(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
मिस युनिव्हर्स २०२५ स्पर्धेच्या जूरी पॅनेलमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. अंतिम फेरीपूर्वी दोन जूरी सदस्यांनी राजीनामा दिला आहे, ज्यामुळे स्पर्धेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जज ओमर हारफूश यांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले की, एका सिक्रेट समितीने इम्प्रॅाम्प्टू ज्युरी बनवली होती. ज्यांनी स्पर्धकांना स्टेजवर येण्याआधीच निवडले होते. अनधिकृत पॅनेलमध्ये असे लोक होते ज्यांचे काही मिस युनिव्हर्स स्पर्धकांशी वैयक्तिक संबंध आहेत, ज्यामुळे हितसंबंधांचा संघर्ष होऊ शकतो. यामध्ये मतमोजणी आणि निकाल व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेल्यांचा देखील समावेश आहे, ज्यामुळे हितसंबंधांचा संघर्ष आणखी वाढतो.’
ओमरने पुढे सांगितले की मिस युनिव्हर्सचे मालक राऊल रोचा यांच्याशी झालेल्या अनादरपूर्ण संभाषणानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे, ते आता मिस युनिव्हर्स २०२५ च्या जजिंग पॅनेलचा भाग नाहीत.
एका मिस युनिव्हर्स स्पर्धकानेही सांगितले की, ओमर यांनी केलेल्या दाव्यात तथ्य आहे. सराव संपल्यानंतर सोशल मीडिया ओपन करताच
समजले की टॉप 30 लिस्ट आधीच तयार झाली होती. हे पाहून खूप वाईट वाटले. जजशिवायच 30 जणींची निवड केली गेली होती. ओमर यांनी प्रामाणिकपणासाठी आवाज उठवला यासाठी तिने आभारही मानले आहेत.
मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन ने ओमरच्या आरोपांचे जोरदारपणे खंडन केले आहे. एका निवेदनात, MUO ने म्हटले आहे की प्रत्येकजण पारदर्शक प्रोटोकॉलचे पालन करतो. शिवाय, MUO ने त्यांना ब्रँडशी संबंधित काम करण्यास आणि त्याचे ट्रेडमार्क वापरण्यास बंदी घातली आहे.






