी बरखास्त करण्यात आली आहे. त्याऐवजी आता नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आधीच्या एसआयटीध्ये असलेले अधिकारी वाल्मीक कराडच्या जवळचे अधिकारी व संपर्कातील अधिकारी असल्याचा आरोप होत होते.
नवीन SIT स्थापन करण्यात आली. त्याचे स्वागत
आता तत्काळ वाल्मिक कराडवर मोक्का लावा pic.twitter.com/nT32YLxTPp
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 13, 2025
देशमुख कुटुंबीय यांच्या मागणीनंतर या पप्रकरणाचा तपास आता नवीन एसआयटीतर्फे केला जाणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 1 जानेवारी 2025 रोजी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. त्या एसआयटीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने आक्षेप घेतला होता. पहिल्या एसआयटीमध्ये असलेले अधिकारी वाल्मीक कराडच्या जवळच्या असल्याचे आरोप होत होते. या संदर्भात काही फोटो देखील व्हायरल झाले होते. यामुळे या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप केला जात होता. नवीन एसआयटीमध्ये 7 अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
मुख्य आरोपी विष्णू चाटेबाबत कोर्टाचा ‘हा’ मोठा निर्णय
सरपंच संतोष देशमुख याच्या हत्येचे प्रकरण चांगलेच तापले आहे. अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अजून फरार आहे. तर आज वाल्मीक कराडवर मोक्का लावावा आणि लवकरात लवकर संतोष देशमुख यांना न्याय द्यावा यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज आंदोलन केले. तसेच सरकारला उद्या 10 पर्यंतचा अलटीमेटम दिला आहे. दरम्यान या प्रकरणात विष्णू चाटे हा मुख्य आरोपी आहे. तर वाल्मीक कराडला सहआरोपी करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान आज मुख्य आरोपी विष्णू चाटेची पोलीस कोठडी संपली असल्याने त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटेची पोलीस कोठडी आज संपत असल्याने त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान आज कोर्टात विष्णू चाटेच्या कोठडीवर सुनावणी पार पडली. यामध्ये कोर्टाने विष्णू चाटेच्या कोठडीत 6 दिवसांची वाढ केली आहे. कोर्टाने विष्णू चाटेला 6 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विष्णू चाटे हा वाल्मीक कराडचा मावस भाऊ असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान या प्रकरणात वाल्मीक कराडला देखील केज कोर्टाने 14 दिवसांची सीआयडी कोहडी सुनावली होती. वाल्मीक कराडची देखील कोठडी उद्या संपत आहे. त्यामुळे वाल्मीक कराडला उद्या कोर्टात हजर करण्यात येईल. त्यानंतर सुनावणीदरम्यान कोर्ट वाल्मीक कराडला कोणती कोठडी सुनावते हे पहावे लागणार आहे. दरम्यान देशमुख कुटुंबांकडून वाल्मीक कराडवर मोक्का कायदा लावावा अशी मागणी केली जात आहे.