संग्रहित फोटो
परभणी : मराठ्यांच्या पोरांची व्यथा आहे. मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. सरकारने निदान त्या लेकराची काळजी करावी. अशी संधी पुन्हा नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा एकत्र येऊ लागला आहे. स्वतःच्या मांडीवर छोटे छोटे लेकरं घेऊन माता माऊली बसल्या होत्या. सरकारला काय झाले माहिती नाही. उपोषणाचे तिसरा दिवस, माता माऊलीच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या.
नोंदी सापडल्या अन् अजून मराठ्यांना आरक्षण नाही
तुम्ही एवढा भीषण हल्ला का केला, याचा उत्तर सरकारला देता आले नाही. सरकारने आता भानावर यावे. एक नऊ वर्षाची मुलगी तिला गोळी लागली. सरकारने आता तरी भानावर यावे. आम्ही मागे हटणार नाही. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मराठ्यांची मागणी नाही. तरीही मराठ्यांना त्रास देणं सुरू आहे. मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या अन् इकडे मराठ्यांना आरक्षण नाही. सरकारने आता तरी भानावर यावे.
मी तुमच्याबरोबरच आहे
तुम्हाला नोटिसी द्यायला होतेय काय, तुम्हाला या गादीवर मराठ्यांनीच बसवले आहे, हे विसरू नका. मुख्यमंत्री साहेबांनी या अगोदर 3 महिने मागितले. आता हटायचे नाही. तुमच्याच जीवावर लढतोय. मी तुमच्याबरोबरच आहे, फक्त तुमची शक्ती कमी होऊ देऊ नका. तुम्ही त्याचे टेन्शनच घेऊ नका. माझ्याकडे मंत्रिमंडळ आले होते, त्यांनी सांगितले आता त्यांच्या विरोधात बोलू नका. म्हटल राहिलं आता बोलत नाही, पण त्यांनी पण आमच्याविरोधात बोलू नये.
आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही
सरकारने या अगोदर वेळ मागितला. ज्यांनी ज्यांनी आरक्षणात सहभाग घेतला, त्यांनी नोकरी मिळवून कामावर रुजू झाले. आरक्षणाचे महत्त्व त्यांना कळाले आहे. आंतरवाली सराटीमधील जखमी महिलांनी सांगितले, आता रक्त गेले आहेच, तर आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही. आता लेकरांना आरक्षण दिल्याशिवाय मागे हटायचे नाही.
मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या
या अगोदर सरकारला 3 महिने वेळ दिला. पुन्हा सरकारचे शिष्ट मंडळ आले, 30 दिवसांचा वेळ मागितला, मराठ्यांनी 40 दिवसांचा वेळ दिला. आधाराशिवाय कायदा करता येत नाही. मराठा समाजाला तुमच्या मागणीप्रमाणे आरक्षण द्यायचे असेल तर आधार लागतो. आता शिंदे समितीला मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. आणखीनसुद्धा सांगतो, तुमच्याकडे 2 दिवस आहेत. तुम्ही जाणूनबुजून मराठ्यांना वाकड्या वाटेला जाऊ देऊ नका. मुंबई आमची नाही का, शेअर मार्केटचा बैल कसा असतो. मंत्री कोणत्या बंगल्यात राहतो, आम्हाला मंत्रालय बघू दे. आमचे जायचेसुद्धा ठरले नाही. मराठ्यांनो येथून तुमच्यासह सगळ्यांना विनंती आहे.