राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या (फाईल फोटो )
मुंबई: महाराष्ट्रात सत्ता बदलताच प्रशासनात बदल्यांचं सत्र सुरू झालं आहे. गेल्या काही दिवसात सातत्याने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. त्यात आता आणखी 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील एकूण 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. राज्यात नवीन सरकार आल्यापासून अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात देखील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
एन. नवीन सोना हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव असणार आहेत. तर माणिक गुरसाल हे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नवे आयुक्त असणार आहेत. राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार आज 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसांत राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांची लाट पाहायला मिळत आहे.
कोणत्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या?
1. अतुल पाटणे – पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग , मंत्रालय
2. ऋचा बागला – प्रधान सचिव, वित्त (लेखा आणि कोषागार), मंत्रालय
3. अंशू सिन्हा – प्रधान सचिव ,वस्त्र विभाग मंत्रालय
4. एन. नवीन सोना – प्रधान सचिव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
5. डॉ. रामास्वामी एन. – सचिव, वित्त विभाग, मंत्रालय
6. विरेन्द्र सिंह – सचिव – सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय
7. प्रदीप पी. – महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, मुख्य कार्यकारी अधिकारी
8. माणिक गुरसाल – आयुक्त, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
10 IAS अधिकाऱ्यांची ट्रान्सफर, कोणाची कोणत्या जिल्ह्यात नियुक्ती?
विकास चंद्र रस्तोगी प्रधान सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग., मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव (कृषी), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
डॉ.हर्षदीप कांबळे यांना प्रधान सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
मिलिंद म्हैसकर अतिरिक्त मुख्य सचिव (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वने), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बी. वेणुगोपाल रेड्डी, अतिरिक्त मुख्य सचिव (वने), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली.
विकास चंद्र रस्तोगी प्रधान सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग., मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव (कृषी), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
विनिता वैद सिंगल, प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती
संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांची जिल्हाधिकारी, सातारा म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
जितेंद्र दुडी जिल्हाधिकारी, सातारा यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती
I.A.कुंदन , प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांची प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती
डॉ. निपुण विनायक यांची प्रकल्प संचालक, RUSA, उच्च तंत्रशिक्षण विभाग, मुंबई यांना सचिव (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई नियुक्ती करण्यात आली आहे.
जयश्री भोज व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांची सचिव, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती
डॉ. सुहास दिवसे जिल्हाधिकारी, पुणे यांची सेटलमेंट कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे म्हणून नियुक्ती