मयुर फडके, मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी (Malegaon Bomb Blast Case) आणखी एक साक्षीदार (Another witness) फितूर (Exonerations) झाल्याचे बुधवारी घोषित करण्यात आले. त्यामुळे आता फितूर साक्षीदारांची संख्या ३७ वर पोहोचली आहे (The number of exonerations witnesses has reached 37).
या साक्षीदाराने राज्य पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला (ATS) दिलेल्या जबाबानुसार, साक्षीदार भोपाळच्या विद्यमान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या एका कथित कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या आणि त्याने ठाकूर यांना ओळखल्याचे म्हटले होते. तथापि, बुधवारी विशेष राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) न्यायाधीशांसमोर त्याची साक्ष नोंदवताना साक्षीदाराने ठाकूर यांना ओळखण्यास नकार दिला. त्यामुळे न्यायालयाने त्याला फितूर घोषित केले.
[read_also content=”भूमिगत मार्ग निविदा प्रक्रिया प्रकरण: एल ॲण्ड टी कंपनीचा उच्च न्यायालयाचा दणका, कंपनीच्या निविदा फेटाळण्याचा MMRDA चा निर्णय योग्य, उच्च न्यायालयाचे निरीक्षण https://www.navarashtra.com/maharashtra/underground-route-tender-process-case-l-and-t-companys-high-court-slap-mmrdas-decision-to-reject-companys-tender-correct-high-courts-observation-nrvb-397594.html”]
२९ सप्टेंबर २००८ मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. सध्या सर्व आरोपी जामीनावर बाहेर आहेत. आरोपीविरुद्ध दहशतवादी कारवाया, गुन्हेगारी कट रचल्याबद्दल आरोप निश्चित केल्यानंतर या खटल्याचा खटला २०१८ मध्ये सुरू झाला. याआतापर्यंत ३०० हून अधिक साक्षीदारांपैकी ३७ साक्षीदार फितूर झाले आहेत.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 10 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-10-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]