उद्या वैभव सूर्यवंशी खेळणार? (फोटो- ट्विटर)
मोर्ने मोर्केलची प्रतिक्रिया काय?
आयर्लंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशीला संधी दिली गेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल याने युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याच्या पदार्पणाबाबत आणि संघाच्या रणनीतीबाबत भाष्य केले आहे. यावर बोलताना मोर्ने मोर्केल म्हणाला, मला वाटत नाही यामागे अनेक कारणे आहेत. आपल्याला या गोष्टीचा आदर करावा लागेल की आपल्याकडे अभिषेक शर्मा सारखा नंबर 1 चा फलंदाज आहे. संजू सॅमसनने टी 20 वर्ल्डकप मध्ये आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे खेळाडूंवर विश्वास दर्शवणे आणि कठीण काळात त्यांना सहकारी करणे साथ देणे हाच मॅनेजमेंटचा विचार आहे. वैभव सूर्यवंशी आपला पहिला सामना कधी खेळणार यावर त्याने भाष्य केले नाही.
Vaibhav वर अन्याय करणाऱ्या Shreyas समोर विजयाचे आव्हान
भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहे. मात्र दुसऱ्या सामन्यात देखील गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यरकडून वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. आयर्लंडविरुद्धचे 2 सामने आणि इंग्लंडविरुद्धचा 1 सामना संजू सॅमसन अपयशी ठरला आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात वैभवला स्थान मिळेल, त्याला डेब्यू करण्याची संधी दिली जाईल असे म्हटले जात होते. मात्र वैभवला अद्याप प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
श्रेयस अय्यर कर्णधार झाल्यापासून त्याला एकही सामना जिंकता आलेला नाहीये. आयर्लंडने प्रथमच भारताला 2-0 ने हरवले आहे. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे उद्याचा सामना जिंकण्यासाठी श्रेयस अय्यर आणि भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. मात्र वैभव सूर्यवंशीला भारतीय मॅनेजमेंट डेब्यू करण्याची संधी देणार का हे पहावे लागणार आहे.






