Breaking News Updates Today: खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला
06 Apr 2026 12:30 PM (IST)
कडक उन्हाळा आणि वाढत्या मागणीमुळे पिंपरी- चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. शनिवारी (दि. ४) सकाळी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, धरणात आता केवळ ४६.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जून अखेरपर्यंत म्हणजेच पावसाळ्याच्या आगमनापर्यंत शहराला पुरेल इतकाच असल्याने, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
06 Apr 2026 12:20 PM (IST)
‘शेजारच्या मुलासोबत का बोलतेस’ या शुल्लक कारणावरून सातत्याने मित्राकडून होणारा त्रास तसेच त्याच्या धमक्यांना कंटाळून १७ वर्षीय मुलीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुलीने १७ व्या मजल्यावरून उडी मारल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. साक्षी शिवाजी आवटे (वय १७, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी गोरख सुग्रिव गोरे (वय २१, रा. बालेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत साक्षीच्या भावाने बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली आहे.
06 Apr 2026 12:10 PM (IST)
कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांसमोर असलेल्या व्यापाऱ्यांनी व्याजाने दिलेले ॲडव्हान्सेस, बाजार समितीमधील सौदे, वाहतूक व्यवस्था व सुविधा यासह विविध समस्या आणि आव्हानांवर चर्चा करण्यासाठी नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सभागृहात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आंबा बागायतदार आणि व्यापारी यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. यावेळी व्यापाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवित व्याजाची रक्कम न मागता ॲडव्हान्स रक्कम वसूलीस सहकार्य करण्याचे ठरविले. याबरोबरच कोकणातून येणारा आंबा रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पध्दतीने जिल्हानिहाय वर्गवारी करण्याचे ठरले. महाराष्ट्रातील जिल्हानिहाय किती आंबा बाजार समितीत दाखल झाला याची माहिती दैनंदिन प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी अथवा देवगड हापूस म्हणून बोगस आंब्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी बागायतदार व व्यापाऱ्यांनीही केली.
06 Apr 2026 12:00 PM (IST)
मध्यपूर्वेतील अमेरिका-इराण युद्ध दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामुळे इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मार्गावर कृडक नाकेबंदी केली आहे. ट्रम्प यांनी होर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी इराणला ४८ तास दिले आहेत. परंतु इराणने कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या युद्धजन्य परिस्थितीदरम्यान भारतासाठी एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. भारतीय ध्वज असलेले आणखी एक जहाज सुरक्षितपणे होर्मुझमधून बाहेर पडले आहे.
06 Apr 2026 11:50 AM (IST)
मध्य पूर्वेतील युद्ध अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी उघडून तडजोड करण्याची धमकी दिली आहे आणि तसे न केल्यास मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे.
06 Apr 2026 11:40 AM (IST)
पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) पुरवठ्याच्या विस्ताराचा वेग आतापर्यंतच्या उच्चांकावर आहे. एकाच महिन्यात 8 लाख PNG जोडण्यात आले असून घरगुती मागणीपैकी 100% मागणी पाईपलाईनद्वारे पूर्ण केली जात आहे.
06 Apr 2026 11:40 AM (IST)
नागपूरच्या महादुला येथे मयुरी मेंढे या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. चिठ्ठीत पतीवर प्रेम व्यक्त करत वेदना मांडल्या. पतीकडून मानसिक त्रास झाल्याचा आरोप असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
06 Apr 2026 11:30 AM (IST)
मिठाचा सत्याग्रह हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. ब्रिटिश सरकारने मिठावर कर लावल्यामुळे सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत होता. याविरोधात महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी १२ मार्च १९३० रोजी साबरमती आश्रमातून दांडीपर्यंत पदयात्रा सुरू केली. सुमारे २४० मैलांचा हा प्रवास २४ दिवसांत पूर्ण झाला. ६ एप्रिल १९३० रोजी गांधीजींनी दांडी येथे समुद्राच्या पाण्यातून मीठ तयार करून ब्रिटिश कायद्याचे उल्लंघन केले. या कृतीने संपूर्ण देशात आंदोलनाची ठिणगी पडली.
06 Apr 2026 11:04 AM (IST)
शरद पवार यांनी राज्यसभेत आज पुन्हा एकदा खासदारकीची शपथ घेतली. शरद पवार यांना शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातून आज सात नवनिर्वाचित खासदार राज्यसभेची शपथ घेतील. यात भाजप प्रणित महाविकासआघाडीचे विनोद तावडे, रामदास आठवले, माया चिंतामण ईनवाते, आणि रामराव वडकुते यांचा समावेश आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे या शपथ घेतली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे पार्थ पवार हेदेखील आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार आहेत.
06 Apr 2026 11:00 AM (IST)
बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवारांसाठी खास भावनिक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी बारामतीकरांना आवाहन केले आहे. रोहित पवारांनी लिहिलं आहे की, आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत, असं समजून बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असं आवाहन करतो! असे रोहित पवारांनी लिहिले आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य… pic.twitter.com/wUXsMsQusF
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 6, 2026
06 Apr 2026 10:57 AM (IST)
बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी जय पवार आणि पार्थ पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांनी देवदर्शन केले. त्यांनी गणरायाच्या आशीर्वादाने नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.
#WATCH | Baramati | Maharashtra Deputy CM & NCP leader Sunetra Pawar, along with her two sons, offers prayers at Hanuman Temple, ahead of filing nomination for by-election to Baramati Assembly seat
(Source: NCP) pic.twitter.com/0h2i1Kmr6A
— ANI (@ANI) April 6, 2026
Marathi Breaking news live updates : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यामुळे बारामतीमध्ये भावूक वातावरण तयार झाले आहे. अजित पवारांनंतर बारामतीचा पुढचा दादा कोण होणार यावरुन राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. आज त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यापूर्वी त्यांनी देवदर्शन घेतले आहे. जय पवार आणि पार्थ पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांनी गणरायाचे दर्शन घेऊन नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.






