Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: छोटा राजनचा साथीदार डीके रावला अटक

Marathi breaking live marathi- गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एका बिल्डरने गुंतवणूकदारांची अंदाजे १ कोटीची फसवणूक केल्यानंतर, गुंतवणूकदार पैसे मागू लागल्यावर त्यांनी डीके रावला त्यांना धमकवण्यास सांगितले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 11, 2025 | 04:10 PM
LIVE
Top Marathi News Today Live: विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; 2 नक्षलवादी ठार

Top Marathi News Today Live: विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; 2 नक्षलवादी ठार

Follow Us
Close
Follow Us:
  • 11 Oct 2025 04:10 PM (IST)

    11 Oct 2025 04:10 PM (IST)

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रेड क्रॉस सोसायटीकडून दिलासा, 1200 शेतकऱ्यांना मदतवाटप

    अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे बाधित झालेल्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने मदतवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा उपक्रम पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते व माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत बार्शी येथील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला.

  • 11 Oct 2025 04:05 PM (IST)

    11 Oct 2025 04:05 PM (IST)

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीएवढीच मदत

    लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुराने अक्षरशः हाहाकार उडविला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांसह पशुधन वाहून गेले होते. अशा औसा विधानसभा मतदार संघातील प्रशासनाने पंचनामे केलेल्या अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना सरकार जेवढी मदत देणार आहे तेवढीच मदत शेतकऱ्यांना करण्याचा निर्णय घेतलाय.

  • 11 Oct 2025 04:00 PM (IST)

    11 Oct 2025 04:00 PM (IST)

    दिवाळीपूर्वी रत्नागिरीतील गतिमंद मुलांची मेहनत; आकाशकंदिल, पणत्या तयार करण्यात व्यस्त

    दिवाळीच्या तयारीत रत्नागिरीतील आविष्कार संस्थेतील गतिमंद विद्यार्थी व्यस्त आहेत. हे विद्यार्थी आकर्षक आकाशकंदिल, पणत्या, मेणबत्त्या, ग्रीटिंग्स आणि सुगंधी उटणे तयार करत आहेत. विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यातील ६०% हिस्सा या विद्यार्थ्यांना दिला जातो.

  • 11 Oct 2025 03:55 PM (IST)

    11 Oct 2025 03:55 PM (IST)

    भारत जगातील सर्वाधिकमोठी अर्थव्यवस्था होईल; प्रविण दरेकरांनी व्यक्त केला विश्वास

    सर्वसामान्य नागरिकांना जीएसटी २.० बद्दल अधिक माहिती मिळावी यासाठी भाजपा मागाठाणे विधानसभेच्या उत्तर आणि मध्य मंडळातर्फे शुक्रवारी बोरिवली पूर्व येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला भाजपा गटनेते व स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांची विशेष उपस्थिती होती. तसेच भाजपा मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपा प्रवक्ते गणेश खणकर, मा. मंडळ अध्यक्ष आप्पा बेलवणकर, भाजपा उत्तर मुंबई जिल्हा सचिव मोतीभाई देसाई, मयुरी बंगेरा यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

  • 11 Oct 2025 03:28 PM (IST)

    11 Oct 2025 03:28 PM (IST)

    साप आणि मांजर चक्क उंदरासाठी लढले, आणि पुढे काय झाले

    Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांची आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत असतात. कधीकधी एक शिकारी त्याच्या भक्ष्याचा पाठलाग करताना दिसतो, तर कधीकधी शिकार त्याच्या जीवासाठी पळून जाताना दिसतो

  • 11 Oct 2025 03:23 PM (IST)

    11 Oct 2025 03:23 PM (IST)

    Who is Next PM: बिहार निवडणुकीदरम्यान PM मोदी निवृत्त होणार? ‘या’ नेत्याच्या विधानाने एकच खळबळ

    PM Narendra Modi: बिहार विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. बिहारची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. बिहारमध्ये सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. एनडीए विरुद्ध अन्य विरोधी पक्ष अशी लढत बिहारमध्ये होणार आहे. दरम्यान बिहार निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना पंतप्रधान मोदी निवृत्त होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामागे कारण ठरले आहे ते म्हणजे एका नेत्याचे विधान. काँग्रेसचा हा नेता नेमका काय म्हणाला आहे, ते जाणून घेऊयात.

  • 11 Oct 2025 02:51 PM (IST)

    11 Oct 2025 02:51 PM (IST)

    ‘झी मराठी अवॉर्ड्स 2025’ ला भावनांचा महाउत्सव; लाडक्या जोड्यांचे मनमोहक परफॉर्मन्स!

    दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ घेऊन येत आहे अनेक खास सरप्राइज, भावनांनी बहरलेला नृत्याविष्कार आणि प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्यांचे खास परफॉर्मन्सेस! यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘प्रेम, स्नेह, त्याग आणि करुणा’ या भावना साजऱ्या करणाऱ्या विविध थीम्सवर आधारीत एकाहून एक भन्नाट परफॉर्मन्सेस पाहायला मिळणार आहेत. रसिकांसाठी ही एक अविस्मरणीय कलाकृती ठरणार आहे.

  • 11 Oct 2025 02:45 PM (IST)

    11 Oct 2025 02:45 PM (IST)

    शुभमन गिलचा नवा पराक्रम, रोहित शर्माचा विक्रम मोडत WTC मध्ये सर्वाधिक शतके करणारा बनला भारतीय

    अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिलने शतक झळकावले. गिलने शानदार खेळी करत कोणत्याही अडचणीशिवाय धावा काढल्या आणि त्याच्या संघाला मजबूत धावसंख्या गाठण्यास मदत केली. यासह गिलने आता रोहित शर्माचा रेकाॅर्ड मोडत नवा रेकाॅर्ड नावावर केला आहे.

  • 11 Oct 2025 02:35 PM (IST)

    11 Oct 2025 02:35 PM (IST)

    अभय देओलच्या खासगी आयुष्याची चर्चा; विदेशी तरुणीसोबत फोटो व्हायरल, सनी देओलची खास कमेंट!

    बॉलिवूडमधील अत्यंत निवडक आणि दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता अभय देओल सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.अभयने आतापर्यंत मोजकेच चित्रपट केले असले, तरी प्रत्येक भूमिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. पण यावेळी तो त्याच्या कोणत्या नव्या प्रोजेक्टमुळे नाही, तर व्यक्तिगत नातेसंबंधांमुळे चर्चेत आहे. अभय देओलने नुकताच विदेशी तरुणीसोबतचा एक खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

  • 11 Oct 2025 02:24 PM (IST)

    11 Oct 2025 02:24 PM (IST)

    “6 महिन्यात मला कळलं मी लग्न करुन चूक केली”; अभिनेत्री मयुरीचा वाघ घटस्फोटावर स्पष्टच बोलली

    झी मराठीवरील अस्मिता या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी वाघ तिच्या घटस्फोटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्याच वर्षी मयुरीचा पुर्वाश्रमीतचा पती अभिनेता पियूष रानडे याने अभिनेत्री सुरुची अडारकर हिच्याशी लग्नगाठ बांधली. पियूष रानडेचं हे तिसरं लग्न.

  • 11 Oct 2025 02:15 PM (IST)

    11 Oct 2025 02:15 PM (IST)

    पंढरपूर तालुक्यात बोगस तणनाशकाचा हाहाकार; शेतकऱ्यांना मोठा फटका

    पंढरपूर तालुक्याच्या अनेक गावांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीमध्ये तणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी तणनाशकांचा वापर करण्यावर भर देत आहेत. बाजारात बोगस तणनाशकाच्या पुड्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

  • 11 Oct 2025 02:02 PM (IST)

    11 Oct 2025 02:02 PM (IST)

    ‘कुठे भयंकर पाऊस तर कुठे…’; अनेक राज्यांमध्ये IMD ने दिला ‘हा’ इशारा

    देशभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यानंतर मध्यंतरी काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ निर्माण झाले आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाचा तर अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

  • 11 Oct 2025 01:55 PM (IST)

    11 Oct 2025 01:55 PM (IST)

    जागावाटपावरून महाआघाडीत दरी ; काँग्रेसला ५० पेक्षा जास्त जागा देण्यास लालू प्रसाद यादवांचा नकार

    बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महाआघाडीत जागावाटपावरुन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते लालू प्रसाद यादव काँग्रेसला ५० पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नसल्याची माहिती समोर आली आहे. पण त्याचवेळी काँग्रेसने मात्र बिहारमधील काही महत्त्वाच्या जागांवर दावा केला केला आहे. राजद आणि काँग्रेसमधील हा वाद सोडवण्यासाठी राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांना हे प्रकरण सोडवण्यासाठी सक्रिय केले आहे.

  • 11 Oct 2025 01:50 PM (IST)

    11 Oct 2025 01:50 PM (IST)

    ‘कुठे भयंकर पाऊस तर कुठे…’; अनेक राज्यांमध्ये IMD ने दिला ‘हा’ इशारा

    देशभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यानंतर मध्यंतरी काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ निर्माण झाले आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाचा तर अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

  • 11 Oct 2025 01:40 PM (IST)

    11 Oct 2025 01:40 PM (IST)

    बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी अटकेत; पोलिस हवालदारच निघाला मास्टरमाईंड

    कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार मास्टरमाईंड असून, त्याच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली. मिरजमधील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली. इनोव्हा कारसह १ कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेसवर निलजी बामणी येथे एकजण बनावट नोटा खपवण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांना खबऱ्याद्वारे मिळाली.

  • 11 Oct 2025 01:40 PM (IST)

    11 Oct 2025 01:40 PM (IST)

    India Weather Update: ‘कुठे भयंकर पाऊस तर कुठे…’; अनेक राज्यांमध्ये IMD ने दिला ‘हा’ इशारा

    India Rain Alert: देशभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यानंतर मध्यंतरी काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ निर्माण झाले आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाचा तर अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

     

  • 11 Oct 2025 01:35 PM (IST)

    11 Oct 2025 01:35 PM (IST)

    ‘कल्की 2898 AD 2’मधून दीपिकाची एक्झिट; ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीची एन्ट्री होणार?

    साउथचा सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘कल्की 2898 एडी 2’ मुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटासंदर्भात एकामागून एक मोठ्या बातम्या समोर येत आहेत.काही दिवसांपूर्वी अशी माहिती आली होती की, दीपिका पादुकोणला या चित्रपटातून बाहेर करण्यात आलं आहे. कल्की २८९८ एडी’ या चित्रपटांतील एक्झिटमुळे दीपिका चांगलीच चर्चेत आहे. दिवसाला फक्त ८ तास काम करण्याची मागणी त्यावेळी अभिनेत्रीने केली होती, ज्यानंतर अनेकांनी त्यांच्या याबद्दलच्या विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

  • 11 Oct 2025 01:25 PM (IST)

    11 Oct 2025 01:25 PM (IST)

    गुगलमुळे 15 वर्षांनी तरुणाचा कुटुंबियांशी संवाद; भावनांना वाट केली मोकळी

    तब्बल पंधरा वर्षापासून पश्चिम बंगालमधील आई -वडील व कुटुंबीयांपासून दुरावलेल्या व महाराष्ट्रात मोलमजुरी करणाऱ्या एका तरुणाचा कुटुंबियांशी संपर्क झाला. सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात गुगलसारख्या सर्च इंजिनच्या माध्यमातून हा संपर्क झाला आहे, या घटनेमुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे.पाबळ (ता. शिरुर) येथे सध्या वस्त्यव्यास असलेला बादल पात्र हा चाळीस वर्षीय तरुण पश्चिम बंगालमधील मिदणापूर जिल्ह्यातील बामंडा गावचा आहे. काही कारणास्तव पंधरा वर्षापूर्वी तो आपल्या आई- वडील व कुटुंबियांना सोडून महाराष्ट्रात आलेला आहे, पाबळ येथे येथे मोलमजुरी करत असताना येथेच तो स्थिरावला.

  • 11 Oct 2025 01:20 PM (IST)

    11 Oct 2025 01:20 PM (IST)

    Bigg Boss 19 : घरातल्या या मास्टरमाइंडला काढले बाहेर! या 5 खेळाडूंना बसला फटका, तान्याला झाला आनंद

    ‘बिग बॉस’ ला निरर्थक आणि निरुपयोगी शो म्हणणारा झीशान कादरी या आठवड्यात ‘वीकेंड का वार’ चा बळी पडणार आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सारखे चित्रपट लिहिणारे झीशान कादरी या आठवड्याच्या शेवटी बाहेर पडल्याचे वृत्त आहे. सलमान खानने होस्ट केलेल्या रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉस १९ शी संबंधित बातम्या शेअर करणाऱ्या प्लॅटफॉर्म बीबी तकने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की झीशान कादरीला या आठवड्याच्या शेवटी नामांकित खेळाडूंमधून बाहेर काढले जाणार आहे, ज्याचा सर्वात मोठा परिणाम सध्या घरात उपस्थित असलेल्या काही स्पर्धकांवर होईल.

  • 11 Oct 2025 01:12 PM (IST)

    11 Oct 2025 01:12 PM (IST)

    Fake Herbicide : पंढरपूर तालुक्यात बोगस तणनाशकाचा हाहाकार; शेतकऱ्यांना मोठा फटका

    पंढरपूर तालुक्याच्या अनेक गावांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीमध्ये तणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी तणनाशकांचा वापर करण्यावर भर देत आहेत. बाजारात बोगस तणनाशकाच्या पुड्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.तणनाशकाने फवारणी केली तरी गाजरगवतासारखे तण जळून जात नाही. तसेच या तणनाशकामुळे जमिनीचा पोतही खराब होत आहे. असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना सहन करण्याची वेळ आली आहे.

  • 11 Oct 2025 12:57 PM (IST)

    11 Oct 2025 12:57 PM (IST)

    बाबासाहेब देशमुखांच्या घरावर दारूच्या बाटल्या पेकल्याप्रकरणी सांगोल्यात कडकडीत बंद

    शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या घरावर काल भारतीय जनता पक्षाच्या रॅली दरम्यान काही कार्यकर्त्यांनी दारूच्या बाटल्या फेकल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ आज सांगोल्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. सकाळी 11 वाजता बाबासाहेब देशमुखांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात निषेध मोर्चा केला जाणार आहे. त्यामुळे सांगोल्यातील सर्व बाजारपेठा दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

  • 11 Oct 2025 12:53 PM (IST)

    11 Oct 2025 12:53 PM (IST)

    तीन जिल्ह्याचा आढावा आज भाजप घेणार

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणुकीबाबत आढावा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. निवडणुका युती म्हणून एकत्र लढवाव्यात का? यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • 11 Oct 2025 12:41 PM (IST)

    11 Oct 2025 12:41 PM (IST)

    ठाण्यात दोन्ही ठाकरे बंधूचा एकत्र मोर्चा

    ठाण्यात नागरिकांच्या समस्यांसंदर्भात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र मोर्चा काढणार आहेत. येत्या 13 तारखेला मासुंदा तलाव ते महापालिका भवन मार्ग असा हा मोर्चा निघणार आहे.

  • 11 Oct 2025 12:30 PM (IST)

    11 Oct 2025 12:30 PM (IST)

    काँग्रेस पक्षाची वोट चोरी विरोधात स्वाक्षरी मोहीम

    पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेस पक्षाने वोट चोरी विरोधात आज स्वाक्षरी मोहीम राबवली. काळेवाडी येथे काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष सायली नडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

  • 11 Oct 2025 12:20 PM (IST)

    11 Oct 2025 12:20 PM (IST)

    जैन मुनींची राजकीय पक्षाची स्थापन

    कबुतरखाना बंदी वादाला नवं वळण लागले आहे. दादरमधील कबुतर खाना पुन्हा सुरु करण्याची मागणी करत जैन मुनी यांनी नवीन राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली.

  • 11 Oct 2025 12:00 PM (IST)

    11 Oct 2025 12:00 PM (IST)

    कर्जतमध्ये दोन गोवंश जनावरांची कत्तल, 3 आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल

    कर्जत तालुक्यातील दामत गावात गोवंशीय जनावराची कत्तल सुरु असताना नेरळ पोलिसांनी धाड टाकली. त्याचवेळी गोवंश मांस तसेच कत्तल करणारे तिघे यांना ताब्यात घेतले.या तिघांना नेरळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यातील एक तरुण हा सराईत गुन्हेगार आहे.

  • 11 Oct 2025 11:50 AM (IST)

    11 Oct 2025 11:50 AM (IST)

    तरुणावर लोखंडी रॉडसह चाकूने हल्ला, नाकाचे हाड फ्रॅक्चर

    कौटुंबिक वादातून झालेल्या हल्ल्यात एका टेलर व त्याचा मुलगा गंभीर जखमी झाला. यामध्ये मुलाच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले आहे. ही घटना बुधवारी (दि.8) रात्री सातच्या सुमारास सातारा परिसरात घडली. रियाज शेख, लईक शेख, रेश्मा रियाज शेख, समिना सजाउल्ला शेख, शोएब रईस शेख (रा. सातारा गाव) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 11 Oct 2025 11:40 AM (IST)

    11 Oct 2025 11:40 AM (IST)

    चहाच्या दुकानात छापल्या एक कोटींच्या बनावट नोटा

    सांगली जिल्ह्यातील मिरज येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहे. महत्वाचं म्हणजे या प्रकरणात कोल्हापूर दलातील एका हवालदाराच्या सहभाग आहे. पोलिसांनी हवालदारसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ५०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा, कलर झेरॉक्स मशीन, स्कॅनर-प्रिंटर आणि एक वाहन असा एकूण १ कोटी ११ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.

  • 11 Oct 2025 11:30 AM (IST)

    11 Oct 2025 11:30 AM (IST)

    छोटा राजनचा साथीदार डीके राव अटकेत

    अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा दीर्घकाळचा साथीदार असलेला कुख्यात गुंड डी.के.राव (५९) याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून ही कारवाई केली आहे. एका गुंतवणूकदाराला खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी डिके राव सह विकासक मिमित भुता आणि अनिल परेराव या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्याच्या सोबतच्या आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. डिके राव सह त्याच्या त्याच्या साथीतदारांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

  • 11 Oct 2025 11:17 AM (IST)

    11 Oct 2025 11:17 AM (IST)

    अवघ्या 1230 रुपयांच्या बिलासाठी हॉटेलचालकाला तिघांची बेदम मारहाण

    हॉटेलमध्ये प्यायलेल्या दारूचे बिल मागितल्याने तिघांनी हॉटेलमधील वेटरसह हॉटेल चालकाला शिवीगाळ करुन लोखंडी कड्याने बेदम मारहाण केली. ही घटना शिवशंकर कॉलनी परिसरात घडली. अजय यशवंते, मुकेश जाधव (दोघे रा. पंचशिल नगर) आणि रवी सातदिवे (रा. रमानगर) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 11 Oct 2025 10:59 AM (IST)

    11 Oct 2025 10:59 AM (IST)

    शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी राजधानी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत (IARI) एका विशेष कार्यक्रमात कृषी क्षेत्रासाठी दोन प्रमुख योजनांचा शुभारंभ करतील. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या योजना कृषी स्वावलंबन, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सरकारची सततची वचनबद्धता प्रतिबिंबित करतात.

  • 11 Oct 2025 10:47 AM (IST)

    11 Oct 2025 10:47 AM (IST)

    ED ची मोठी कारवाई! अंबानी ग्रुपच्या सीएफओला अटक

    बनावट बँक हमी प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रिलायन्स अनिल अंबानी ग्रुप ऑफ कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) आणि कार्यकारी संचालक अशोक कुमार पाल यांना अटक केली आहे. कथित बँक कर्ज फसवणूक आणि रिलायन्स समूहाच्या विविध कंपन्यांद्वारे एकूण ₹१७,००० कोटींहून अधिक रक्कमेचे अन्यत्र वळवण्याच्या मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

  • 11 Oct 2025 10:45 AM (IST)

    11 Oct 2025 10:45 AM (IST)

    रोहित शर्माची क्रेझ, चाहत्यांनी लावले हिटमॅनच्या नावाचे नारे!

    शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये रोहित शर्मा तासन्तास सराव केल्यानंतर मुंबईच्या प्रसिद्ध शिवाजी पार्कमधून बाहेर पडताना दिसत आहे. चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या परिस्थितीत, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि रोहित शर्माचे मार्गदर्शक अभिषेक नायर प्रथम बाहेर येतात आणि चाहत्यांना आवाहन करतात. रोहित शर्माच्या मार्गदर्शकाची तसेच त्याच्या अंगरक्षकाची भूमिका साकारणारा अभिषेक नायर चाहत्यांना सांगताना दिसतोय की, ‘कोणालाही धक्का लावू नका, आपण सर्व चाहते आहोत, पण त्यामुळे त्याला त्रास होऊ नये.’

    Abhishek Nayar is politely requesting the fans to clear the way so that Rohit Sharma can exit easily.😂👌🏼❤️ pic.twitter.com/m43WxySQVr

    — 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) October 10, 2025

  • 11 Oct 2025 10:38 AM (IST)

    11 Oct 2025 10:38 AM (IST)

    बिग B ने वाढदिवशी स्वतःलाच दिले करोडो रुपयांचे गिफ्ट

    बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन ११ ऑक्टोबर रोजी त्यांचा ८३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने संपूर्ण देश बिग बींना शुभेच्छा देत आहे आणि त्यांच्या चाहत्यांसाठीही हा एक खास क्षण आहे. या खास दिवशी, अमिताभ यांनी स्वतःला एक आलिशान मालमत्ता भेट दिली आहे. अभिनेत्याने मुंबईजवळील अलिबागमधील त्यांच्या भूखंडांच्या संग्रहात आणखी तीन भूखंड जोडले आहेत. त्यांच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत, प्रसिद्ध अभिनेत्याने शहराजवळील शांत भागात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे.

  • 11 Oct 2025 10:29 AM (IST)

    11 Oct 2025 10:29 AM (IST)

    उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

    गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका आता लवकरच घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. त्यात शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संभाजीनगरमध्ये जाहीरसभा झाली. यामध्ये त्यांनी अडीच वर्षात आपण काम केलं आहे. त्यामुळे आपण महायुती म्हणून लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली आणि आता जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समितीही जिंकून दाखवा. सगळीकडे भगवा फडकवा, असे आवाहन त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.

  • 11 Oct 2025 10:22 AM (IST)

    11 Oct 2025 10:22 AM (IST)

    Vivo स्मार्टफोन होणार अजून स्टायलिश!

    Vivo ने अँड्राईड 16 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OriginOS 6 अखेर आता लाँच केला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच पुष्टी केली होती की, iQOO आणि Vivo स्मार्टफोनसाठी हे सॉफ्टवेयर अपडेट रिलीज करणार आहे. या घोषणेनंतर आता कंपनीने काही डिव्हाईससाठी लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट रिलीज केले आहे. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कंपनी लेटेस्ट सॉफ्टवेयर अपडेट कोणत्या स्मार्टफोनसाठी आणि कधी रिलीज करणार आहे.

    बातमी सविस्तर वाचा...

  • 11 Oct 2025 10:14 AM (IST)

    11 Oct 2025 10:14 AM (IST)

    न्यूझीलंडच्या हाती लागला पहिला विजय!

    महिला विश्वचषक दिवसेंदिवस मनोरंजक होत चालला आहे. महिला क्रिकेटमधील मजबूत संघ न्यूझीलंडच्या संघाला पहिल्या दोन सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. आता न्यूझीलंडच्या संघाने विजयाचे खाते उघडले आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये न्यूझीलंडने आपला पहिला विजय मिळवला आहे. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील ११ व्या सामन्यात किवी संघाने बांगलादेशचा १०० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ९ विकेट गमावून २२७ धावा केल्या.

  • 11 Oct 2025 10:06 AM (IST)

    11 Oct 2025 10:06 AM (IST)

    चहाच्या दुकानात छापल्या एक कोटींच्या बनावट नोटा

    सांगली जिल्ह्यातील मिरज येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहे. महत्वाचं म्हणजे या प्रकरणात कोल्हापूर दलातील एका हवालदाराच्या सहभाग आहे. पोलिसांनी हवालदारसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ५०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा, कलर झेरॉक्स मशीन, स्कॅनर-प्रिंटर आणि एक वाहन असा एकूण १ कोटी ११ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.

  • 11 Oct 2025 09:59 AM (IST)

    11 Oct 2025 09:59 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध योजनांचा करणार शुभारंभ

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.11) विविध अभियानांचा शुभारंभ करणार आहेत. प्रधानमंत्री धन-धान्य योजना-दलहन आत्मनिर्भरता मिशन यांसारख्या योजना सुरु केल्या जाणार आहेत. कृषी क्षेत्रासाठी या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजनांचा एकूण खर्च 35440 कोटी असणार आहे. पंतप्रधान कृषी पायाभूत सुविधा निधी, पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रांतर्गत प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील ते करतील.

  • 11 Oct 2025 09:50 AM (IST)

    11 Oct 2025 09:50 AM (IST)

    अवघ्या 1230 रुपयांच्या बिलासाठी हॉटेलचालकाला मारहाण

    छत्रपती संभाजीनगर : हॉटेलमध्ये प्यायलेल्या दारूचे बिल मागितल्याने तिघांनी हॉटेलमधील वेटरसह हॉटेल चालकाला शिवीगाळ करुन लोखंडी कड्याने बेदम मारहाण केली. ही घटना शिवशंकर कॉलनी परिसरात घडली. अजय यशवंते, मुकेश जाधव (दोघे रा. पंचशिल नगर) आणि रवी सातदिवे (रा. रमानगर) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 11 Oct 2025 09:40 AM (IST)

    11 Oct 2025 09:40 AM (IST)

    हार्दिक पांड्याने महिकासोबतच्या नात्याची केली पुष्टी!

    भारताचा संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळत आहे, या मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला अलिकडेच मॉडेल-अभिनेत्री माहिका शर्मासोबत विमानतळावर पाहिले गेले, ज्यामुळे अशी चर्चा सुरू झाली की ही अभिनेत्री हार्दिकची प्रेयसी आहे. दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता, क्रिकेटपटूने महिकासोबतचे काही फोटो शेअर करून त्यांच्या नात्याची पुष्टी केली आहे.

  • 11 Oct 2025 09:20 AM (IST)

    11 Oct 2025 09:20 AM (IST)

    राज्यात ६५ लाख हेक्टर शेतीपिकांचे नुकसान; शासनाकडून कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती

    राज्यात यंदाच्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे सुमारे ६५ लाख हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक पंचनाम्यातून समोर आले आहे. जिल्हास्तरीय यंत्रणांकडून नुकसानीचे सर्वेक्षण सुरू असून, त्यानुसार जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत सुमारे २६.६९ लाख हेक्टर क्षेत्रातील पिके नुकसानग्रस्त झाली आहेत. तर सप्टेंबर २०२५ मध्येच जवळपास ३९ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

  • 11 Oct 2025 08:58 AM (IST)

    11 Oct 2025 08:58 AM (IST)

    दादरमध्ये जैन समाजाकडून मृत कबुतरांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना सभा

    दादर येथील योगी सभागृहात आज (११ ऑक्टोबर) जैन समुदायातर्फे मृत कबुतरांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेतून मुंबईतील कबूतरखाने पुन्हा सुरू करण्याची मागणीही करण्यात येणार आहे. अलीकडे कबूतरखाने बंद झाल्याने अनेक कबुतरे रस्त्यावर भटकताना दिसत असून, अपघातांमध्ये त्यांचा मृत्यू होत असल्याचा दावा जैन समुदायाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे समुदायामध्ये चिंता व्यक्त होत असून, कबुतरांच्या संरक्षणासाठी तसेच त्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या जतनासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन प्रशासनाला करण्यात येणार आहे.

  • 11 Oct 2025 08:55 AM (IST)

    11 Oct 2025 08:55 AM (IST)

    “माझी लाडकी बहीण” योजनेचा सप्टेंबर हप्ता जमा होण्यास सुरुवात

     राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वी मिळालेली ही आर्थिक मदत महिलांसाठी आनंदाची भेट ठरली आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे यावेळी हप्ता वेळेत मिळणार की नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र सामाजिक न्याय विभागाने सुमारे ४१० कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केल्याने शुक्रवारी (ता. ११) पासून हप्ता जमा होऊ लागला आहे.

  • 11 Oct 2025 08:52 AM (IST)

    11 Oct 2025 08:52 AM (IST)

    चांदी झाली सोन्यापेक्षा चमकदार!

     भारतात 11 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,370 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,339 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,277 रुपये आहे. भारतात 10 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,416 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,381 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,312 रुपये होता.

  • 11 Oct 2025 08:17 AM (IST)

    11 Oct 2025 08:17 AM (IST)

    मुंबईतून मान्सूनची एक्झिट; राज्यात हवामान स्थिर होण्याची शक्यता

    छत्र्या आणि रेनकोट आता पुन्हा गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे. कारण मुंबईतून मान्सूनने अधिकृतरीत्या माघार घेतली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रातूनही परतणार असल्याचे हवामान खात्याने संकेत दिले आहेत. मुंबई, पुणे, मराठवाडा आणि विदर्भाला झोडपून काढल्यानंतर परतीच्या पावसाने अखेर माघार घेतली आहे. साधारणपणे सहा ऑक्टोबरला मुंबईतून मान्सूनची परतीची नोंद होते. मात्र, यंदा अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची माघार उशिराने झाली. मंगळवारपासून शहरात पावसाने पूर्ण उघडीप घेतली असून, आता राज्यात सर्वसाधारण स्थिर आणि कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत आकाश स्वच्छ राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

  • 11 Oct 2025 08:10 AM (IST)

    11 Oct 2025 08:10 AM (IST)

     आमदारांच्या घरावर हल्ल्याच्या निषेधार्थ शेकापकडून सांगोला बंद

    आमदारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) आज सांगोला बंदची हाक दिली आहे. काल (शुक्रवारी) भाजपच्या रॅलीदरम्यान शेकाप आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या बंगल्यावर दारूच्या बाटल्या आणि दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानाजवळही अशाच प्रकारची घटना घडल्याचे समोर आले आहे.

  • 11 Oct 2025 08:05 AM (IST)

    11 Oct 2025 08:05 AM (IST)

    मराठवाड्यात भाजपची स्वबळावर लढण्याची चाचपणी

    मराठवाड्यात भाजपकडून (BJP) आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची शक्यता तपासली जात असल्याची माहिती समोर आली आहे. काल (शुक्रवारी) छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत युतीत राहून लढायचे की स्वबळावर, यावर मध्यरात्रीपर्यंत चर्चेची मालिका सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) युती नको, अशी मागणी मोठ्या प्रमाणात भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

Marathi Breaking news live updates:  अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा दीर्घकाळचा साथीदार असलेला कुख्यात गुंड डी.के.राव (५९) याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून ही कारवाई केली आहे. एका गुंतवणूकदाराला खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी डिके राव सह विकासक मिमित भुता आणि अनिल परेराव या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्याच्या सोबतच्या आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. डिके राव सह त्याच्या त्याच्या साथीतदारांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

 

 

Web Title: Marathi breaking news today live updates political national international crime sports entertainment lifestyle business breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 08:50 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live: राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस
1

Top Marathi News Today Live: राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस

Top Marathi News Today: भारतीय संघातून वगळल्यानंतर करुन नायरला मिळाली या संघामधून खेळण्याची संधी
2

Top Marathi News Today: भारतीय संघातून वगळल्यानंतर करुन नायरला मिळाली या संघामधून खेळण्याची संधी

Top Marathi News Today Live: पोरींनी करून दाखवलं! भारताचा पाकिस्तानवर ८८ धावांनी दणदणीत विजय
3

Top Marathi News Today Live: पोरींनी करून दाखवलं! भारताचा पाकिस्तानवर ८८ धावांनी दणदणीत विजय

Top Marathi News Today:  300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना
4

Top Marathi News Today: 300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.