संभाजीनगर हादरले! वर्षभरात १०३ ॲट्रॉसिटी आणि १५५.....; गुन्हेगारीचा आलेख उंचावला (Photo Credit- X)
वर्षभरातील गुन्हेगारी घटनांचा वार्षिक घटनांची माहिती
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गेल्या वर्षभरातील गुन्हेगारी घटनांचा वार्षिक घटनांची माहिती पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी मंगळवारी आयुक्तालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त रत्नकार नवले, सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत, सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर आदींची उपस्थिती होती.
खुनाच्या प्रयत्नात झपाट्याने वाढ
प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या घटना झापाट्याने वाढल्या आहेत. गतवर्षी शहरात एकूण ११७ जणांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. यावर्षी तब्बल २५ गुन्हे वाढले असून हा आकडा १३४ वर पोहचला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस खुनी हल्ला करणाऱ्या गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येते.
२८ खुनाच्या घटना उघडकीस
शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल २८ खूनाच्या घटना समोर आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या १५ ने घटली असून त्यात सर्व २८ गुन्ह्यातील आरोपी उघड झाले आहेत.
महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून बलात्कार सह विनभंगावे गुन्हे वाढले आहेत. गेल्या नऊ महिन्यात बलात्काराचे १५५ गुन्हे दाखल झाले असून गतवर्षापेक्षा ६ ने गुन्हे वाढले आहेत. तर विनयभंगाचे ३९९ गुन्हे दाखल असून त्यात गतवर्षाच्या तुलनेत १० ने गुन्हे वाढले आहेत.
दुचाकी चोरीची संख्या १ हजार ३४ वर
शहरात दुचाकी चोरट्यांनी उच्छांक मांडला असून गतवर्षीपेक्षा १७३ वाढून हा आकडा १ हजार ३४ वर पोहचला आहे. यापैकी २२० घटना उघडकीस आल्या आहेत. तसेच शहरातील १९२ ठिकाणी जबरी चोऱ्या घडल्या आहेत. त्यापैकी १४७ गुन्हे उघडकीस आले आहेत. गत वर्षाच्या तुलनेत जबरी चोरीच्या घटना १७ ने वाढली आहेत.
नायलॉन मांजा : २३ दिवसात १३ गुन्हे, २९ अटक
प्रतिबंधित नायलॉन मांजाचे डिसेंबरमधील २३ दिवसात १३ गुन्हे दाखल करून २३ लाख १५ हजार ५५० रुपये किमतीच्या १ हजार ६८३ भिंगरी-चक्री जप्त करण्यात आले. यातील २९ आरोपींना अटक केल्याची माहितीही त्यांनी दिली.
दलित अत्याचाराचे गुन्ह्यात वाढ
पोलीस आयुक्तालयात गेल्या वर्षभरात दलित अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली असून तब्बल १०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ४५ ने वाढ झाली असून अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत हे गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. हे वाढते गुन्हे चिंतेची बाब बनली असून मागसवर्गियांमध्ये असुरक्षीतेची भावना निर्माण होत आहेत.






