'आता मुंबईचा महापौरही आमचा असेल'; भाजपच्या तयारीने उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागताच महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईच्या महापौरपदाबाबत विधान करून तसे संकेत दिले आहेत. येत्या काळात मुंबईचा महापौर भाजपचाच असेल, मुंबईत ते आता जिंकू शकत नाहीत हे लक्षात ठेवावं, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
निवडणुकीसंदर्भात बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दारूण पराभव झाला. मात्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे यांना कोणत्याही परिस्थिती जिंकायची आहे. त्यामुळे त्यांनी त्याची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. यासंदर्भात मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत शिवसेनेच्या नेत्यांनी मतं व्यक्त केली आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडूनही याबाबत विचार सुरू असल्याची माहिती आहे.
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले
ठाकरेंच्या बैठकीत स्वबळाची चर्चा झाली, त्याबाबात बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आता मुंबईत भाजपचाच महापौर असेल. मुंबई ते जिंकत नाहीत हे लक्षात ठेवावं. 2017 मध्ये BMC त भाजपचा महापौर बसला असता पण आम्हाला त्यावेळी वातावरण बिघडवायचं नव्हतं. म्हणून काही केलं नाही. पण आता मात्र मुंबईत महापौर भाजपचा असेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
BMC संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ ४६ जागा जिंकता आल्या आहेत. ठाकरे गटाला २० जागा मिळाल्या. या पराभवानंतर आता पक्षात गळती वाढण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे गटानेही ठाकरे गटाचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.
मंगळवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याची बैठक पार पडली. या बैठकीत नेत्यांनी स्वबळाचा सूर होता अशी माहिती आहे. त्याशिवाय भाजपचे नेते अंबादास दानवे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे मनपा निवडणुकीआधी ठाकरे मविआतून बाहेर पडतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे आता नेमकी काय भुमिका घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. येत्या काळात होणाऱ्या स्थानिक संस्थाच्या निवडणुकीत ठाकरे गटाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
स्वबाळाचा नारा नाही पण बैठकीत काहींनी भूमिका मांडल्या. म्हणजे लगेच निर्णय होत नसतो. पण सर्व मतदारसंघात संघटना मजबूत व्हावी असं मत मांडण्यातं आलं आहे. भूमिका मांडली म्हणजे पक्ष लगेच निर्णय घेत नाही. भूमिका मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे, त्यांचं मत जाणून घेतलं जाईल. निवडणुका कोणासोबत लढवायचं हे पक्षप्रमुख ठरवतील. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढलो. एखाद्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत वेगळा निर्णय होऊ शकतो, असे संकेत अंबादास दानवे यांनी दिले आहेत.