• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Marathi Breaking News Today Live Updates Add Main Events Date 20 February

Top Marathi News today Live : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Marathi breaking live marathi headlines update Date 20 February : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घ्या एकाच क्लिक वर. राजकारण, क्राईम, स्पोर्ट्स आणि मनोरंजन संबंधित अपडेट मिळवा.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 20, 2025 | 06:52 PM
Top Marathi News today Live

Top Marathi News today Live

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Marathi Breaking news live updates : बीड हत्या प्रकरणामुळे राज्यामध्ये मागील दोन महिन्यांपासून राजकारण रंगले आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे.  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अनैतिक संबंधाच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. सुरेश धस म्हणाले की, सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांना बदनाम करण्याचा प्लॅन आखण्यात आला होता. त्यासाठी कळंबमध्ये एक बाईही तयार ठेवण्यात आली होती. आरोपींनी कळंबमध्ये एक महिला तयार ठेवली होती. तिच्यासोबत काहीतरी झटापट झाल्याचे दाखवायचे आणि संतोष देशमुखांना मारले असे दाखवायचे होते. पण त्या आधीच जीव गेल्याने आरोपींचा प्लॅन अयशस्वी झाल्याचे धस यांनी सांगितले.

The liveblog has ended.
  • 20 Feb 2025 06:24 PM (IST)

    20 Feb 2025 06:24 PM (IST)

    धावत्या लोकल रेल्वेत एका तरुणाकडून तिघांवर चाकू हल्ला

    कल्याणहून दादरला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक खळबळजनक प्रकार घडला. एका तरुणाने डब्यातील तीन प्रवाशांवर अचानक चाकू हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केल्याचे समोर आले आहे.

  • 20 Feb 2025 05:47 PM (IST)

    20 Feb 2025 05:47 PM (IST)

    माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर

    बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरवले. दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर महाराष्ट्राचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी वकिलांमार्फत जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला. शिक्षेच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ॲड. कोकाटे यांनी म्हटले आहे.

  • 20 Feb 2025 05:15 PM (IST)

    20 Feb 2025 05:15 PM (IST)

    दिल्ली मंत्रिमंडळाच्या विभागांचे विभाजन, प्रवेश वर्मा यांना शिक्षण खाते

    दिल्लीच्या नवीन मंत्रिमंडळात मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी गृह, वित्त आणि नियोजन विभागांचा कार्यभार स्वीकारला आहे. प्रवेश वर्मा यांना शिक्षण आणि वाहतूक खाते देण्यात आले आहे. मनजिंदर सिंग सिरसा यांना आरोग्य खाते, रवींद्र कुमार यांना समाज कल्याण खाते, कपिल मिश्रा यांना जल खाते, अशोक सूद यांना महसूल खाते आणि पंकज कुमार सिंग यांना कायदा खाते देण्यात आले.

  • 20 Feb 2025 04:37 PM (IST)

    20 Feb 2025 04:37 PM (IST)

    रोहित शर्माची एक चूक अन् अक्षर पटेलची हॅट्ट्रिक रोखली

    २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या पहिल्याच सामन्यात, भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक चूक केली ज्यामुळे टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलसह भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मन तुटले. दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यात, फिरकी गोलंदाज अक्षर पटेल त्याची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याच्या जवळ होता पण कर्णधार रोहितने एक अतिशय सोपा झेल सोडला आणि अक्षर पटेलला इतिहास रचण्यापासून रोखले.

  • 20 Feb 2025 03:52 PM (IST)

    20 Feb 2025 03:52 PM (IST)

    १२ मार्चला १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर मोर्चा

    शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तिपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीत हाणून पाडणार , तसेच शक्तीपीठ महामार्गाविरोधात  १२ मार्चला १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडली. शाहू स्मारक भवन येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  शेतकऱ्यांनी आमची इंचभर ही जमीन देणार नाही, वाढ वडिलांच्याकडून वारसा हक्काने आलेली जमीन सोडणार नाही, पिकाऊ शेतजमीन ही आमची भूमी आई आहे, अशी शपथ घेतली.

  • 20 Feb 2025 03:35 PM (IST)

    20 Feb 2025 03:35 PM (IST)

    महाकुंभचा शेवटचा आठवडा! प्रयागराजला भाविकांची अलोट गर्दी

    मागील महिन्यापासून उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभमेळ्याची फक्त देशामध्ये नाही तर परदेशामध्ये देखील चर्चा आहे. हा आठवडा हा महाकुंभमेळ्याचा शेवटचा आठवडा असणार आहे. आत्तापर्यंत कोट्यवधी लोकांनी संगम स्नानावर अमृतस्नान केले आहे. शेवटच्या आणि महाशिवरात्रीच्या रात्री भाविकांची मोठी गर्दी संगमस्थळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी योगी सरकार, प्रशासन आणि पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • 20 Feb 2025 03:17 PM (IST)

    20 Feb 2025 03:17 PM (IST)

    अंजली दमानियांवर धनंजय मुंडेंचे टीकास्त्र

    अंजली दमानिया यांनी अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे बोलून जीआर काढला वगैरे म्हणून जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे असून त्या आपल्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे आरोप करत असल्याचा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे. शासनाच्या नियमावलीनुसार ( रुल्स ऑफ बिजनेस ) जीआर अर्थात शासन निर्णय निर्गमित करण्यासाठीची एक पद्धत आहे, त्यासाठी प्रक्रिया आखून देण्यात आलेली आहे, असे म्हणत मुंडेंनी दमानियांच्या आरोपांचं खंडण केलं.

  • 20 Feb 2025 03:05 PM (IST)

    20 Feb 2025 03:05 PM (IST)

    पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर झोपून माजी आमदारांचे आंदोलन

    कर्जत पोलीस ठाण्याच्या बाहेर माजी आमदाराने आंदोलन छेडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माजी आमदार सुरेश लाड यांनी पायरीवर झोपूनच आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन सीमाबंदीच्या कामावर आक्षेप घेत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी करण्यात येत आहे. लाड यांनी आरोप केला आहे की, कोणतेही सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांना दमदाटी करून सीमाबंदीचे काम सुरू आहे. तसेच, शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.सुरेश लाड हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत. खोपोली कर्जत परिसारातील पळसदारी येथे होत असलेल्या कल्पतरु प्रकल्पांत अपंग असलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप माजी आमदार सुरेश लाड यांनी केला आहे.

  • 20 Feb 2025 01:45 PM (IST)

    20 Feb 2025 01:45 PM (IST)

    कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

    राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधु सुनील कोकाटे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास व ५० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर घरकुल घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता.  १९९५ मध्ये तत्कालीन आमदार दिवंगत नेते तुकाराम दिघोळे यांनी केस केली होती. यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

  • 20 Feb 2025 01:23 PM (IST)

    20 Feb 2025 01:23 PM (IST)

    केवळ जरांगेमुळे माझे मताधिक्य कमी - छगन भुजबळ

    विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत भुजबळ म्हणाले की, "मॉक पोल काय आहे ते मला माहिती नाही. काय करायचं ते करा. मी ते वाचलं आहे. मला जर ईव्हीएमचा फायदा मिळाला असता तर मी दीड-दोन लाख मतांनी निवडून आलो असतो. 60 हजार मतांनी मी नेहमीच निवडून आलो. या वेळेला केवळ जरांगेमुळे माझे मताधिक्य कमी झाले. ईव्हीएममध्ये गडबड असती, तर जरांगे येऊ आणि आणखी कोणी येऊ ईव्हीएमने उलटा सुलटा करून मला दीड ते दोन लाख मताधिक्यावर पोहोचवले असतं," असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

  • 20 Feb 2025 01:05 PM (IST)

    20 Feb 2025 01:05 PM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात गोरेगाव पोलिस ठाण्यात धमकीचा ईमेल करण्यात आला असून शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू झाला आहे. यापूर्वी ही एकनाथ शिंदे यांना धमकीचा मेसेज आला होता.

  • 20 Feb 2025 12:56 PM (IST)

    20 Feb 2025 12:56 PM (IST)

    डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारतींवरुन राजकीय संघर्ष

    डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारतींवरील कारवाई आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला आणखी तीव्र वळण मिळाले आहे. एकीकडे शिंदे गटाच्या उपशहर प्रमुख यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांच्यावर हत्येचा कट असल्याचा आरोप केला आहे. तेलगोटे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, "ज्यांच्यावर ४२० सारखे गुन्हे दाखल आहेत, जे तीन वर्षे तुरुंगात राहून आले आहेत, ते आम्हाला शिकवणार का?  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले असल्याचे देखील तेलगोटे म्हणाले आहेत.

  • 20 Feb 2025 12:32 PM (IST)

    20 Feb 2025 12:32 PM (IST)

    २६ वर्षांनंतर दिल्लीत ‘रेखा’पर्वाला सुरुवात

    दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी रेखा गुप्ता यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली, त्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या.

    #WATCH | BJP's first-time MLA Rekha Gupta takes oath as the Chief Minister of Delhi. Lt Governor VK Saxena administers her oath of office.

    With this, Delhi gets its fourth woman CM, after BJP's Sushma Swaraj, Congress' Sheila Dikshit, and AAP's Atishi. pic.twitter.com/bU69pyvD7Y

    — ANI (@ANI) February 20, 2025

    “मी रेखा गुप्ता शपथ घेते की…”, २६ वर्षांनंतर दिल्लीत ‘रेखा’पर्वाला सुरुवात

    Rekha Gupta Swearing-in Ceremony: “मी रेखा गुप्ता शपथ घेते की…”, २६ वर्षांनंतर दिल्लीत ‘रेखा’पर्वाला सुरुवात

  • 20 Feb 2025 12:31 PM (IST)

    20 Feb 2025 12:31 PM (IST)

    केजरीवालांना मात देणाऱ्या प्रवेश वर्मा यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी

    भाजप नेते प्रवेश वर्मा यांनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. प्रवेश वर्मा यांनी आप नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये जोरदार टक्कर दिली. केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा यांना दिल्लीच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे.

  • 20 Feb 2025 12:27 PM (IST)

    20 Feb 2025 12:27 PM (IST)

    रेखा गुुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

    दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूका पार पडल्या असून यामध्ये भाजपचा विजय झाला. 27 वर्षानंतर भाजपला दिल्लीमध्ये सत्ता मिळवण्यामध्ये यश आले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी महिला राज असणार आहे. भाजप नेत्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारली आहे. रामलीला मैदानावर रेखा गुप्ता यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित आहेत.

  • 20 Feb 2025 12:14 PM (IST)

    20 Feb 2025 12:14 PM (IST)

    ...त्यांचे अनुदान बंद केले ही चांगली बाब - केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल

    केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "महाराष्ट्राने बहिणींना दीड हजार रुपये दिले. नवा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्वलंत औद्योगिक विकास करून देश पुढे जाण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार त्यामुळे नक्कीच विकास होईल. जे लोक चुकीचे काम करतात त्यांचे अनुदान बंद केले ही चांगली बाब आहे. खोट्या गोष्टी बोलून लोकांचा दृष्टिकोन बदलण्याचे काम केले जाते. पुढील तीन वर्षात जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असणार देश होणार आहे, याचा आनंद आहे."

  • 20 Feb 2025 12:01 PM (IST)

    20 Feb 2025 12:01 PM (IST)

    रेखा गुप्ता थोड्याच वेळात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

    रेखा गुप्ता दिल्लीतील रामलीला मैदानावर पोहोचल्या आहेत. त्या थोड्याच वेळात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्या दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री असतील.

  • 20 Feb 2025 11:40 AM (IST)

    20 Feb 2025 11:40 AM (IST)

    महाकुंभमेळ्यातील महिलांचे स्नान करताना फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

    महाकुंभमेळ्यातील स्नान करताना महिलांचे खाजगी व्हिडिओ डार्क वेबवर विकले जात आहेत. याप्रकरणावर सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महिलांचे स्नान करताना व कपडे बदलताना व्हिडिओ फोटो व्हायरल करण्यात आले आहेत. या प्रकरणामध्ये उत्तर प्रदेश पोलीस ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. १९ फेब्रुवारी रोजी नोंदवलेल्या दुसऱ्या प्रकरणात, एका टेलिग्राम चॅनलने असेच व्हिडिओ विक्रीसाठी दिल्याचे आढळून आले. या चॅनलविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

  • 20 Feb 2025 11:09 AM (IST)

    20 Feb 2025 11:09 AM (IST)

    परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ST बसमधून प्रवास

    परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर धाराशिव एसटी बसने प्रवास केला आहे. कार्यकर्त्यांसह त्यांनी हा प्रवास करुन बससेवा जाणून घेतली. ‘सर्वसामान्य लोकांच्या काय भावना आहेत, त्यांना कुठल्या समस्याना तोंड द्यावं लागतं याची माहिती मी आगार पाहणी दौऱ्यातून घेतो निश्चितच अनेक एसटी बसेसची अवस्था वाईट आहे, अनेक एसटी सक्रॅप करायच्या आहेत. पण आम्ही पाच हजार नवीन एसटीची मागणी केलीय, सोलापूर धाराशिवसाठी देखील निश्चितच काही बसेस देण्यात येतील, असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

  • 20 Feb 2025 10:54 AM (IST)

    20 Feb 2025 10:54 AM (IST)

    दिल्लीमध्ये पुन्हा एकदा 'महिलाराज'

    दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दिल्लीचा कारभार हा पुन्हा एकदा महिलेच्या हाती येणार आहे.  शालिमार बाग मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेल्या रेखा गुप्ता यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे. रेखा गुप्ता यांच्या मंत्रिमंडळामध्ये परवेश वर्मा (नवी दिल्ली), मनजिंदर सिंग सिरसा (राजौरी गार्डन), रविंद्र कुमार इंद्रज (बवाना), कपिल मिश्रा (करवाल नगर), आशिष सूद (जनकपुरी) आणि पंकज कुमार सिंग (विकासपुरी) या आमदारांचा समावेश होणार आहे.

  • 20 Feb 2025 10:44 AM (IST)

    20 Feb 2025 10:44 AM (IST)

    'Operation Tiger' ची जबाबदारी शिवसेनेच्या 12 मंत्र्यांवर, प्रताप सरनाईक यांची माहिती

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्यात ऑपरेशन टायगर सुरू आहे. या ऑपरेशन टायगरची सर्वात जास्त झळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला बसली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरचा तिसरा टप्पा सुरू असून, त्याची जबाबदारी शिवसेनेतील 12 मंत्र्यांवर असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

  • 20 Feb 2025 10:43 AM (IST)

    20 Feb 2025 10:43 AM (IST)

    शरद पवारांचे पी. ए. तुकाराम भुवाळी यांचे निधन

     

    शरद पवारांचे पी. ए. तुकाराम भुवाळी यांचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे .

  • 20 Feb 2025 10:42 AM (IST)

    20 Feb 2025 10:42 AM (IST)

    पंतप्रधान आवास योजनेतून महाराष्ट्रात २० लाख घरे बांधली जाणार

    यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ या लॉटरीची ऑनलाईन सोडत काढण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "सिडकोच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी लॉटरी असून यात नागरिकांना आपली पसंद नोंदविण्याची मुभा फक्त सिडकोने दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे देण्याची घोषणा केली असून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात घरे देण्याचा विक्रम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सिडकोची ही घरे टाटा, एल.एण्ड टी., शापूरची यांच्या सहभागाने बांधली असल्याने ती अतिशय दर्जेदार असून घरे रेल्वे स्टेशन्स, विमानतळाच्या जवळ असल्याने सामान्यांना त्याचा फायदा होणार आहे.

  • 20 Feb 2025 10:40 AM (IST)

    20 Feb 2025 10:40 AM (IST)

    राज्यात वाढतोय GBS चा धोका

    गेल्या काही दिवसांपासून गुईलेन बॅरे सिंड्राेम अर्थात जीबीएसचा धोका वाढताना दिसत आहे. त्यातच या आजाराने पुण्यात शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. संबंधित तरूणी पुण्यात सिंहगड परिसरात शिकत होती. तिला पाणीपुरी खाल्यानंतर त्रास होऊ लागला होता. त्यानंतर तिची तब्येत खालावली, तिच्यावर बारामतीत रुग्णालयात उपचार सुरु होते. तिचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जीबीएस आजाराचा धोका वाढत असून बळी वाढत चालले आहेत.

Web Title: Marathi breaking news today live updates add main events date 20 february

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • Marathi News
  • Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा
2

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
3

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल
4

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Nov 19, 2025 | 02:35 AM
प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

Nov 19, 2025 | 01:15 AM
Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Nov 18, 2025 | 11:23 PM
शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Nov 18, 2025 | 10:31 PM
जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

Nov 18, 2025 | 10:15 PM
I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

Nov 18, 2025 | 10:13 PM
Mahabharat Katha: शकुनी मामासह कृष्ण खेळला का ‘चौसर’? महाभारताची अद्भुत कथा वाचा

Mahabharat Katha: शकुनी मामासह कृष्ण खेळला का ‘चौसर’? महाभारताची अद्भुत कथा वाचा

Nov 18, 2025 | 09:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.