Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या ब्रेकिंग बातम्या एका क्लिकवर

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सोमवारपासून मुंबईत प्रचारसभा घेणार असून भाजप आणि शिंदे गटाविरोधात थेट प्रचारात उतरले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 05, 2026 | 06:59 PM
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News : 

ठाकरे बंधूंच्या युतीची भाजपला चिंता नाही – देवेंद्र फडणवीस

ठाकरे बंधूंची युती उशिराने झाली असून आता त्याचा कोणताही फायदा होणार नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 2009 साली राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असते तर निकाल वेगळा लागला असता, मात्र सध्या दोघांचीही मतांची टक्केवारी खूप कमी असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी तसेच अमराठी मतदारही त्यांना मतदान करणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करत मुंबईत भाजप निश्चितपणे निवडून येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

The liveblog has ended.
  • 05 Jan 2026 06:56 PM (IST)

    05 Jan 2026 06:56 PM (IST)

    Nissan Tekton लाँच होण्यापूर्वी सोशल मीडियावर नवी टिझर झाला रिलीज, मिळाली ‘ही’ माहिती

    भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या वेगवगळ्या सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर करत असतात. ग्राहक देखील इतर वाहनांच्या तुलनेत एसयूव्ही वाहनांना चांगला प्रतिसाद देत आहे. हीच मागणी लक्षात घेत आता Nissan देखील भारतीय मार्केटमध्ये त्यांची नवीन एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे.

  • 05 Jan 2026 06:43 PM (IST)

    05 Jan 2026 06:43 PM (IST)

    Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि... , एकच खळबळ

    अमेरिकेतून मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती यांच्या खाजगी निवासस्थानावर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. जेडी व्हान्स हे अमेरिकेचे उपराष्ट्रपती आहेत. त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

  • 05 Jan 2026 06:02 PM (IST)

    05 Jan 2026 06:02 PM (IST)

    “… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण

    सोनाजी गाढवे / पुणे: शासनाच्या विविध भरती प्रक्रियांमध्ये कॉमर्स (बी.कॉम) पदवीधरांवर (Career) सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरोधात आता विद्यार्थ्यांचा संयम सुटत चालला आहे. यापूर्वी अनेक वेळा मुख्यमंत्री, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच मंत्रालयीन स्तरावर निवेदने परत करूनही कोणतीही ठोस दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

  • 05 Jan 2026 05:45 PM (IST)

    05 Jan 2026 05:45 PM (IST)

    टाटा कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटलला धमकीचा मेल

    गेल्या काही दिवसांपासून बॉम्ब धमक्यांची मालिका सुरुच आहे. अशातच आज (5 जानेवारी 2026 ) मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला. ज्यामुळे परिसरात घबराट पसरली. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. मुंबई पोलिस, बॉम्ब पथक आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आणि संपूर्ण परिसरात सखोल शोध मोहीम सुरू करण्यात आली.

  • 05 Jan 2026 05:30 PM (IST)

    05 Jan 2026 05:30 PM (IST)

    2025 मध्ये ‘ही’ Electric Car बनली ईव्ही मार्केटची बादशाह!

    भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी MG Motors भारतात अनेक सेगमेंटमध्ये कार्स ऑफर करते. कंपनी इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये MG Windsor EV ऑफर करते. कंपनीने सांगितले आहे की ही कार 2025 मध्ये सर्वात जास्त मागणी असलेली कार ठरली.

  • 05 Jan 2026 05:01 PM (IST)

    05 Jan 2026 05:01 PM (IST)

    टीम इंडियात परतल्यानंतर श्रेयस अय्यरला मिळाली ‘कर्णधार’पदाची धुरा

    न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा (Team India) संघ नुकताच जाहीर करण्यात आला. भारताचा उपकर्णधार श्रेयस अय्यर (Shryas Iyer) संघात परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो दुखापतीतून सावरत होता आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकला होता. आता, त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच्या पुनरागमनानंतर, अय्यरला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे: तो विजय हजारे ट्रॉफीच्या पुढील दोन सामन्यांमध्ये मुंबईचे नेतृत्व करेल.

  • 05 Jan 2026 04:55 PM (IST)

    05 Jan 2026 04:55 PM (IST)

    बिनविरोधप्रकरणी मनसे आक्रमक; निकाल राखून ठेवण्याची मागणी

    निवडणुक आयोग म्हणत आम्ही चौकशी करू चौकशी करून होणार नाही कारण ज्या आरो आहेत त्यांचा अगोदर पासून यात सहभाग आहे खरच न्याय द्यायचा असेल तर एका संस्थेकडून चौकशी व्हावी या संपूर्ण निकाल राखून ठेवायला हवं असे निकाल लागत गेले तर या अगोदर मतदार विकत घेतला जात होता आता उमेदवार विकत घेतला जातोय.

  • 05 Jan 2026 04:50 PM (IST)

    05 Jan 2026 04:50 PM (IST)

    नारायण राणेंच्या निवृत्तीवर काय म्हणाले . प्रवीण दरेकर

    मला राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला जातोय अशी खंत खा. नारायण राणे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली होती. यानंतर नारायण राणेंचा रोख भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे अशा राजकीय चर्चा सुरु झाल्या. याबाबत आ. प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राणे साहेब पक्षाचे नेते असून पक्षाचे नेते पक्षाच्या प्रदेशाध्यक्षावर असे बोलू शकत नाहीत असे ते म्हणाले आहेत.

  • 05 Jan 2026 04:45 PM (IST)

    05 Jan 2026 04:45 PM (IST)

    वर्सोवा वॉर्ड ५९ मध्ये महायुतीला धक्का; अल्ताफ पेवेकर अपक्ष रिंगणात

    वॉर्ड क्रमांक ५९ (वर्सोवा) मधून शिवसेना शिंदे गटातील इच्छुक उमेदवार अल्ताफ पेवेकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वॉर्डमधून महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून भाजपचे योगीराज दाभाडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र तिकीट न मिळाल्याने अल्ताफ पेवेकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 05 Jan 2026 04:40 PM (IST)

    05 Jan 2026 04:40 PM (IST)

    ना धोक्याची सूचना ना सुरक्षा व्यवस्था? । अतिधोकादायक इमारत पाडकामात हलगर्जीपणाचा आरोप

    विरारमध्ये अतिधोकादायक घोषित केलेल्या इमारतींचे पाडकाम सुरु आहे. ही इमारत मुख्य रस्त्यालगत असल्याने तेथून जाणाऱ्या नागरिकांना धोका होऊ शकतो. याबाबत नागरिकांना धोक्याची सूचना देणारे फलक लावले नसल्याचा आरोप करण्यात येतोय. हे पाडकाम करताना कंत्राटदाराकडून गंभीर निष्काळजीपणा केल्याचा आरोप होत आहे...

  • 05 Jan 2026 04:35 PM (IST)

    05 Jan 2026 04:35 PM (IST)

    देवरुखमध्ये भाजप नेते प्रशांत यादव यांच्या वाढदिवसाचा बॅनर जाळल्याने संताप

    आज भाजप नेते श्री. प्रशांत यादव यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठिक ठिकाणी त्याना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले असुन भाजपचे तालुका अध्यक्ष श्री. रुपेश कदम यानी मार्लेश्वर फाटा येथे शुभेच्छा देणारा बॅनर लावला होता. मात्र अज्ञातानी तो बॅनर जाळल्याने तालुकाभरातुन संताप व्यक्त होत आहे. सध्या राज्यभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरु असुन पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांचीही तारीख कधीही जाहिर होण्याची शक्यता आहे. नगर पंचायत निवडणुकीत भाजपने राज्यभरात मोठे यश मिळवले असुन राज्यातील महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप चे उमेदवार बिनविरोध निवडुन आले आहेत. अशा स्थितीत बॅनर फाडणे किंवा जाळणे हि घटना अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया रुपेश कदम यांनी दिली आहे.

  • 05 Jan 2026 04:30 PM (IST)

    05 Jan 2026 04:30 PM (IST)

    राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या टीकेला रवींद्र चव्हाणांचे प्रत्युत्तर

    गेल्या काही दिवसांपासून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. रवींद्र चव्हाणांनी महायुतीचा धर्म पाळावा असा सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला होता. त्यावर आता अहिल्यानगरमध्ये रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

  • 05 Jan 2026 04:25 PM (IST)

    05 Jan 2026 04:25 PM (IST)

    मतमोजणी होईपर्यंत बिनविरोध निवड घोषित करू नये । उरण उत्कर्ष समितीचे निवडणूक आयुक्तांना पत्र

    महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीमध्ये ६५ पेक्षा जास्त नगरसेवक बिनविरोध म्हणून घोषित करण्यात आले आहेत. नोटाचा पर्याय असताना बिनविरोध निवड घोषित कशी केली असा सवाल उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी उपस्थित केला आहे. मतमोजणी होईपर्यंत बिनविरोध निवड घोषित करू नये अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाला केली आहे.

  • 05 Jan 2026 04:20 PM (IST)

    05 Jan 2026 04:20 PM (IST)

    छ. संभाजीनगरमध्ये ५ हजारची साडी ५९९ मध्ये, महिलांची उसळली गर्दी परिस्थिती गेली हाताबाहेर. .

    मकरसंक्रांतीनिमित्त साड्यांवरील मोठ्या सवलतींमुळे छत्रपती संभाजीनगरातील आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक परिसरात प्रचंड गर्दी उसळली. पाच हजार रुपयांची साडी अवघ्या ५९९ रुपयांत मिळणार या ऑफरमुळे सुमारे हजार महिलांनी दुकानावर झुंबड घातली. झालेल्या चेंगराचेंगरीत तीन महिला बेशुद्ध पडल्या, तर काही लहान मुले आईपासून ताटातूट झाली. परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांनी हस्तक्षेप करून दुकान तातडीने बंद केले. संभाव्य मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.मात्र दुकानावर गर्दी झाली असल्याने परिस्थिती गेली हाताबाहेर गेली.

  • 05 Jan 2026 04:13 PM (IST)

    05 Jan 2026 04:13 PM (IST)

    चिपळूण कृषी महोत्सवात Ai द्वारे आधुनिक शेतीचे प्रात्यक्षिक

    कृषी महोत्सव मध्ये Ai च्या माध्यमातून छोटे छोटे प्लॉट बनवून आधुनिक शेती उभी करण्यात आली आहे. त्याचा अनुभव शेतकऱ्यांना प्रत्यक्षात पाहायला मिळेल अशी माहिती वाशिष्ठी डेअरी मिल्क चे अध्यक्ष भाजप नेते प्रशांत यादव यांनी माध्यमांशी बोलताना दिली. कृषी महोत्सव मध्ये Ai च्या माध्यमातून छोटे छोटे प्लॉट बनवून आधुनिक शेती उभी करण्यात आली आहे. त्याचा अनुभव शेतकऱ्यांना प्रत्यक्षात पाहायला मिळेल, अशी माहिती वाशिष्ठी डेअरी मिल्कचे अध्यक्ष भाजप नेते प्रशांत यादव यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

  • 05 Jan 2026 03:50 PM (IST)

    05 Jan 2026 03:50 PM (IST)

    प्रेयसी बाबत आक्षेपार्ह टिप्पणीचा राग; दारूच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, 4 जण गंभीर जखमी

    प्रेससीबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावरून झालेल्या वादात एका तरुणाची हत्या केली, तर इतर ४ जण गंभीर जखमी आहेत. ही थरारक घटना कळमना ठाण्यांतर्गत पार्वतीनगरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. तरुणांमध्ये वाढते दारूचे व्यसन आणि त्यातून घडत्त असलेल्या हिंसाचारावर प्रश्न उपस्थित झाले. पोलिसांनी या हत्याकांडात ५ जणांना अटक केली तर अल्पवयीनला ताब्यात घेतले, ऋतिक सावनलाल पटले (२२) रा. पार्वतीनगर, आजरी-माजरी असे मृताचे नाव आहे. अटकेतील आरोपींमध्ये ईशा हातिम अंसारी (५५), त्याची मुले मुस्तफा उर्फ गोलू अंसारी (२८), लुकमान अंसारी (२२), साहिल अंसारी (२०), सलाउद्दिन अंसारी (१९) आणि एका अल्पवयीनचा समावेश आहे. जखमी तनसू शिवप्रसाद नागपुरे (२३), सलीम अंसारी, संगीता नागपुरे आणि शिवप्रसाद नागपुरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 05 Jan 2026 03:45 PM (IST)

    05 Jan 2026 03:45 PM (IST)

    OMG 3 मधून अक्षय कुमारचा पत्ता कट? आता ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री साकारणार देवीची भूमिका

    अक्षय कुमारच्या “ओह माय गॉड” चित्रपटाचे दोन भाग आधीच प्रदर्शित झाले आहेत आणि दोन्ही भागांनी खळबळ उडवून दिली आहे. आता तिसऱ्या भागाची चर्चा सुरू आहे. यात अक्षयसोबत राणी मुखर्जी दिसणार असल्याचे वृत्त आहे, जी देवीच्या भूमिकेत दिसणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत, जे चाहत्यांसाठी आश्चर्यचकित करणारे असेल. मात्र निर्मात्यांनी अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही.

  • 05 Jan 2026 03:40 PM (IST)

    05 Jan 2026 03:40 PM (IST)

    “शिवसेनेला युतीची गरज नाही रायगडमध्ये भगवा फडकणार…”; शिंदे गटातील आमदाराने व्यक्त केला विश्वास

    शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी अलिबागमध्येच नाही तर संपुर्ण जिल्ह्यात चांगले काम केले आहे. आंबेपुर मतदार संघात सातत्यपुर्ण कामांमुळे येथे शिवसेनेचे मताधिक्य दिवसेंदिवस वाढत आहे. हा मतदार संघ राजाभाई केणी यांचा गड असून या मतदार संघात त्यांच्या पत्नी रसिका केणी यांचा निर्विवाद विजय होईल. त्याचबरोबर या मतदार संघाबरोबरच महाड, पोलादपुरमध्ये मंत्री भरतशेट गोगावले, कर्जत खालापूरमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या मोर्चेबांधणीतून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यात कोणीही अडचण येणार नाही. त्यामुळे शिवसेनेला कोणत्याही पक्षाबरोबर युती करण्याची गरज नाही, असा विश्वास अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला आहे.

  • 05 Jan 2026 03:35 PM (IST)

    05 Jan 2026 03:35 PM (IST)

    “जोपर्यंत देवाभाऊ आहे तोवर…”; जालन्यातून मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर सडकून टीका

    राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा रंगसंग्राम सुरू झाला आहे. 15 जानेवारीला मतदान तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जालन्यात त्यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी विकासाचे मुद्दे आणि विरोधकांवर भाष्य केले आहे.

  • 05 Jan 2026 03:30 PM (IST)

    05 Jan 2026 03:30 PM (IST)

    मानेवर हात अन् मग… अ‍ॅशेस मालिकेत वातावरण तापलं! स्टोक्स लाबुशेन यांच्यात बाचाबाची! अवघ्या दोन मिनिटांत दाखवले खरे दाखवले रंग

    ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये अ‍ॅशेसची लढाई कशी होऊ शकते आणि मैदानावर कोणताही सामना होत नाही? सिडनीमध्ये खेळल्या जाणाऱ्या ५ व्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी प्रचंड गोंधळ उडाला. ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेन हा अनेकदा विरोधी खेळाडूंना चिथावणी देण्यासाठी ओळखला जातो. यावेळीही त्याने तेच केले. असो, ऑस्ट्रेलियन संघ अ‍ॅशेस मालिकेत ३-१ ने आघाडीवर आहे आणि त्यामुळेच कांगारूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लॅबुशेनची इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सशी भांडण झाले आणि त्यानंतर मैदानावर दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

  • 05 Jan 2026 03:25 PM (IST)

    05 Jan 2026 03:25 PM (IST)

    धुळ्यात तुफान दगडफेक आणि गोळीबार! शीख धर्मियांच्या दोन गटात तुफान राडा, कारण काय?

    धुळे शहर हे डगफेक आणि गोळीबाराच्या घटनेने हादरून गेल आहे. शीख धर्माच्या दोन गटात तुफान राडा झाला आहे. गुरुद्वारा परिसरातच ही घटना घडली आहे. दगडफेक करतानाच गोळीबार सुद्धा त्या परिसरात झाला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्याला कारण होत ते म्हणजे गुरुगोविंद सिंग यांची जयंती साजरी होणार होती. काही दिवसांपूर्वी गुरुद्वाराचा उत्तर अधिकार कोण नेमायचं यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र त्यासाठी पंजाब वरून एक समिती आली होती. त्या नुसार उत्तर अधिकारी नेमला जाणार अशी चर्चा होती.

  • 05 Jan 2026 03:20 PM (IST)

    05 Jan 2026 03:20 PM (IST)

    मटक्यावर मृत्यूचा संदेश अन् भुताटकी आणि जादूटोणा…; स्थानिक रहिवाशांमध्ये पसरली भीती; नेमकं प्रकरण काय?

    सडा, रांगोळी टाकून एका मटक्यावर मृत्यूचा संदेश देणारा मजकूर लिहून अगरबत्ती, लिंबू, मीठ, कुंकू वाहून पूजा करून करणी, भानामती, भुताटकी आणि जादूटोणा केल्यासारखा प्रकार उघडकीस आला. यामुळे बजाजनगर परिसरात रविवारी खळबळ उडाली. दरम्यान, अशा घटना, अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे.

  • 05 Jan 2026 03:15 PM (IST)

    05 Jan 2026 03:15 PM (IST)

    धर्मेंद्रजींच्या निधनानंतर का ठेवल्या वेगळ्या शोकसभा? अखेर हेमा मालिनींनी सोडले मौन; म्हणाल्या, ‘हा आमचा वैयक्तिक प्रश्न…’

    गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले. श्वसनाच्या त्रासानंतर अभिनेत्याला ऑक्टोबरच्या अखेरीस मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर, देओल कुटुंब, सनी आणि बॉबी आणि त्यांची आई प्रकाश कौर यांनी २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये प्रार्थना सभा आयोजित केली. त्याच दिवशी, हेमा मालिनी यांनी त्यांच्या मुंबईतील घरी पूजा आणि भजनाचे आयोजन केले. हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली, ईशा आणि अहाना, देओल कुटुंबाच्या प्रार्थना सभेला उपस्थित नव्हत्या. आता धर्मेंद्र यांच्या निधनानंतर वेगवगेळ्या ठेवल्या गेलेल्या शोकसभेबद्दल हेमा मालिनी यांनी आपले मत मांडले आहे.

  • 05 Jan 2026 03:10 PM (IST)

    05 Jan 2026 03:10 PM (IST)

    नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध? ISIच्या हेरगिरी नेटवर्कबद्दल थरारक खुलासा उघड

    भारतीय गुप्तचर यंत्रणांनी (Intelligence Agencies) पाकिस्तानच्या नापाक इराद्यांबाबत एक अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. सीमेवरून दहशतवादी पाठवण्यात वारंवार अपयश आल्यानंतर आता पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ (ISI) भारतामध्ये ‘अंतर्गत अस्थिरता’ निर्माण करण्यासाठी नवीन रणनीतीवर काम करत आहे. बांगलादेश आणि नेपाळमध्ये ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर निदर्शने घडवून सत्तांतर किंवा अराजकता निर्माण करण्यात आली, तसाच प्रयोग भारतात करण्याचा कट रचला जात असल्याचे पुरावे समोर आले आहेत.

  • 05 Jan 2026 03:00 PM (IST)

    05 Jan 2026 03:00 PM (IST)

    भाजप-शिंदेसेना की ठाकरे बंधू.., मुंबईकरांचा कल कुणाकडे? सर्वेतून धक्कादायक माहिती समोर

    राज्यातील मिनी विधानसभा निवडणुकांची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. आजपासून मुंबईत ठाकरे बंधुंच्या प्रचारसभांना सुरूवात होणार आहे.यंदाच्या महापालिका निवडणुका ठाकरे बंधुंसाठी अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. तर दुसरीकडे, यावेळी मुंबईत कोणत्याही परिस्थितीत भाजपचीच एकहाती सत्ता आणायची आणि भाजपचाच महापौर बसवायचा, असा निर्धार केला आहे. त्यामुळे निवडणुकांची चुरस वाढत चालली आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत मराठी मतदारांसोबच अमराठी मतदारांनाही आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे.

  • 05 Jan 2026 02:50 PM (IST)

    05 Jan 2026 02:50 PM (IST)

    इराणमध्ये Gen Z आंदोलन उफाळलं; सुरक्षा दलाच्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू

    तेहरान : इराणमध्ये गेल्या एका आठवड्‌यापेक्षा जास्त काळापासून सुरू असलेले आंदोलन दडपण्यासाठी सरकारी यंत्रणेने क्रूर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड’ ने पश्चिम इराणमध्ये आंदोलकांवर गोळीबार केला असून, यामध्ये किमान ४ जणांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये वाढती महागाई आणि चलनाची घसरण यांविरोधात जेन-झी तरुण निदर्शने करत आहेत. २०२२-२३ नंतरचे हे इराणमधील सर्वात मोठे आंदोलन असल्याचे म्हटले जात आहे. सरकारी यंत्रणेच्या या कारवाईत ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहांचे फुटेजही व्हायरल होत आहे.

  • 05 Jan 2026 02:45 PM (IST)

    05 Jan 2026 02:45 PM (IST)

    भाजप-शिंदेसेना की ठाकरे बंधू.., मुंबईकरांचा कल कुणाकडे?

    राज्यातील मिनी विधानसभा निवडणुकांची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. आजपासून मुंबईत ठाकरे बंधुंच्या प्रचारसभांना सुरूवात होणार आहे.यंदाच्या महापालिका निवडणुका ठाकरे बंधुंसाठी अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. तर दुसरीकडे, यावेळी मुंबईत कोणत्याही परिस्थितीत भाजपचीच एकहाती सत्ता आणायची आणि भाजपचाच महापौर बसवायचा, असा निर्धार केला आहे. त्यामुळे निवडणुकांची चुरस वाढत चालली आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत मराठी मतदारांसोबच अमराठी मतदारांनाही आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे.

  • 05 Jan 2026 02:37 PM (IST)

    05 Jan 2026 02:37 PM (IST)

    नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध?

    भारतीय गुप्तचर यंत्रणांनी (Intelligence Agencies) पाकिस्तानच्या नापाक इराद्यांबाबत एक अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. सीमेवरून दहशतवादी पाठवण्यात वारंवार अपयश आल्यानंतर आता पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ (ISI) भारतामध्ये ‘अंतर्गत अस्थिरता’ निर्माण करण्यासाठी नवीन रणनीतीवर काम करत आहे. बांगलादेश आणि नेपाळमध्ये ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर निदर्शने घडवून सत्तांतर किंवा अराजकता निर्माण करण्यात आली, तसाच प्रयोग भारतात करण्याचा कट रचला जात असल्याचे पुरावे समोर आले आहेत.

  • 05 Jan 2026 02:35 PM (IST)

    05 Jan 2026 02:35 PM (IST)

    पडीक जमिनीवर उगवलं हिरवंगार सोनं; नापीक 30 गुंठेक्षेत्रात सेंद्रिय खतावर केली शेतीची वाढ

    दगड धोंड्यांनीच भरलेल्या माळरानावर बिऊर-शांतिनगर येथील प्रगतशील शेतकरी मानसिंग शिवाजी पाटील या शेतकऱ्यानं पावट्याचं हिरवं सोनं पिकवून सगळ्यांनाच थक्क केले आहे. आज जेव्हाहवामानात बदल, शेतीचावाढता खर्च, शेतकऱ्यांना हतबल करतआहे.अशा वेळेत मानसिंगपाटील व त्यांच्या पत्नी अनिता पाटील यादांपत्याने वडिलोपार्जित देशी बियाण्यांवरविश्वास ठेवून आपल्या रानामध्ये 30 गुंठेक्षेत्रात पावट्याची शेती केली आहे.

  • 05 Jan 2026 02:30 PM (IST)

    05 Jan 2026 02:30 PM (IST)

    जिंकण्यासाठी साम,दाम.दंड,भेद…! ठाकरेंच्या उमेदवाराला पोलीस घेऊन एकनाथ शिंदेंच्या घरी

    राज्यातील 29 पालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी केलेल्या अथक प्रयत्नांवरही टीका करण्यात आली. त्याचबरोबर अनेक उमेदवार हे बिनविरोध निवडून आल्याने चिंता देखील व्यक्त करण्यात आली. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यातून 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. यानंतर आता ठाकरे गटाच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेंकडे घेऊन जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

  • 05 Jan 2026 02:23 PM (IST)

    05 Jan 2026 02:23 PM (IST)

    वरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! “पराभव समोर दिसत असल्याने…”

    राज्यभरात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मोठे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. मुंबई महानगरपालिकेची रखडलेली निवडणूक सुमारे चार वर्षांनंतर होत असून राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच, उमेदवारी नाकारण्यात आलेल्या काही कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पक्षातील वरिष्ठांनी एकमत करून काही आक्षेपार्ह अर्ज मागे घेतले. मात्र अद्यापही त्यांच्यातील नाराजी पूर्णपण संपलेली नाही. निवडणुकीत काही उमेदवार पहिल्यांदाच स्वतंत्र उमेदवार म्हणून आखाड्यात उतरले आहेत.

  • 05 Jan 2026 02:16 PM (IST)

    05 Jan 2026 02:16 PM (IST)

    ‘इराक ते व्हेनेझुएला…’अमेरिकेचा युद्ध घडवण्याचा डर्टी गेम

    जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेने गेल्या काही दशकांत ‘लोकशाही’ आणि ‘सुरक्षेच्या’ नावाखाली अनेक देशांचे नकाशे बदलले आहेत. नुकत्याच व्हेनेझुएलामध्ये करण्यात आलेल्या धडाकेबाज लष्करी कारवाईत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांना अटक केल्यानंतर, अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा हा अस्वस्थ करणारा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे. ‘काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिस’ (CRS) या सरकारी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून, अमेरिकेने केवळ गेल्या ३५ वर्षांत तब्बल २५१ वेळा इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये लष्करी बळाचा वापर केल्याचे समोर आले आहे.

  • 05 Jan 2026 02:11 PM (IST)

    05 Jan 2026 02:11 PM (IST)

    “पैसे बुडवणाऱ्या निर्मात्यांना BLACKLIST…” आस्ताद काळेचा संताप; मराठी इंडस्ट्रीतील काळं वास्तव उघड

    मराठी मनोरंजनसृष्टीत मानधनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काही निर्मात्यांनी मानधन थकवल्याची तक्रार केली होती. मराठी मनोरंजनसृष्टीत लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरने अलिकडेच एक पोस्ट शेअर केली होती. आता अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. शशांकची पोस्ट पाहून अनेक कलाकारांनी मानधन थकवणाऱ्या निर्मात्यांविरोधात आवाज उठवला सुरूवात केली आहे. ”पाच वर्ष झाली.. पैसे मिळाले नाहीयेत, आता कुंडली सकट सविस्तर व्हिडिओ शेअर करेन” अशी पोस्ट शशांकने केली होती.

  • 05 Jan 2026 02:06 PM (IST)

    05 Jan 2026 02:06 PM (IST)

    धर्मेंद्रजींच्या निधनानंतर का ठेवल्या वेगळ्या शोकसभा? अखेर हेमा मालिनींनी सोडले मौन

    गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले. श्वसनाच्या त्रासानंतर अभिनेत्याला ऑक्टोबरच्या अखेरीस मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर, देओल कुटुंब, सनी आणि बॉबी आणि त्यांची आई प्रकाश कौर यांनी २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये प्रार्थना सभा आयोजित केली. त्याच दिवशी, हेमा मालिनी यांनी त्यांच्या मुंबईतील घरी पूजा आणि भजनाचे आयोजन केले. हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली, ईशा आणि अहाना, देओल कुटुंबाच्या प्रार्थना सभेला उपस्थित नव्हत्या. आता धर्मेंद्र यांच्या निधनानंतर वेगवगेळ्या ठेवल्या गेलेल्या शोकसभेबद्दल हेमा मालिनी यांनी आपले मत मांडले आहे.

  • 05 Jan 2026 01:55 PM (IST)

    05 Jan 2026 01:55 PM (IST)

    कलमा पठण करणारी मुस्लिम महिलाच मुंबईची महापौर होणार…; AIMIM नेत्याचा दावा

    राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून जोरदार प्रचार सुरु आहे. मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मागील 25 वर्षांच्या सत्ता कायम राखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने मनसेसोबत युती केली आहे. मात्र मुंबईचा महापौर कोण होणार यावरुन राजकारण तापले आहे. मुंबईचा महापौर हा मराठी झाला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. मराठीच महापौर होणार असा दावा मनसे-शिवसेना युतीने केला आहे. तर महापौर हा हिंदू होणार असा दावा भाजपने (BJP Politics) केला आहे.

  • 05 Jan 2026 01:50 PM (IST)

    05 Jan 2026 01:50 PM (IST)

    AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

    सध्या प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर केला जात आहे. अगदी शाळा, कॉलेज, ऑफीसपासून मोठ्या कंपन्यांमध्ये देखील एआय वापरला जात आहे. एवढंच नाही तर रोजच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी देखील एआयचा वापर केला जातो. एआयने आपलं जीवन पूर्णपणे बदललं आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये देखील एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सर्वांसोबतच आता शेतीच्या कामांमध्ये देखील एआयचा वापर केला जाणार आहे. हवामानाचा अंदाज मिळवण्यासाठी शेतकरी एआयचा वापर करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे आणि पिकांचे नुकसान देखील होणार नाही.

  • 05 Jan 2026 01:45 PM (IST)

    05 Jan 2026 01:45 PM (IST)

    जय शाह बांग्लादेशच्या मागण्या पूर्ण करतील का? आयसीसीच्या निर्णयापूर्वी महत्त्वाची अपडेट

    २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीच्या एक महिना आधी, भारत-बांगलादेश वाद वाढत चालला आहे. दोन्ही देशांमधील राजकीय परिस्थितीचा आता क्रिकेटवर परिणाम होत आहे. २०२६ च्या आयपीएलमधून बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला वगळण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयानंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने टी-२० विश्वचषकासाठी भारतात जाण्यास नकार दिला आहे आणि आयसीसीला त्यांचे सामने स्थलांतरित करण्याची विनंती केली आहे.

  • 05 Jan 2026 01:40 PM (IST)

    05 Jan 2026 01:40 PM (IST)

    सरकारी भरती आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

    सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकर भरती प्रक्रियेतील आरक्षणाबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे. खुल्या प्रवर्गातील जागांवर SC, ST, OBC तसेच अन्य आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनाही गुणांच्या आधारे तितकाच अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांना केवळ त्यांच्या आरक्षित प्रवर्गापुरते मर्यादित करता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. खुल्या प्रवर्गाचा कोटा हा कोणत्याही विशिष्ट प्रवर्गासाठी आरक्षित नसून तो सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी खुला असतो, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

  • 05 Jan 2026 01:30 PM (IST)

    05 Jan 2026 01:30 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये प्रचाराचा धुराळा; प्रभाग २६ मध्ये जनतेचा सारिका गणेश कस्पटे यांना वाढता प्रतिसाद

    राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections) रणधुमाळी रंगली आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. 29 पालिकांसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर राजकीय पक्षांचा (Political News) जोरदार प्रचार सुरु आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी युती असून राजकारण रंगले आहे.

  • 05 Jan 2026 01:20 PM (IST)

    05 Jan 2026 01:20 PM (IST)

    व्हेनेझुएला बनली युद्धभूमी! 32 क्युबन सैनिकांचा बळी घेतल्यावर Trumpचा ‘व्हिक्टरी’ मेसेज

    व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो ( Nicolas Maduro) यांना अटक करण्यासाठी अमेरिकेने केलेल्या धडाकेबाज लष्करी कारवाईचे पडसाद आता संपूर्ण जगात उमटत आहेत. या कारवाईत केवळ मादुरो यांनाच अटक करण्यात आली नाही, तर त्यांच्या संरक्षणासाठी तैनात असलेले क्युबाचे ३२ लष्करी आणि पोलीस अधिकारी ठार झाले आहेत. क्युबन सरकारने रविवारी (४ जानेवारी २०२६) अधिकृतपणे या मृत्यूची पुष्टी केली असून, या घटनेमुळे लॅटिन अमेरिकेत तणाव शिगेला पोहोचला आहे.

  • 05 Jan 2026 01:15 PM (IST)

    05 Jan 2026 01:15 PM (IST)

    संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक

    जर तुम्ही नवीन वर्षाच्या उत्साहात काही खरेदी करायचे विसरला असाल तर चिंता करू नका. कारण ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर या वर्षातील पहिला सेल सुरु झाला आहे. फ्लिपकार्टवर बिग बचत सेल 2026 सुरु आहे. हा सेल 2 जानेवारीपासून वेबसाईटवर लाईव्ह झाला आहे. हा कंपनीचा या वर्षातील पहिला सेल आहे. कंपनीच्या या सेलमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायंसेज आणि फर्नीचरसारख्या विविध वस्तूंच्या खरेदीवर मोठ्या ऑफर्स आणि डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला अत्यंत कमी किंमतीत या सर्व वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

  • 05 Jan 2026 12:02 PM (IST)

    05 Jan 2026 12:02 PM (IST)

    कलमा पठण करणारी मुस्लिम महिलाच मुंबईची महापाैर - वारिस पठाण

    मुंबई महापालिकेचा महापौर मराठी होणार की अमराठी यावरुन जोरदार वाद निर्माण झाला आहे. यामध्ये आता वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद चिघळला आहे. वारिस पठाण यांनी म्हटले की, जर मुस्लिम राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश होऊ शकतो, तर मग एक मुस्लिम महिला महापौर का नाही होऊ शकत? धारावीतील एका सभेला संबोधित करताना वारिस पठाण म्हणाले की, हे विधान संविधान आणि लोकशाही या दोन्हींच्या विरोधात आहे. आमचे एक स्वप्न आहे की, एक दिवस कलमा पठण करणारी मुस्लिम महिला मुंबईची महापौर बनेल.

     

  • 05 Jan 2026 11:55 AM (IST)

    05 Jan 2026 11:55 AM (IST)

    सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री फडणवीस

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या रोड शोला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या गर्दीवरुन एक गोष्ट स्पष्ट होते की महानगरपालिकेच्या निवडणुकीत अमरावतीमध्ये भाजपला पूर्ण बहुमत आहे. तसेच सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे ठामपणे सांगितले. पायाभूत सुविधा मजबूत करणे, नागरी सोयी-सुविधा सुधारणा आणि शहराच्या विकासाला गती देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • 05 Jan 2026 11:45 AM (IST)

    05 Jan 2026 11:45 AM (IST)

    मशाल आणि इंजिनची यांच्या मनामध्ये भीती - खासदार राऊत

    महायुतीवर निशाणा साधताना खासदार संजय राऊत म्हणाले की, तुम्ही आमचा पक्ष चोरलात, चिन्ह चोरले तरी आम्ही खंबीरपणे लढतोय. पण आता तुम्हाला मशाल आणि इंजिनची इतकी भीती वाटू लागली आहे की, समोरच्या उमेदवाराने निवडणूक लढवूच नये यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. हा सर्व प्रकार तुम्ही आम्हाला घाबरला आहात हेच सिद्ध करतो. १०-१५ हजार रुपये वाटून किंवा उमेदवार पळवून मुंबई-ठाण्यातील मतदारांचे मत परिवर्तन होईल, हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम आहे. लोकांच्या मनात या गलिच्छ राजकारणाबद्दल प्रचंड चीड आहे आणि ही चीड मतपेटीतून नक्कीच बाहेर येईल, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

  • 05 Jan 2026 11:35 AM (IST)

    05 Jan 2026 11:35 AM (IST)

    सोमनाथ मंदिरावरील हल्ल्याला १००० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींचा लेख

    गुजरातमधील सोमनाथ मंदिरावरील हल्ल्याच्या १००० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी एक लेख लिहिला आहे. त्यांच्या लेखात, पंतप्रधान मोदींनी महमूद गझनवीच्या हल्ल्याचे वर्णन इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना म्हणून केले आहे. लेखात, पंतप्रधानांनी असेही नमूद केले आहे की तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू मंदिराच्या पुनर्बांधणीवर नाराज होते.

  • 05 Jan 2026 11:25 AM (IST)

    05 Jan 2026 11:25 AM (IST)

    राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम

    मुंबईत प्रचंड प्रदूषण वाढले असून श्वास घेणेही घातक बनले. सायंकाळच्यावेळी विशेष: मुंबईतील प्रदूषणात वाढ होत आहे. महापालिकेकडून प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केली जात असल्याचा दावा केला जातोय. मात्र, प्रत्यक्षात प्रदूषण वाढतच चाललंय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असून थंडीची लाट येण्याची शक्यता आहे

  • 05 Jan 2026 11:15 AM (IST)

    05 Jan 2026 11:15 AM (IST)

    निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जाणार - सुजात आंबेडकर

    सुजात आंबेडकरांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, “महापालिका निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जाणार. प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डील झालीये. आपल्या विरोधात भाजप आहे आणि आरएसएस जर निवडणूक लढवत असती तर त्यांना तिकडेही हरवलं असतं.आपल्या विरोधात भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूला ही भाजपच आहे. कारण प्रणिती शिंदे ह्या भाजपसाठी काम करतात हे सर्वांना माहितीये, असा दावा सुजात आंबेडकर यांनी केला आहे.

  • 05 Jan 2026 11:05 AM (IST)

    05 Jan 2026 11:05 AM (IST)

    पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आज वाढदिवस

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म राजधानी कोलकात्यात ५ जानेवारी १९५५ रोजी झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. ममता बॅनर्जी महाविद्यालयात असल्यापासून राजकारणात पाऊल ठेवलं. त्यांनी काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर स्वत:चा तृणमूल काँग्रेस पक्ष स्थापन केला. पश्चिम बंगालमधील डाव्यांची ३ दशकांपासूनची सत्ता उलथवून टाकत त्या मुख्यमंत्री झाल्या. विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रिय असलेल्या ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कामाच्या, नेतृत्त्व गुणांच्या जोरावर त्यांनी राजकारणामध्ये आपली वेगळी निर्माण केली आहे.

  • 05 Jan 2026 10:59 AM (IST)

    05 Jan 2026 10:59 AM (IST)

    उमर खालिद व शरजील इमाम यांना जामीन मिळणार

    मागील पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असलेले विद्यार्थी कार्यकर्ते उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या जामीन अर्जांवर सर्वोच्च न्यायालय ५ जानेवारी रोजी निकाल देणार आहे. या प्रकरणातील कथित कट रचणाऱ्या आरोपींच्या जामीन अर्जांवर सोमवारी सुनावणी होत असून इतर पाच आरोपींच्या अर्जांवरही निर्णय अपेक्षित आहे.

  • 05 Jan 2026 10:51 AM (IST)

    05 Jan 2026 10:51 AM (IST)

    घरात मोबाईल, बाहेर मृतदेह!

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. घडलेल्या घटनेमुळे जिल्ह्यातच नाही तर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. वैजापूर येथील ४८ वर्षीय पोलीस नाईकांची हत्या करून मृतदेह त्याच्याच घराशेजारील पडीक जागेत पुरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. हत्या झालेल्या पोलीस नाईकाचे नाव नानासाहेब रामजी दिवेकर (वय 48) असे आहे. ते देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांची हत्या का करण्यात आली त्यामागचे कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.

Web Title: Maharashtra marathi breaking news live maharashtra national global updates politics sports stock market business society politics crime social issues politics business more breaking news in marath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • Maharashtra Political News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.