Top Marathi News Today Live:
14 Oct 2025 03:48 PM (IST)
IND vs WI: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात दूसरा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने दोन सामन्यांची मलिका २-० अशी जिंकली.
14 Oct 2025 03:38 PM (IST)
कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शासकीय व मान्यताप्राप्त शाळांमधील तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
14 Oct 2025 03:30 PM (IST)
बॉलीवूडची फिटनेस आयकॉन मलायका अरोरा तिच्या स्टाईल, डान्स आणि सौंदर्याने नेहमीच चाहत्यांना प्रभावित करते. नुकताच तिने सोशल मीडियावर ‘पॉइजन बेबी’ या गाण्यावर केलेल्या डान्स व्हिडीओने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
14 Oct 2025 03:18 PM (IST)
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने १२ आरोपींची सुटका केली आहे.
14 Oct 2025 03:07 PM (IST)
नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा एका युवकावर धारदार शस्त्राने थरारक हल्ला करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना पंचवटीतील गजानन चौक परिसरातील कोमटी गल्लीत सोमवारी (दि. 13 ऑक्टोबर) दुपारी घडली आहे.
14 Oct 2025 03:02 PM (IST)
गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारने नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील एकतर सरेंडर करा नाही तर सुरक्षा दलांच्या गोळीचे शिकार व्हा असा इशारा नक्षलवाद्यांना दिला आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकार देखील गडचिरोली भागात मोठ्या प्रमाणात विकासकार्य करत आहे. तसेच त्या ठिकाणी त्यांनी नक्षलवाद्यांचा बीमोड केला आहे. दरम्यान आता तब्बल ६१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
14 Oct 2025 02:55 PM (IST)
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) ने फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, अटेंडंट आणि वॉचमन-कम-गार्डनर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना centralbank.bank.in या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा लागेल. अर्जाची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2025 आहे. ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया सोशल अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (CBI-SUAPS) अंतर्गत केली जात आहे.
14 Oct 2025 02:50 PM (IST)
रिअॅलिटी शो ‘राइज अॅन्ड फॉल’ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि फिनालेच्या अगदी आधीच प्रेक्षकांना आणि स्पर्धकांना एक धक्का बसला आहे. शोमध्ये एकाच वेळी दोन लोकप्रिय स्पर्धकांची एक्झिट झाली असून, कीकू शारदा आणि आदित्य नारायण यांना शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. गेल्या एपिसोडमध्ये एलिमिनेशनसाठी कीकू शारदा, आदित्य नारायण, आकृती नेगी आणि नयनदीप रक्षित हे नॉमिनेट झाले होते.
14 Oct 2025 02:45 PM (IST)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाने आपल्या खिशात टाकला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने धूळ चारली. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा २-० असा पराभव करून मलिका जिंकली.
14 Oct 2025 02:40 PM (IST)
कधीकाळी तालिबान सत्तेत आल्यावर पाकिस्तानच्या रस्त्यांवर मिठाई वाटली जात होती. आज तोच तालिबान पाकिस्तानचा सर्वात मोठा शत्रू बनला आहे. एकेकाळी ‘इस्लामी भावंड’ म्हणून ओळखले जाणारे दोन्ही देश आता एकमेकांचा नाश करण्यावर उतरले आहेत.2025 च्या ऑक्टोबरमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर झालेली चकमक आता पूर्ण युद्धात परिवर्तित होत आहे. पाकिस्तानने खोस्त आणि जलालाबाद परिसरात हवाई हल्ले केले, तर तालिबानने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले चढवले. दोन्ही देशांचे सैनिक मारले जात आहेत, आणि सीमारेषा ‘बारूदाच्या रेषा’ बनल्या आहेत.
14 Oct 2025 02:35 PM (IST)
दिल्ली कसोटीतील विजयासह, भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका २-० ने जिंकली आहे. या विजयासह, भारतीय संघाने जवळजवळ एक वर्षानंतर कसोटी मालिका जिंकली आहे. प्रभावी मालिका विजयानंतरही, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर खूप संतापले. त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान माध्यमांवर टीका केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवडीनंतर, माध्यमे आणि चाहते हर्षित राणाच्या जागेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत.
14 Oct 2025 02:30 PM (IST)
बिहार: बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नालंदा जिल्ह्यातील राजगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असलेले एएसआय सुमन तिर्की यांनी मंगळवारी (दि. 14) सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिस दल आणि स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
14 Oct 2025 02:25 PM (IST)
दिवाळी आणि धनत्रयोदशीचा उत्साह सुरू झाला आहे. कपडे, मिठाई, भेटवस्तू आणि सजावटीच्या वस्तूंची खरेदीही सुरू झाली आहे. धनत्रयोदशीसून हा सण सुरू होतो. या दिवशी लोक नवीन वस्तू खरेदी करतात किंवा गुंतवणूक सुरू करतात. जर तुम्हाला या धनतेरसला काय खरेदी करायचे किंवा कुठे गुंतवणूक करायची असा प्रश्न पडत असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी धनतेरसला गुंतवणूक सुरू करण्यासाठी काही पर्याय घेऊन आलो आहोत.
14 Oct 2025 02:20 PM (IST)
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्व पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. दरम्यान भाजपने देखील कंबर कसली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. त्यातच पुण्यातील दौऱ्यात भिडे गुरुजी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे.
14 Oct 2025 02:12 PM (IST)
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्व पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. दरम्यान भाजपने देखील कंबर कसली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. त्यातच पुण्यातील दौऱ्यात भिडे गुरुजी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे.
14 Oct 2025 02:11 PM (IST)
स्मार्टफोन कंपनीने विवोने चीनमध्ये Vivo X300 सीरीज लाँच केली आहे. या स्मार्टफोनसोबतच कंपनीने हलके, दमदार आणि स्टायलिश असे Vivo TWS 5 ईअरबड्स देखील लाँच केले आहेत. या दोन गॅझेट्ससोबतच कंपनीने आणखी एक नवीन गॅझेट लाँच केलं आहे. हे गॅझेट म्हणजे नवं स्मार्टवॉच. कंपनीने चीनमध्ये स्मार्टफोन आणि ईअरबड्ससोबत नवीन स्मार्टवॉच देखील चीनमध्ये लाँच केलं आहे. हे नवीन स्मार्टवॉच Watch GT 2 या नावाने लाँच करण्यात आलं आहे.
14 Oct 2025 01:55 PM (IST)
सलमान खानने आयोजित केलेल्या रिअॅलिटी शोच्या १९ व्या सीझनला सुरुवात होऊन जवळजवळ सात आठवडे उलटले आहेत आणि गेल्या “वीकेंड का वार” मध्ये, मतांच्या अभावामुळे झीशान कादरीला घरातून बाहेर काढण्यात आले. “गँग्स ऑफ वासेपूर” सारखे चित्रपट लिहिणारे झीशान कादरी यांना घराचा मास्टरमाइंड म्हटले जात होते, परंतु राजकारणात घालवणे आणि खेळाचा आदर न करणे हे कदाचित त्याला महागात पडले असेल. घरात, झीशान तान्या, नीलम, शाहबाज, अमाल आणि अलीकडेच मालती चहर यांच्या जवळीक साधत होता. आता, घराबाहेर पडल्यानंतर, त्याने एका मुलाखतीत लोकप्रिय स्पर्धक तान्या मित्तलबद्दल उघडपणे बोलले आहे.
14 Oct 2025 01:50 PM (IST)
उत्तर प्रदेशात आयकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली. आयकर विभागाने संभल जिल्ह्यात मांस व्यापाऱ्यांच्या विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारीची कारवाई केली. आयकर विभागाची चार पथके या कारवाईत सहभागी झाली होती. छापे टाकण्यासाठी 100 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी 70 हून अधिक गाड्यांमध्ये आले.
14 Oct 2025 01:45 PM (IST)
गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील काही निर्णय रद्द केले जात आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनमधील नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहेत. असे असतानाच देवेंद्र फडणीसांनी एकनाथ शिंदे यांचा आणखी एक निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
14 Oct 2025 01:35 PM (IST)
पंढरपूर-आळंदी ते देहू या पालखी मार्गाचे गेल्या अनेक वर्षांपासून काम चालू आहे. मात्र, वाखरी ते पंढरपूर या अंतरामध्ये गेल्या दोन वर्षांपासून काम रखडले असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर पुणे-सातारा-मुंबई आणि अन्य ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची गर्दी असते. मात्र, गेल्या दोन वर्षापासून वाखरी ते पंढरपूर या अंतरातील काम संथ गतीने चालू असल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
14 Oct 2025 01:31 PM (IST)
सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजरपेठा सजल्या आहेत. नवीन कपडे, आकाशकंदील घेण्यासाठी, पणत्या खरेदी करण्यासाठी बाजारपेठ फुलली आहे. नागरिकांची गर्दी बाजारात पाहायला मिळत आहे. दरम्यान बाहेरगावी राहणारे सुट्टी घेऊन घरी जाण्यासाठी आतुर आहेत. दरम्यान अशीच एक बातमी समोर आली आहे. एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे.
14 Oct 2025 01:25 PM (IST)
इस्त्रालय विरुद्ध हमासमधील विध्यंवस युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर गाझा युद्धबंदी करार करण्यात आला आहे. सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी इजिप्तमधील अल-शेख रिसॉर्ट येथे गाझा युद्ध संपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय शांतता परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेची संपूर्ण विश्वामद्ये जोरदार चर्चा झाली. मात्र ईटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या जोरदार चर्चेत आल्या आहेत.
14 Oct 2025 01:15 PM (IST)
अकलूज येथील माने पाटील परिवार हा मूळचा म्हसवड येथील असून माण तालुक्याशी त्यांची नाळ घट्ट आहे. आपल्या उद्योग व्यवसायाशी प्रामाणिक असणारे सुजयसिंह माने पाटील माळशिरस तालुक्यात भाजपासाठी देखील तितकेच प्रामाणिकपणे काम करीत आहेत. माळशिरस तालुक्यात माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात निवडणुका लढविल्या जातील, असे संकेत ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
14 Oct 2025 01:07 PM (IST)
भारत – वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामन्यांची मालिका पार पडली या मालिकेमध्ये भारताच्या संघाने दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिका जिंकली आहे. अनेक वर्षांपूर्वी, एमएस धोनीने भारतीय संघात एक परंपरा सुरू केली होती जिथे, मालिका जिंकल्यानंतर, तो संघाच्या नवीन खेळाडूला ट्रॉफी देत असे, खेळाडूने पदार्पण केले असो वा नसो. ही परंपरा विराट कोहलीपासून रोहित शर्मा ते सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या अशा सलग कर्णधारांनी पुढे नेली आहे. तथापि, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत काहीतरी वेगळेच दिसून आले. चाहत्यांनी असा अंदाज लावण्यास सुरुवात केली की शुभमन गिलने एमएस धोनीची परंपरा मोडली आहे.
14 Oct 2025 12:54 PM (IST)
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सरसकट पंचनामे करावे, यासह मागणीसाठी सांगलीच्या तासगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तातडीने कर्जमाफी करावी आणि सरसकट पंचनामे करत, शेतकऱ्यांची वसुली थांबवावी, या मागणीसाठी राज्यव्यापी लढा उभारण्याचा इशारा दिला.
14 Oct 2025 12:45 PM (IST)
कुख्यात गुंड नीलेश घायवळने जबरदस्तीने एका व्यक्तीच्या आधारकार्डचा गैरवापर करून त्यांच्या नावावर मोबाईल सिमकार्ड घेतले. तसेच, वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोथरूड पोलिस ठाण्यात घायवळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
14 Oct 2025 12:35 PM (IST)
राज्यातील सर्व तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात आणि एक दिवस मंडल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करणे बंधनकारक आहे. नागरिकांची कामे जलद गतीने व्हावीत, तसेच सरकारच्या योजना पोहोचण्यासाठी हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
14 Oct 2025 12:25 PM (IST)
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अकोला येथे वंचित बहुजन आघाडीला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे महापालिकेत 2012 आणि 2017 असे सलग दोनदा नगरसेवक असलेल्या बबलू जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अमरावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या विभागीय मेळाव्यात हा प्रवेश झाला.
14 Oct 2025 12:15 PM (IST)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी येणार आहेत. शिंदे हे उद्या साताऱ्यातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत प्रमुख कार्यकर्त्यांसोबत त्यांची बैठक देखील होणार आहे. त्यानंतर ते पुन्हा संध्याकाळी त्याचा दरे गावी मुक्कामी जाणार आहेत.
14 Oct 2025 12:10 PM (IST)
सोलापूर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. 26 प्रभाग निश्चित करण्यात आले आहे. एकूण 102 नगरसेवकांची निवडून येणार आहे. 24 प्रभागांमधून 4 नगरसेवक,इतर 2 प्रभागांमधून 3 नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रारूप रचनेवर आलेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी करण्यात आली आहे. 8 हरकती मान्य करण्यात आल्या असून 10 प्रभागांमध्ये फेरफार करण्यात आले आहे.
14 Oct 2025 12:02 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्य निवडणूक आयोग चोक्कलिंगम यांची भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप समजू शकले नाही. महाविकास आघाडी आणि मनसेचे शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे.
14 Oct 2025 12:00 PM (IST)
कोकणात एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाड्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला असून आता या रस्त्यांना महापुरुष आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित नवी नावे देण्यात आली आहे. रस्त्यांची जातीवाचक नावं बदलणारा सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे. सिंधुदुर्गमधील एकूण 192 वस्त्या तसेच 25 रस्त्यांची नावे बदण्यात आली आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
14 Oct 2025 11:50 AM (IST)
बिहारमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. असं असताना एनडीएमध्ये जागावाटपावरुन अद्याप एकमत झालेलं नाही. अनेक दिवसांपासून एनडीएच्या घटक पक्षांमध्ये चर्चा सुरु आहेत. बोलणी अंतिम टप्प्यात असताना मुख्यमंत्री नितीश कुमार जागावाटपावर खुश नसल्याची माहिती आहे. NDA मध्ये चार जागांवरुन पेच निर्माण झाला आहे. यात उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची जागा आहे.
14 Oct 2025 11:40 AM (IST)
खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "लोकसभा आणि विधानसभेत 45 लाख मत वाढली त्याचा हिशोब द्यायला आयोग तयार नाही. नाशिकमध्ये साडेतीन लाख ही मत डुबलीकेट आहेत. यासंदर्भात निवडणूक आयोग कुठल्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाही. असे अनेक विषय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्रा समोर मांडायचे आहेत. एक मत चोरणार असाल तर निवडणुकी आयोगावर विश्वास ठेवणार कसा? शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाला आम्ही पक्ष म्हणून मानत नाही कारण ते चोर आहेत," असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
14 Oct 2025 11:30 AM (IST)
काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चंदीगडमधील हरियाणाचे आयपीएस अधिकारी दिवंगत वाय. पूरण कुमार यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यांनी कुटुंबियांचे स्वागत केले.
14 Oct 2025 11:20 AM (IST)
जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटन अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की "हे वर्ष आमच्यासाठी कठीण गेले आहे. प्रथम पहलगाम दहशतवादी हल्ला आणि नंतर भारत-पाकिस्तान संघर्ष. त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले. परिणामी जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती खूपच वाईट आहे... पर्यटन प्रोत्साहनासाठी, आमची एक टीम सिंगापूरमध्ये आहे. आग्नेय आशिया ही पर्यटनासाठी खूप मोठी बाजारपेठ आहे आणि आम्ही त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद येथेही पर्यटनाला प्रोत्साहन देत आहोत." असे ओमर अब्दुला यांनी सांगितले..
14 Oct 2025 11:11 AM (IST)
भारतीय क्रिकेटपटू, राजकारणी आणि सध्या भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक अशा भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरचा आज वाढदिवस. २००७ आणि २०११ च्या विश्वचषक विजयांमध्ये महत्त्वाचा खेळाडू होता. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, त्याने राजकारणात प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षाकडून खासदार म्हणून काम पाहिले. तो समालोचक म्हणून काम करतो आणि आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर आहे. त्याची आक्रमक खेळीबरोबर मैदानावर झालेले वाद यामुळे गौतम गंभीर हा नेहमीच चर्चेत राहिला आहे.
14 Oct 2025 11:00 AM (IST)
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामन्यांची मालिका पार पडली, या मालिकेच्या दोन्ही सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवून दमदार कामगिरी केली आहे. भारताच्या संघाने त्याच्या घरच्या मैदानावर मालिकेचा दुसरा सामना 7 विकेट्ने जिंकला आहे. भारताच्या फलंदाजांनी पहिल्याच डावामध्ये 518 धावा केल्या होत्या यामध्ये टीम इंडियाने पहिल्या डावामध्ये 248 गुंडाळले होते. त्यानंतर फोलोअपची घोषणा केली होती. यामध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने दुसऱ्या डावामध्ये दमदार कमबॅक केला होता. फोलोअपमध्ये दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या संघाने 390 धावा केल्या.
14 Oct 2025 10:49 AM (IST)
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षणाच्या घोषणेनंतर तालुकानिहाय गट आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे यंदाही महिलांचा दबदबा स्पष्टपणे जाणवतो आहे. अनेक तालुक्यांमध्ये गटांवर महिला आरक्षण लागू झाल्याने आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा ‘महिलाराज ‘ होण्याची चिन्हं दिसत आहेत.
14 Oct 2025 10:40 AM (IST)
पुणे येथे एक धक्कदायक घटना घडली आहे. पुण्यातील चंदननगर परिसरात चोरीसाठी तीन चोर आलेले होते. त्यांना नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. यात एका चोराचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जलख्मी आहेत. मृत्य झालेल्या चोरांचे नाव नवाज इम्तियाज खान (वय 26, रा. भवानी पेठ, मूळ बेंगळुरू) असं नाव आहे. जखमींचा नवे हमीद अबजल मोहम्मद (वय 20) आणि हमीद अबजल अहमद (वय 19) अशी आहेत. दोघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
14 Oct 2025 10:31 AM (IST)
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ऋषभ शेट्टीच्या “कांतारा चॅप्टर १” ने १२ व्या दिवशी १३.५० कोटींची कमाई केली. परंतु, हे आकडे आठवड्याच्या शेवटीपेक्षा कमी असल्याचे दिसून येते. १२ दिवसांत, ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाने भारतात ४५१.९० कोटी रुपये कमावले आहेत. येत्या आठवड्याच्या शेवटी त्याच्या कमाईत वाढ होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या दिवशी ६१.८५ कोटी रुपये कमवणाऱ्या “कंथारा चॅप्टर १” ने पहिल्या आठवड्यात ३३७.४ कोटी रुपये कमावले आहे.
14 Oct 2025 10:23 AM (IST)
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी कर्नाटक राज्यातील सरकारी ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आक्षेप घेतला आहे. तसेच, प्रियांक खर्गे यांनी राज्याचे मुख्य सचिवांना पत्र पाठवून सार्वजनिक उद्याने आणि धार्मिक संस्थांशी संबंधित ठिकाणी संघाच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची माहणी केली आहे. पण त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे.
14 Oct 2025 10:14 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये प्रत्येक प्लेअर जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतो. काही गेमर्स चांगल्या रँकसाठी हा गेम खेळतात तर काही लोकं केवळ मनोरंजनासाठी हा गेम खेळतात. फ्री फायर मॅक्स खेळताना प्लेअर्स जिंकण्याच्या नादात अनेक चूका करतात. ज्यामुळे प्लेअर्सना मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. काहीवेळा प्लेअर्सकडून अशा काही चूका होतात, ज्यामुळे त्यांचं गेमिंग अकाऊंट कायमचं बंद होऊ शकतं. त्यामुळे गेम खेळताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा तुमचं गेमिंग अकाऊंट कायमचं बंद होण्याची देखील शक्यता असते. आता आम्ही तुम्हाला 3 अशा चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे प्लेअर्सचं अकाऊंट कायमचं बॅन होऊ शकतं.
14 Oct 2025 10:08 AM (IST)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया आता पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येत आहे, भारताविरुद्ध मालिका सुरु होण्याआधी आता ऑस्ट्रेलिया संघासंदर्भात मोठी एपडेट समोर आली आहे. जरी या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला दोन मोठे धक्के सहन करावे लागले आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुनरागमन मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया आपला सर्वोत्तम संघ मैदानात उतरवण्याचा मानस आहे, परंतु दोन स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे महत्त्वपूर्ण बदल होतील. ऑस्ट्रेलियन संघाने या दोन स्टार खेळाडूंच्या जागी खेळाडूंची घोषणा देखील केली आहे. या दोन्ही खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.
14 Oct 2025 10:00 AM (IST)
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या कारवाईत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या भागात आणखी दहशतवादी लपल्याचा संशय असल्याने लष्कराची कारवाई अजूनही सुरू आहे. घुसखोरीच्या प्रयत्नाची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू झाली. भारतीय लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि शोध मोहीम तीव्र केली आहे. अलिकडच्या काळात सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया पुन्हा वाढल्या आहेत.
14 Oct 2025 09:59 AM (IST)
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये मालिका सुरु आहे. याचदरम्यान पाकिस्तानचे सर्वात वयस्कर माजी क्रिकेटपटू वझीर मोहम्मद यांचे सोमवारी वयाच्या ९५ व्या वर्षी बर्मिंगहॅम येथे निधन झाले. कसोटी खेळाडू हनीफ, मुश्ताक आणि सादिक मोहम्मद यांचे मोठे भाऊ वझीर यांनी १९५२ ते १९५९ दरम्यान २० कसोटी सामने खेळले. १९५२ मध्ये पहिली कसोटी मालिका खेळणाऱ्या पाकिस्तानी संघातील ते सर्वात वयस्कर सदस्य होते. निवृत्तीनंतर त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे सल्लागार म्हणूनही काम केले. त्यानंतर ते ब्रिटनला गेले.
14 Oct 2025 09:50 AM (IST)
जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज १४ ऑक्टोबर रोजी, मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील आज भारतीय शेअर बाजाराची सपाट सुरुवात दर्शवतात. गिफ्ट निफ्टी २५,३१९ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १० अंकांनी जास्त होता. तसेच आज शेअर बाजारात गुंतवणूकदार कोणते शेअर्स खरेदी करू शकतात, याबाबत अधिक जाणून घेऊया.
14 Oct 2025 09:47 AM (IST)
Devendra Fadnavis on Priyank Kharge: कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी कर्नाटक राज्यातील सरकारी ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आक्षेप घेतला आहे. तसेच, प्रियांक खर्गे यांनी राज्याचे मुख्य सचिवांना पत्र पाठवून सार्वजनिक उद्याने आणि धार्मिक संस्थांशी संबंधित ठिकाणी संघाच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची माहणी केली आहे. पण त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे.
14 Oct 2025 09:45 AM (IST)
नाशिक मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सायबर ठगांनी डिजिटल अरेस्टच्या माद्यमातून दोन ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याचे समोर आले आहे. यात एका ज्येष्ठ नागरिकाला ६ कोटींनी लुटण्यात आला तर दुसऱ्याला ७२ लाखांचा चुना लावल्याचं समोर आलं आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि अश्लील फोटो व्हायरल झाल्याचं सांगत डिजिटल अरेस्ट केलं आणि हे पैसे उकळले.
14 Oct 2025 09:40 AM (IST)
मुंबई : यंदाच्या वर्षी भरपूर पाऊस झाल्याने आतापासूनच थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत थंडीचा कडाका जाणवणार असून, दुपारच्या वेळेला कडक उन आणि रात्री थंडीची सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वातावरणातील हा बदल बुधवार (दि. १५) नंतर होईल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे दिवाळीच्या वेळेस थंडी वाढण्याची शक्यता आहे.
Marathi Breaking news live updates: “दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. या सणात प्रत्येकजण आपले घर सजवतो, नवीन कपडे घेतो आणि प्रियजनांसाठी भेटवस्तू आणतो. पण मोठ्या शहरांमध्ये खरेदी करताना बजेट सांभाळणे ही एक आव्हानात्मक गोष्ट असते. अशा वेळी मुंबईतील काही पारंपरिक बाजारपेठा तुमची खिशावर भार न टाकता संपूर्ण दिवाळीची तयारी करून देतात. चला तर पाहूया, मुंबईतील त्या स्वस्त आणि लोकप्रिय बाजारपेठा जिथे दिवाळीच्या शॉपिंगचा आनंद आणि बचत दोन्ही मिळतात.
सविस्तर बातमीसाठी- Diwali 2025 : दिवाळी शॉपिंगसाठी सज्ज व्हा, हे आहेत मुंबईतील 5 स्वस्त मार्केट; हजारातच पूर्ण होईल संपूर्ण शॉपिंग