Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Politics: संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश ऐनवेळी रद्द, मुंबईकडे रवाना झालेले कार्यकर्ते परतले; नेमकं कारण काय?

सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचा मुंबईतील भाजप प्रवेश ऐनवेळी पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे तासगाव-कवठेमहांकाळच्या राजकारणात खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आता सांगलीत भव्य सोहळा होणार असल्याचा दावा केला जात आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 29, 2026 | 08:19 PM
संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश ऐनवेळी रद्द (Photo Credit- X)

संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश ऐनवेळी रद्द (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश ऐनवेळी रद्द
  • मुंबईकडे रवाना झालेले कार्यकर्ते परतले
  • नेमकं कारण काय?
सांगली : माजी खासदार संजयकाका पाटील यांचा मंगळवारी मुंबई येथे होणारा भारतीय जनता पक्षातील जाहीर प्रवेश ऐनवेळी रद्द झाल्याने तासगाव-कवठेमहांकाळच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. प्रवेश सोहळ्यासाठी मतदारसंघातून मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झालेल्या कार्यकर्त्यांना अखेर निराश होऊन परतावे लागले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यानुसार कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी प्रवेश सोहळा रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. प्रवेश का रद्द झाला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी पक्षांतर्गत चर्चा, राजकीय समीकरणे किंवा अन्य कारणांमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

सांगली जि.प.मध्ये खातेवाटपावरून वाद; काँग्रेस आक्रमक, ऐनवेळी खात्यांमध्ये मोठा बदल; अखेर लाड यांना शिक्षण-आरोग्य, तर…

दरम्यान, संजयकाका पाटील यांच्या भाजप प्रवेशाकडे जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. हा प्रवेश झाल्यास तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, ऐनवेळी झालेल्या या घडामोडीमुळे पुढील निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, संजयकाका गटाचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांनी सांगितले की, विधानमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर तासगाव येथे भव्य जाहीर कार्यक्रमात संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश व्हावा, अशी विनंती कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मुंबईतील प्रवेश सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

Sangli News: “विजेता कोण हे घोषणा नाही, जनता ठरवते!” गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्याला खासदार विशाल पाटील यांनी सुनावले

Web Title: Sanjaykaka patil bjp entry postponed last minute political drama in sangli tasgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 08:06 PM

Topics:  

  • BJP
  • Sangli
  • sangli news
  • Sangli Politics

संबंधित बातम्या

Sangli News : शिक्षक बँकेच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी करा; जागा खरेदी, इमारत बांधकामासह 10 कोटींच्या खर्चावर प्रश्न
1

Sangli News : शिक्षक बँकेच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी करा; जागा खरेदी, इमारत बांधकामासह 10 कोटींच्या खर्चावर प्रश्न

सांगली शिक्षक बँकेची ७४ वी वार्षिक सभा रविवारी; ५ टक्के लाभांशाची घोषणा, कर्जमर्यादा २० लाखांवर
2

सांगली शिक्षक बँकेची ७४ वी वार्षिक सभा रविवारी; ५ टक्के लाभांशाची घोषणा, कर्जमर्यादा २० लाखांवर

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
3

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.