ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, भारताने प्रथम फलंदाजी केली
Marathi Breaking news live updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द दिल्याचे म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की, भारत वर्षअखेरीस रशियन तेल आयात मोठ्या प्रमाणात कमी करेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की, भारत रशियन तेल आयात टप्प्याटप्प्याने बंद करेल आणि वर्षअखेरीस ती ‘जवळजवळ शून्यावर’ आणेल. तसेच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अॅडलेड येथे होत आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारत ०-१ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. जर भारत अॅडलेडमध्येही हरला तर ते मालिका गमावतील.
23 Oct 2025 05:38 PM (IST)
अमेरिकेत (America) एक भयानक अपघात घडला आहे. अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियात मोठा रस्ता अपघात झाला आहे. एका भारतीयाने अनेकांना ट्रकने (Truck Accident) उडवले आहे. या घटनेचा भयावह व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
23 Oct 2025 05:28 PM (IST)
अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणात नवा कलाटणीबिंदू निर्माण करणारी घटना शनिवारी घडली. महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांच्या कर्जत येथील निवासस्थानी अनपेक्षित सदिच्छा भेट दिली. राजेंद्र फाळके यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या या निर्णयानंतर प्रा. शिंदे यांच्या अचानक भेटीने जिल्ह्यातील राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे.
23 Oct 2025 05:04 PM (IST)
मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी २४ सप्टेंबर रोजी उत्तन, पाली, चौक, तारोडी आणि डोंगरी या पाच गावांचा प्रारूप विकास आराखडा (Draft Development Plan) जाहीर केला होता. या आराखड्यावर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी फक्त ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र, एमआरटीपी कायद्यांतील कलम २६नुसार हा कालावधी ६० दिवसांचा असावा, अशी मागणी ग्रामस्थांनी आयुक्तांकडे केली आली आहे.
23 Oct 2025 04:55 PM (IST)
कर्जत तालुक्यातील क्रांतिकारक यांना १९४३ मध्ये ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबाराचे शिकार ठरल्याने अजरामर झालेल्या मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे दोघांना हौतात्म्य प्राप्त झाले होते.या ऐतिहासिक ठिकाणी क्रांतिकारक भगत मास्तर प्रतिष्ठान कडून दिवाळी सणाच्या निमित्ताने दीपोत्सव साजरा केला जातो. यावर्षी देखील प्रतिष्ठान कडून दीपोत्सव साजरा करण्यासाठी असंख्य देशप्रेमी तरुण सहभागी झाले होते.
23 Oct 2025 04:50 PM (IST)
खेड..खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्त गुरुकुल या अध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या शाळेत पुन्हा एक नवीन वाद निर्माण झाला आहे. या शाळेतील वर्गाचा मॉनिटर असलेल्या विद्यार्थ्यावर इतर विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्गाचा हा मॉनिटर इतर विद्यार्थ्यांचे आपल्या मोबाईल मध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ करून त्यांना ब्लॅकमेल करीत असल्याचा प्रकार उजळत आला आहे, तसेच गुरुकुलातील काही विद्यार्थ्यांना तत्सम पदार्थाचे व्यसन करण्यास देखील हा भाग पाडत होता अशी ही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे एका विद्यार्थ्याच्या पालकांनी ही तक्रार दिल्यानंतर त्या अल्पवयीन मॉनिटरवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या आठवड्यापासून या गुरुकुलाचे प्रमुख कोकरे महाराज यांच्यावर विद्यार्थिनींच्या विनयभंगा प्रकरणी पोस्कोचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
23 Oct 2025 04:45 PM (IST)
कर्जत शहरात पिसाळलेल्या बैलाचा धुमाकूळ घातला आहे.त्याबैलाच्या हल्ल्यात एक ठार, पाच जखमी केले आहे.तर त्या पिसाळलेल्या बैलाला
हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून बैलाला पकडण्यात यश आले आहे.कर्जत शहरातील दहिवली परिसरात पिसाळलेल्या बैलाने दोन दिवस उधळण मांडत नागरिकांवर हल्ले चढवले. या घटनांमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
23 Oct 2025 04:40 PM (IST)
दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या कुणकेश्वर तीर्थक्षेत्री दिवाळी पाडव्यानिमित्त मंदिर कमिटीच्या माध्यमातून आज रात्री मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. तब्बल २१ हजार तेजोमय दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर परिसर उजळून गेल्याचे पाहायला मिळाले. दीपपूजन म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय होय. दीप म्हणजे दिवा हे ज्ञान आणि मांगल्याचे प्रतीक आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे हे या पूजेचे मुख्य महत्त्व आहे. दिव्यांच्या प्रकाशाने घरातील आणि मनातील अंधकार दूर होतो अशी श्रद्धा आहे.
23 Oct 2025 04:35 PM (IST)
राजकारण आणि समाजकारणात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी भाजपच्या वतीने कोकणात विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने महिलांच्या रोजगाराच्या संधी आणि सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. आम्ही आता कोकणापासून सुरुवात करतोय की आपल्या या कोकणातल्या महिला यांना कसा रोजगाराचा मार्ग आपल्यामार्फत, भाजप पक्षामार्फत, कसा उपलब्ध होईल. याच्यासाठी विशाल परब हे स्वतः तळमळीने प्रयत्न करतात आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, पुढच्या वेळेस याच्यापेक्षाही भव्य-दिव्य कार्यक्रम घेतला जाईल अशी अपेक्षा बाळगते. अशी प्रतिकीया वेदिका विशाल परब यांनी व्यक्त केली.
23 Oct 2025 04:30 PM (IST)
दिवाळीच्या उत्साहात सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावात ऐतिहासिक छटा उजळून निघाली आहे. गावातीलअर्जुन गावकर याने आपल्या घराच्या अंगणात किल्ले रायगडाची आकर्षक प्रतिकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.मराठमोळ्या परंपरेचा आणि शिवकालीन वैभवाचा वारसा जपत अर्जुनने अत्यंत बारकाईने हा किल्ला उभारला आहे. भव्य दरवाजे, तटबंदी, राजवाडा, तोफखाना आणि दीपमाळेच्या उजेडात झळकणारा हा किल्ला पाहणाऱ्यांना शिवकाळाचा अभिमान अनुभवास देतो. दिवाळीच्या वातावरणात या उपक्रमामुळे गावात संस्कृती, कला आणि देशभक्तीचा संगम पाहायला मिळतो आहे.
23 Oct 2025 04:25 PM (IST)
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालं.मात्र विमानतळाचं नामकरण स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने करावं, ही मागणी अद्यापही प्रलंबित आहे.या मागणीसाठी स्थानिक भूमिपुत्र आणि आगरी समाजाच्या संघटना विविध पद्धतीने आंदोलन करत आहेत.याच आंदोलनाचा भाग म्हणून आता कल्याणमधील तिसगाव परिसरात “लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई – 36 KM FROM TISGAON” असा फलक लावण्यात आला आहे.
23 Oct 2025 04:20 PM (IST)
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात तिलारी कोनाळकट्टा येथील मुख्य धरणाच्या पुच्छ कालव्याच्या पुलाजवळ एक संशयास्पद चारचाकी आढळून आल्याने तालुक्यात तसेच जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चारचाकी गाडी पूर्णपणे रक्ताने माखलेली असून तिची नंबर प्लेट गायब असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.सदर घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी दाखल होत गाडीचा पंचनामा करून अन्य तपास सुरू आहे. गाडीची नंबर प्लेट नसल्याने गाडी कोणाची हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. किंवा गाडीमध्ये किंवा आसपास कोणी व्यक्ती किंवा मृतदेह आढळून आला नाही. मात्र, रक्ताचे डाग पाहता हा अपघात नसून घातपाताचा संशय अधिक बळकट झाला आहे.
23 Oct 2025 03:57 PM (IST)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याटत तीन सामन्यांची मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा एकदिवसीय सामना अॅडलेड ओव्हल येथे खेळला जात आहे.
23 Oct 2025 03:47 PM (IST)
“बिग बॉस” या रिॲलिटी शोचा दमदार आणि भारदस्त ‘बिग बॉस’चा आवाज सर्वांना आवडतो. हा आवाज “बिग बॉस” चे कथावाचक विजय विक्रम सिंग यांचा आहे.
23 Oct 2025 03:31 PM (IST)
दिवाळी सणातील आज भाऊबीजचा दिवस आहे. यानिमित्ताने बहीण भावाला ओवाळतात. राजकीय वर्तुळामध्ये देखील मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते. राजकारणामध्ये भावा-बहीणीच्या अनेक जोड्या लोकप्रिय आहेत. यामधील एक आमदार चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांची जोडी आहे.
23 Oct 2025 03:14 PM (IST)
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. मात्र, या योजनेच्या माध्यमातून अनेक पुरुषांनी तसेच काही महिलांनी निकषात बसत नसतानाही पैसे घेतल्याचे समोर आले आहे.
23 Oct 2025 02:55 PM (IST)
नागपूर : ‘मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली. आता या योजनेतील घोटाळे समोर येत आहे. पुरूषांनीही लाभ घेतले. योजनेत पारदर्शकता नव्हती. परिणामी, सरकारवर या योजनेमुळे भार पडत आहे. आता अटी-शर्थी घातल्या जात आहे. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्यावर ही योजना बंद होईल. सरकारमधील मंत्री कितीही सांगत असले तरी ही योजना बंद होईल’, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
23 Oct 2025 02:50 PM (IST)
Muralidhar Mohol : पुणे : पुण्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. मात्र त्यापूर्वी महायुतीमध्ये जोरदार वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या विक्री प्रकरणाबाबत आरोप केले जात आहेत. यासंबंधित शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा व्हिडिओ देखील शेअर केला. यामध्ये मुरलीधर मोहोळ हे गोखलेची जाहिरात करत आहेत. यावरुन जोरदार टीका झाल्यानंतर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
23 Oct 2025 02:42 PM (IST)
प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्मा त्याचा नवीन चित्रपट "किस किसको प्यार करूं २" घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यावेळी, गोंधळ दुप्पट होण्याचे आश्वासन दिले आहे. गुरुवारी कपिल शर्माने त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली, जो या वर्षाच्या अखेरीस थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. २३ ऑक्टोबर रोजी कपिल शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. या क्लिपमध्ये संपूर्ण स्टारकास्ट दिसत आहे.
23 Oct 2025 02:30 PM (IST)
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतेच स्वतःचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दिवाळीनिमित्त सईचा हा खास लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहते सोशल मीडियावर आता कौतुकाचा वर्षाव करत आहेत. सई नेहमीच तिच्या फोटोमुळे चर्चेत असते. तसेच सई सोशल मीडियावर जास्त सक्रिय असलेली अभिनेत्री आहे. चला सईच्या या सुंदर फोटोवर एक नजर टाकुयात.
23 Oct 2025 02:24 PM (IST)
सोलापूर : काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजपा पक्षप्रवेशाला दक्षिण सोलापूर तालूक्यातील कार्यकर्त्यांनी विरोध करित पक्ष कार्यालयासमोर ठिय्या मांडला. दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाआधीच पक्षात दुफळी निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे. पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरातील भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन सर्वांचे लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे चार माजी आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत. मात्र आता काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध करण्यात येत आहे.
23 Oct 2025 02:19 PM (IST)
Shocking Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका तरुणीने ताज हॉटेलच्या फाइन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या धक्कादायक अनुभवावरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. श्रद्धा शर्मा असे या तरुणीनेचे नाव असून ती युअर स्टोरी या स्टार्टअपच संस्थापक आहे. तिने ताज हॉटेलमध्ये तिच्यासोबत घडलेला प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
23 Oct 2025 02:15 PM (IST)
हवामानात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम जसा आरोग्यावर दिसून येतो, तसाच परिणाम चेहऱ्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात जास्त बाहेर घराच्या बाहेर फिरल्यामुळे त्वचेवर टॅनिंग वाढू लागते. चेहऱ्यावर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा अधिकच निस्तेज आणि काळी दिसते.चेहऱ्यासोबतच मान, हात खूप जास्त काळी होऊन जाते. याशिवाय काहीवेळा सनस्क्रीन लावून सुद्धा त्वचा काळी होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुपारच्या उन्हात जाणे टाळावे. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि काळे डाग घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण तरीसुद्धा चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होत नाही.
23 Oct 2025 02:10 PM (IST)
IND vs AUS 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना अॅडलेडमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत ९ बाद २६४ धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्माने शांत आणि जबाबदार फलंदाजी करत महत्वपूर्ण ७३ धावांची खेळी केली. या खेळीबरोबर रोहित शर्माने एक विक्रम देखील प्रस्थापित केला ज्यामुळे त्याला भारतीय क्रिकेट इतिहासात एक विशेष स्थान मिळवले आहे. या सामन्यात भारताच्या या दिग्गज फलंदाजाने ऑस्ट्रेलियन भूमीवर एक मोठा टप्पा गाठून इतिहास रचल आहे.
23 Oct 2025 02:07 PM (IST)
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे दोघेही आधी बॉलीवूडमधील पॉवर कपलपैकी एक होते. त्यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले. आणि यानंतर काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला, आणि त्यांच्या चाहत्यांना वाईट वाटले. परंतु आता त्यांचा ब्रेकअप झाला असला तरी ते एकमेकांसाठी चांगले मित्र आहेत हे स्पष्ट दिसून आले आहे. ब्रेकअपनंतरही अर्जुन कठीण काळात मलायकाच्या पाठीशी उभा राहिला दिसला आहे आणि जेव्हा जेव्हा ते भेटतात तेव्हा ते एकमेकांसोबत आनंदी असतात. आज, मलायकाच्या वाढदिवशी अर्जुनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यामुळे त्यांचं मैत्रीचं नातं आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे.
23 Oct 2025 01:55 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू युती करण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडीचा भाग असलेला काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे मुंबई महापालिका लढवणार, अशी भूमिका मुंबईचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी मांडली होती. नंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला.
23 Oct 2025 01:40 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तीव्र संघर्ष सुरु होता. या संघर्षात अनेक दहशतवादी ठार केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. यामध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या (TTP) या दहशतवादी गटाचा प्रमुख नूर वली महसूदला ठार केल्यातचाही दावा करण्यात आला होता. परंतु TTP ने हा दावा फेटाळत महसूद जिवंत असल्याचा व्हिडिओ जारी केला.
23 Oct 2025 01:30 PM (IST)
गेेले काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडला आहे. या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी आणि वादळामुळे मराठवाड्यासह विविध भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला असून बळीराजावर संकट कोसळलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. अशातचं आता पंढरपूर तालुक्यात काही शेतकऱ्यांनी आपल्या झेंडूच्या फुलांना बाजारात कवडीमोल भाव मिळाल्यामुळे संतप्त होऊन ती फुलं थेट रस्त्यावर फेकून दिले आहेत.
23 Oct 2025 01:25 PM (IST)
दक्षिण भारतीय पॉवर कपल राम चरण आणि उपासना कोनिडेला लवकरच दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. या जोडप्याने त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. राम चरण आणि उपासना दुसऱ्यांदा पालक होणार आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. उपासनाने सोशल मीडियावर चाहत्यांना बेबी शॉवरची झलक दाखवली, ज्यामध्ये उपासना आणि राम चरण खूप आनंदी दिसत आहेत.
23 Oct 2025 01:15 PM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यातील दुसरा वनडे सामना अॅडेलमध्ये खेळवला जात आहे. भारतासाठी हा सामना ‘कोर या मरो’ सारखा असणार आहे, कारण भारताला पहिल्या वनडे सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. अश्यातच भारताने आजचा सामना नावावर केला नाही तर मालिकाहा गमवावी लागेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी अमंत्रित केले. भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियामसमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
23 Oct 2025 01:06 PM (IST)
बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी जागावाटपाबाबत सुरू असलेल्या मतभेदांमध्ये, महाआघाडीने आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. महाआघाडीने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी महाआघाडी जिंकल्यास तेजस्वी यादव आणि मुकेश साहनी यांना मुख्यमंत्रीपदाचे आणि उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
23 Oct 2025 12:15 PM (IST)
मीरा भाईंदरमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात तरुणी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. काशिमीरा परिसरात ही घटना घडली आहे. घर बंद असताना गॅस लिकेज झाला होता. तरुणीने दरवाजा उघडून लाईट लावल्यावर झाला स्फोट झाला. यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरु आहे.
23 Oct 2025 12:05 PM (IST)
शिवसेनेचे नेते, मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. दिवाळीची ही सदिच्छा भेट होती. दरवर्षी दिवाळीत मी पवार साहेबांना भेटत असतो, असे सरनाईक यांनी माध्यमांना सांगितले.
23 Oct 2025 12:00 PM (IST)
केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टी (आरव्ही) प्रमुख चिराग पासवान म्हणाले की, "एनडीएचे सर्व मित्रपक्ष सातत्याने प्रचार करत आहेत याचा मला आनंद आणि समाधान आहे. ज्या दिवशी पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरला गेला, त्या दिवशी आम्ही प्रचार सुरू केला. प्रचारातून आमचे आवाज वाढले झाले आहेत. पण महागठबंधनच्या लोकांना अजूनही एसी रूममधून बाहेर पडण्याची गरज वाटली नाही. ते आज त्यांची पहिली पत्रकार परिषद घेत आहेत... अहंकार आणि महत्त्वाकांक्षेमुळे, महागठबंधनच्या मित्रपक्षांनी त्यांच्या युतीचा त्याग केला आहे. आजच्या पत्रकार परिषदेत, त्या संपूर्ण पत्रकार परिषदेत फक्त एकाच माणसाचा चेहरा दिसतो. तुम्ही 'गठबंधन धर्म' पाळत नाही... मला माहित नाही की काँग्रेस हे कसे पाहेल... पण महागठबंधन याची काळजी घेतली पाहिजे... मला विश्वास आहे की आम्ही ऐतिहासिक विजय नोंदवू आणि यावेळी सरकार स्थापन करू..." असा विश्वास चिराग पासवान यांनी व्यक्त केला.
23 Oct 2025 11:54 AM (IST)
मुंबईतील जोगेश्वरी परिसरात एका इमारतीला आग लागली आहे. अग्निशमक दलाचे जवान आगीला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. वरच्या मजल्यावर काही जण अडकले असल्याचे समजते.
23 Oct 2025 11:50 AM (IST)
मुंबईत शहरभर पसरलेल्या प्रदूषणाने मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १३३ वर पोहोचला आहे, जो ‘मध्यम’ श्रेणीत येतो. मात्र, एक्यूआय संकेतस्थळाच्या माहितीनुसार, संपूर्ण मुंबईतील सर्वच प्रमुख ठिकाणची हवा नागरिकांच्या आरोग्यास घातक कॅटेगरीमध्ये आहे. याचा अर्थ शहरातील बहुतांश लोक दूषित हवेत श्वास घेत आहेत.
23 Oct 2025 11:40 AM (IST)
दिल्लीमध्ये दिवाळीच्या निमित्ताने नियमांचे उल्लंघन करुन आतिषबाजी करण्यात आली. यामुळे दिल्लीकरांचा श्वास गुदमरला आहे. यावर उपाय म्हणून प्रदूषण कमी करण्यासाठी, सफदरजंग परिसरात एनडीएमसी (नवी दिल्ली महानगरपालिका परिषद) वाहनाच्या मदतीने पाण्याचा फवारा मारला जात आहे.
#WATCH | Delhi: To mitigate pollution, water being sprinkled with the help of NDMC (New Delhi Municipal Council) vehicle, in the Safdarjung area. pic.twitter.com/nUTsOlUpKf
— ANI (@ANI) October 23, 2025
23 Oct 2025 11:30 AM (IST)
मुंबई महापालिका अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मित्र पक्षाने वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आमच्याकडून आमच्या मित्र पक्षांना, सहकाऱ्यांना अडचणीत येणारी भूमिका घेणार नाही. वक्तव्य करणार नाही. राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांची स्वतंत्र भूमिका आहे आणि त्यांच्यामुळे कोणी वेगळी भूमिका घेत असेल तर तोही त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे, अशी भूमिका खासदार संजय राऊतांनी घेतली.
23 Oct 2025 11:20 AM (IST)
मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम भागातील जेएमएस बिझनेस सेंटरच्या वरच्या मजल्यावर भीषण आग लागली. या मजल्यावर लोक अडकलेले दिसत होते. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग नियंत्रणात आणली.
23 Oct 2025 11:13 AM (IST)
महागठबंधनच्या पत्रकार परिषदेत, राजद नेते मृत्युंजय तिवारी म्हणाले, "बिहारमध्ये तेजस्वी हे एकमेव तेजस्वी आहेत. बिहारच्या लोकांना माहित आहे की ते तेजस्वी यादव यांच्या आश्वासनांवर, हेतूंवर आणि संकल्पावर आधारित मतदान करणार आहेत."
#WATCH पटना: महागठबंधन की प्रेस कॉन्फ्रेंस में राजद नेता मृत्युंजय तिवारी ने कहा, "बिहार में तेजस्वी ही तेजस्वी है। बिहार की जनता जानती है कि वो तेजस्वी यादव के वादों, इरादों और संकल्पों पर वोट करने जा रही है..." pic.twitter.com/PNdFgUyE9e
— ANI_HindiNews (@AHindinews) October 23, 2025
23 Oct 2025 11:02 AM (IST)
आपल्या अदाकारी आणि नृत्याने सर्वांना घायाळ करणाऱ्या मलायका अरोरा हिचा आज वाढदिवस आहे. मलायका अरोरा ही बॉलीवुडची आयटम गर्ल म्हणून ओळखली जाते. मॉडेल, डान्सर, अभिनेत्री आणि दूरचित्रवाणी कलाकार आहे, जी मूळची ठाणे, महाराष्ट्रातील आहे. तिच्या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांमधील नृत्य, जसे की ‘छैय्या छैय्या’ आणि ‘मुन्नी बदनाम हुई’ साठी ती ओळखली जाते. तिला बॉलिवूडमधील एक प्रमुख ‘आयटम गर्ल’ मानले जाते आणि तिच्या फिटनेससाठीही ती प्रसिद्ध आहे.
23 Oct 2025 10:57 AM (IST)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगड जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडणार आहेत. महायुती होणार नाही असे स्पष्ट संकेत शिवसेना नेत्यांनी दिले आहेत. याचदरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेनेने (Shiv Sena) अलिबाग तालुक्यात निवडणुकीच्या तयारीमध्ये मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून विरोधकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ही घोषणा शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजाभाई केणी यांनी केली आहे.
23 Oct 2025 10:50 AM (IST)
हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या दोघांनी त्यांच्या “एक दीवाने की दिवानीयत” या प्रेमकथेला व्यापक प्रेम मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आहेत आणि तो बॉक्स ऑफिसवर आधीच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आधीच चांगली कमाई केली आहे आणि प्रत्येकजण त्यावर लक्ष केंद्रित करत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे आणि आठवड्याच्या शेवटी, दुसऱ्या दिवशीही त्याने चांगली कमाई केली आहे.
23 Oct 2025 10:43 AM (IST)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला. मालिकेत सलग दुसऱ्यांदा विराट कोहली विना धावा बाद झाला. पर्थ वनडेमध्येही तो धावा काढण्यात अपयशी ठरला. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत पहिल्यांदाच विराट कोहली सलग दोन वेळा शून्यावर बाद झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७,००० पेक्षा जास्त धावा आणि ८२ शतके करणाऱ्या विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा कलंक आहे.
23 Oct 2025 10:30 AM (IST)
लिपबाम बनवण्यासाठी सर्वप्रथम, बीटची साल काढून घ्या. त्यानंतर बीटचे लहान लहान तुकडे करा. मिक्सरच्या भांड्यात बारीक तुकडे केलेले बीट टाकून वाटून घ्या. त्यानंतर त्यातील रस काढून घ्या. मोठ्या वाटीमध्ये बीटचा रस, खोबरेल तेल आणि मेण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार करून घेतलेला लिपबाम बंद डब्याच्या झाकणामध्ये भरून फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. ३ ते ४ तासांनंतर लिपबाम तुम्ही वापरू शकता. घरच्या घरी बनवलेले लिपबाम ओठांवर गुलाबी चमक आणेल आणि ओठ सुंदर होण्यास मदत करेल.
23 Oct 2025 10:20 AM (IST)
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, व्यक्ती आपल्या बलाचा वापर करत खडकामध्ये दडवण्यात आलेला दरवाजा ओपन करताना दिसून येतो. दरवाजा खुलताच तो हळूहळू यात जातो. आश्चर्याची बाब म्हणजे, याच्या आत प्राचीन गुहांसारखे लांब बोगदे आणि अनेक अरुंद मार्ग असतात. खडकाच्या आत इतके मोठे जग असेल याचा कुणी विचारही केला नसेल. व्यक्ती जसजसा पुढे जातो, तसतसे त्याला नवीन बोगदे आणि मार्ग दिसू लागतात. हे मार्ग कुणी तयार केले आणि यामागचा हेतू काय ते अद्याप स्पष्ट झाले नाही पण हा व्हिडिओ आत यूजर्सचे लक्ष वेधून घेत आहे.
23 Oct 2025 10:10 AM (IST)
इंस्टाग्रामवर शेअर केलेली ही १० सेकंदांची क्लिप उत्सवाच्या हंगामातील गोंधळाचे चित्रण करते. व्हिडिओमध्ये दिसते की, दोन महिला बर्थवर अडकल्या आहेत आणि खालून लोक महिलांचे केस ओढत त्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रेन डब्यातील साधारण सर्वच पुरुष बंडखोरी करत दोन्ही महिलांवर हल्ला करत असतात जे पाहणे खरोखर फार वाईट असते. संपर्ण डब्यामध्ये गोंधळ माजलेला असतो आणि लोक जास्तीच संतापलेले दिसून येतात. आता परीस्थिती काहीही असो महिलांवर असा अमानुष हल्ला करणं चुकीच आहे आणि यावर अनेक यूजर्सने संताप देखील व्यक्त केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “ट्रेनमध्येच महाभारत सुरू झाले आहे. बिहारच्या लोकांची अवस्था पहा.”
23 Oct 2025 10:00 AM (IST)
वसईच्या ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ल्यावर दीपोत्सवाच्या दिवशी एक अनपेक्षित घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान करून आलेल्या तरूणास फोटो काढण्यास मज्जाव करण्यात आला. तेथे कार्यरत सुरक्षा रक्षकाने त्या तरूणाला हिंदीतून बोलण्यास सांगत तसेच आपल्याला मराठी येत नाही, असे म्हणत उर्मटपणाही दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहेत.
23 Oct 2025 09:55 AM (IST)
मुंबईत चारकोप इथं सेक्टर- 2 मध्ये इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीची घटना घडताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
23 Oct 2025 09:45 AM (IST)
आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे पुन्हा येणार एकत्र येणार आहेत. शिवतीर्थ या ठिकाणी ठाकरे बंधुची भाऊबीज होईल. आज 10 वाजल्यानंतर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे शिवतीर्थ या ठिकाणी एकत्र येणार. बहीण उर्वशी ठाकरे यांच्या सोबत अमित ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे यांची भाऊबीज होणार.
23 Oct 2025 09:39 AM (IST)
सध्या दिवाळी सणामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. त्यामध्येच आता महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. मुंबईत घातपाताच्या कटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाभा अणु संशोधन केंद्राचा बनावट शास्त्रज्ञ असल्याचा बनाव करणाऱ्या अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद या भामट्याला मुंबई गुन्हे शाखेने राष्ट्रीय तपास संस्था आणि गुप्तचर विभागाने संयुक्त कारवाई करत अटक केली.