Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon News: महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल मंदावली; पुढील तीन दिवसांत प्रगतीची शक्यता, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट

खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनच्या प्रगतीकडे लागले आहे. अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 11, 2026 | 10:33 AM
Maharashtra Monsoon, IMD Update, Rain Alert, Weather Forecast

Maharashtra Monsoon, IMD Update, Rain Alert, Weather Forecast

Follow Us
Follow Us:

Monsoon News:  देशासह राज्यातील काही भागांमध्ये मान्सूने हजेरी लावली आहे. तळकोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासी मिळाला होता. पण उकाड्यापासून दिलासा देणाऱ्या मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवास सध्या स्थिरावला असून, पुढील तीन दिवसांत तो राज्यातील आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Cockroach Janata Party : कॉक्रोच जनता पार्टीचे आज पुण्यात आंदोलन; ‘या’ मागण्यांसाठी तरुणाई आक्रमक

मान्सूनची वाटचाल कुठपर्यंत?

सोमवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्हे पार करत रत्नागिरी, सातारा आणि सोलापूरपर्यंत जोरदार पाऊसही झाला. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनला सुरूवात झाल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र त्यानंतर पावसाचा वेग मंदावला आहे. सध्या मान्सूनची सीमा रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे, सोलापूर, कर्नाटकातील कलबुर्गी, आंध्र प्रदेशातील नांदयाल, तमिळनाडूतील चेन्नई आणि पश्चिम बंगालमधील सिलिगुरीपर्यंत पोहोचली आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मॉन्सूनपूर्व सरी आणि हलका पाऊस सुरू असला तरी राज्यातील अनेक भाग अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या पडणारा पाऊस हा सातत्यपूर्ण मान्सूनचा नसून पूर्वमोसमी आणि वादळी स्वरूपाचा आहे.

विदर्भासह काही भागांना यलो अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज विदर्भासह राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात  आली आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील काही भागांमध्येही तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय पालघर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील इतर भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.

Maharashtra Politics : राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज; म्हणाले, ‘काही जण कष्ट 

शेतकऱ्यांची मान्सूनकडे नजर

खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनच्या प्रगतीकडे लागले आहे. अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता

दरम्यान, बंगालच्या उपसागरातील अनुकूल परिस्थितीमुळे मान्सूनने संपूर्ण ईशान्य भारत आणि सिक्कीम व्यापले आहे. पश्चिम बंगालच्या हिमालयीन भागातही मान्सून दाखल झाला आहे. मात्र अरबी समुद्रातील अनुकूल वातावरणाचा अभाव असल्याने महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती मंदावल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्रातील आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, संपूर्ण तमिळनाडू तसेच छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. राज्यातील नागरिक आणि शेतकरी आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लक्ष ठेवून आहेत.

 

Web Title: Maharashtra monsoon tracking 2026 imd weather forecast pune mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Maharashtra Monsoon Session
  • Monsoon News

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: राज्यात नुसता धुमाकूळ; तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर…, घाट माथ्यावर मुसळधार
1

Maharashtra Rain Alert: राज्यात नुसता धुमाकूळ; तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर…, घाट माथ्यावर मुसळधार

Maharashtra Rain Alert: अक्षरश: धुवून काढणार! कोकणात अतिमुसळधार तर…; IMD ने दिला ‘हा’ अलर्ट
2

Maharashtra Rain Alert: अक्षरश: धुवून काढणार! कोकणात अतिमुसळधार तर…; IMD ने दिला ‘हा’ अलर्ट

Maharashtra Rain Alert: राज्यावर भीषण संकट! ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस; खडकवासला धरणातून…
3

Maharashtra Rain Alert: राज्यावर भीषण संकट! ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस; खडकवासला धरणातून…

Maharashtra Rain Alert: आनंदी आनंद गडे! पुण्याला झोडपले तर उद्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी अन्…
4

Maharashtra Rain Alert: आनंदी आनंद गडे! पुण्याला झोडपले तर उद्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.