Maharashtra Breaking News
Marathi Breaking news updates: मुंबईतील मराठा आंदोलन (Mumbai Maratha Protest) चिघळल्यानंतर हायकोर्टाने राज्य सरकारला महत्वपूर्ण आदेश दिले आहेत. न्यायालयाने सरकारला मुंबई दुपारपर्यंत रिकामी करण्याचे निर्देश दिले असून, आंदोलकांना दक्षिण मुंबईत प्रवेश न देण्याचा आदेशही देण्यात आला आहे.ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनामुळे मुंबई छावणीसारखी झाली आहे. त्यामुळे आझाद मैदानासह सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणांहून आंदोलकांना हटवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. दरम्यान, या घडामोडीनंतर पोलिसांनी (Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil) मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे.
02 Sep 2025 06:45 PM (IST)
सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस (SUAS), इंदोर आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इस्रो प्रदर्शन २०२५, पृथ्वीपासून तारकांकडे: भारताचा अवकाश प्रवास’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय अवकाश दिनाच्या (२३ ऑगस्ट) पार्श्वभूमीवर आयोजित या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू विनीत कुमार नायर, संचालक दुर्गेश मिश्रा, कुलसचिव मनीष झा तसेच इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ रवीकुमार वर्मा, दिनेशकुमार अग्रवाल आणि शालिनी गंगेले यांच्या उपस्थितीत झाले.
02 Sep 2025 06:28 PM (IST)
सारा तेंडुलकर आणि भारतीय संघाचा स्टार खेळाडू शुभमन गिल यांच्या नात्याबाबत खूप वेळा चर्चा होत असते. सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबत अनेक प्रतिक्रिया येत असतात. अशातच आता सारा तेंडुलकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरून आता शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या नावाची पुनः चर्चा सुरू झाली आहे. परंतु, यावेळी सारा सोबत गिल नसून दुसराच तरुण दिसत आहे. व्हायरल झालेले फोटो हे गोव्यातील असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. आपण या फोटोमागील सत्यता नेमकीम काय? याबाबत आपण जाणून घेऊया.
02 Sep 2025 06:12 PM (IST)
Maratha Reservation Live: राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. दरम्यान आपण आरक्षणाची लढाई जिंकलो आहोत असे, जरांगे पाटील यांनी घोषणा केली आहे. आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लोकांना पण आरक्षण मिळेल असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपले पाच दिवसांचे उपोषण सोडले आहे.
02 Sep 2025 05:43 PM (IST)
बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमीच तिच्या कामामुळे आणि नुकतेच लग्न झाल्यापासून चर्चेत आहे. ती अनेकदा तिचा पती झहीरसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. आता अभिनेत्री आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. हे कारण आहे अभिनेत्रीचे इंटरनेटवरील फोटो तिच्या परवानगीशिवाय काही ब्रँडने वापर आहेत. सिन्हाने कधीही तिचे मत मांडण्यास मागेपुढे पाहिले नाही आणि यावेळी तिने तिचे फोटो वापरल्याबद्दल इन्स्टाग्रामवर अनेक ब्रँड्सवर टीका केली आहे.
02 Sep 2025 05:42 PM (IST)
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली. जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी ते मुंबईपर्यंत मोर्चा काढला. मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे पाटील यांनी उपोषण देखील केले. मागील पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर होते. कोर्टाच्या निर्देशानंतर आणि सरकारच्या मध्यस्थीनंतर जरांगे पाटील यांचे उपोषणाला यश येण्याची शक्यता आहे. सरकारच्या मंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या एकूण सहा मागण्या मान्य झाल्या आहेत.
02 Sep 2025 05:42 PM (IST)
ऑटो आणि फार्मा शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे, शेअर्सना आज सुरुवातीचा तोल राखता आला नाही. आज सेन्सेक्स ०.२६% म्हणजेच २०६.६१ अंकांच्या घसरणीसह ८०,१५७.८८ अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी ०.१८% म्हणजेच ४५.४५ अंकांच्या घसरणीसह २४,५७९.६० अंकांवर बंद झाला.
02 Sep 2025 05:42 PM (IST)
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौकटीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी पावले उचलली आहेत. याअंतर्गत यंदापासून दोन महत्त्वाचे उपक्रम देशभरातील शाळांमध्ये राबवले जाणार आहेत. करिअर मार्गदर्शन डॅशबोर्ड आणि हब अँड स्पोक शालेय प्रारूप. या दोन उपक्रमांचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक यश मिळविणे नव्हे, तर त्यांना भविष्यात योग्य दिशा मिळावी, तणावाचे व्यवस्थापन करता यावे आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आवश्यक आधार उपलब्ध करून देणे हा आहे.
02 Sep 2025 05:41 PM (IST)
टोयोटा किर्लोस्कर मोटरने ऑगस्ट 2025 महिन्यातील विक्रीचे आकडे जाहीर केले असून, या कालावधीत कंपनीने एकूण 34,236 युनिट्सची विक्री केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत विक्री झालेल्या 30,879 युनिट्सच्या तुलनेत यंदा कंपनीच्या विक्रीत तब्बल 11% वाढ झाली आहे. या विक्रीत देशांतर्गत बाजारपेठेतील 29,302 युनिट्स तसेच 4,934 युनिट्सच्या निर्यात विक्रीचा समावेश आहे.
02 Sep 2025 05:41 PM (IST)
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये प्राण्यांचे देखील हैराण करवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका ताकदवर प्राण्याला देखील त्याच्या शत्रूच्या मदतीची गरज भासली आहे.
02 Sep 2025 05:28 PM (IST)
मुंबई: राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अनेक गणेश मंडळांनी सुंदर असे देखावे उभारले आहेत. भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे. त्यातच आता यंदाच्यागणेशोत्सवाला, स्विगी (स्विगी लिमिटेड, एनएसई: SWIGGY / बीएसई : 544285), भारताचे आघाडीचे ऑन-डिमांड सुविधा प्लॅटफॉर्म, यांनी मुंबईच्या जीएसबी सेवा मंडळ आणि पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसोबत भागीदारी करून शहरभर घरपोच प्रसाद वितरित करण्याची व्यवस्था केली आहे. 26 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीपासून आतापर्यंत 7000 हून अधिक प्रसाद बॉक्स वितरित केले गेले आहेत. भक्तांसाठी हे आयकॉनिक पंडाल्समधील प्रसाद 5 सप्टेंबरपर्यंत स्विगी अॅपद्वारे फक्त 1 रुपयापासून सोयीस्करपणे मागवता येईल.
02 Sep 2025 05:17 PM (IST)
Robin Uthappa and Virat Kohli dispute! भारतीय क्रिकेटमधील विराट कोहली हे मोठे नाव आहे. विराट कोहलीने भारतीय संघासाठी क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात आपल्या बॅटने खोऱ्याने धावा काढल्या आहेत. विराट कोहलीने टी २० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. विराट कोहली आणि भारतीय संघातील इतर खेळाडूंबाबत काही दुराव्याचे क्षण देखील आले आहेत. यामध्ये माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाचे नाव आहे. विराट कोहलीबाबत रॉबिन उथप्पाने काही वादग्रस्त विधान केले होते. याबाबत आता माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
02 Sep 2025 05:02 PM (IST)
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचे जाहीर केले. त्यानुसार गावातील, नात्यातील आणि कुळातील लोकांकडून चौकशी करून मराठा समाजातील पात्रांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे उपसमितीने जरांगे यांच्या उपस्थितीत मान्य केले. तसेच सातारा गॅझेट संदर्भातील मागणीवरही जलदगतीने निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपसमितीकडून देण्यात आले.
02 Sep 2025 04:50 PM (IST)
मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस! मराठा आंदोलक म्हणतात, "जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही. जर काही झाले, सरकार जबाबदार."
02 Sep 2025 04:45 PM (IST)
उल्हासनगरच्या सुतार कुटुंबीयांनी यंदा घरगुती गणेशोत्सवात मुंबईतील चाळ संस्कृतीचा आकर्षक देखावा साकारला. ३४ वर्षांपासून परंपरा जपणारे हे कुटुंब इको–फ्रेंडली साहित्य वापरून सामाजिक संदेश देणारे देखावे तयार करत आहे.
02 Sep 2025 04:40 PM (IST)
सांगलीच्या संस्थानच्या गणपतीची 200 वर्षांची परंपरा असून, मी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो या उत्सवाला येते.नागरिकांनी हा उत्सव पारंपरिक पद्धतीने, डॉल्बी चा वापर न करता, पर्यावरण पूरक करावा. असे आवाहन पौर्णिमाराजे पटवर्धन यांनी नवराष्ट्रशी बोलताना केले आहे
02 Sep 2025 04:35 PM (IST)
तारापूर गणेशोत्सवात मंडळाने मुंबईतील लुप्त होत चाललेल्या दगडी आणि लालबाग चाळींचा भव्य प्रतिकृती देखावा तयार केला आहे. येणाऱ्या पिढीला या चाळींची आठवण देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.
02 Sep 2025 04:30 PM (IST)
परभणीचे जिल्हा सामान्य रुग्णालय हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी ला जोडण्यात आले त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी शासनाकडून हीची आकारणी करण्यात येत असते आज दोन सप्टेंबर पासून परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्व पेशंटला फिस ची आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी फीस घेऊ नये या मागणीसाठी अखिल भारतीय युवा फेडरेशनच्या नेतृत्वात वैद्यकीय महाविद्यालयासमोर आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिकांनी सहभाग नोंदवला.
02 Sep 2025 04:25 PM (IST)
मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे सप्टेंबरअखेरपर्यंत मागे घेणार असल्याचे आश्वासन राज्य शासनाने दिल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. मंत्रिमंडळ उपसमितीने याबाबतचा मसुदा तयार केला आहे.
02 Sep 2025 04:25 PM (IST)
मुंबईत मराठा समाज माघारी जाणार नाही; आक्रमक आंदोलकांनी जीव जाईल तरी शहर सोडणार नाही असा इशारा दिला. पोलिसांनी वाहनं काढण्याची विनंती केली आहे.
02 Sep 2025 04:25 PM (IST)
आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांतील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासनही उपसमितीने दिले आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी द्यावी, अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
02 Sep 2025 04:25 PM (IST)
जात पडताळणी प्रमाणपत्र तातडीने देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. ५८ लाख नोंदीची माहिती ग्रामपंचायतीमध्ये लावण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
02 Sep 2025 04:24 PM (IST)
जीआर दिल्याशिवाय मनोज जरांगे यांचा उपोषण सोडण्यास नकार, जीआर दिल्यानंतर रात्री 9 पर्यंत मुंबई खाली करणार
02 Sep 2025 04:19 PM (IST)
सोलापूरातील लष्कर परिसरात वायू गळतीमुळे भीषण घटना घडली. बलरामवाले कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला असून पती-पत्नी व आई उपचाराधीन आहेत. बंद खोलीत गॅस गळती होऊन श्वसन गुदमरल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
02 Sep 2025 04:12 PM (IST)
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणासाठी मराठा समाजाचा लढा सुरू झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणचा आज पाचवा दिवस आहे. त्यांनी दोन दिवसांपासून पाणी ही त्यागले आहे. तर आज त्यांनी वैद्यकीय पथकालाही परतावून लावले.
02 Sep 2025 03:58 PM (IST)
हैदराबाद गॅझेटला मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देण्यास तयार आहे.
सातारा संस्थानच्या गॅझेटमध्ये पश्चिम महराष्ट्र पूर्णबसले, पुणे आणि औंध गॅझेटची अंमलबाजवणी कऱण्याबाबत कायदेशीर बाबत तपासून १५ दिवसात मान्यता देण्यास तयार
सप्टेंबर अखेरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार
मराठा आरक्षणातील बलिदान गेलेल्यांच्या कुटुंबीयांना एका आठवड्याच्या आता त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल.
बलिदान गेलेल्यांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी द्या
02 Sep 2025 03:57 PM (IST)
मराठा आरक्षणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहेत. काल झालेल्या सुनवणीत उच्च न्यायालयाने आज दुपारी ३ वाजेपर्यंत मुंबई सोडण्याचे निर्देश मराठा आंदोलकांना दिले होते. त्यानंतर आज दिवसभरात हजारो मराठा आंदोलक मुंबईच्या बाहेर पडण्याची तयारी करत होते.
02 Sep 2025 03:45 PM (IST)
एकीकडे महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अशातच आता मराठा आंदोलनादरम्यान पुन्हा एकदा भाषेचा वाद समोर आला आहे. मुंबईतील पनवेलमधील गोदरेज सोसायटीमध्ये मराठीऐवजी हिंदी बोलण्यावरून हाणामारी झाली.
02 Sep 2025 03:38 PM (IST)
कधी कुंडली तर कधी अंकशास्त्र, या सगळ्यावरुन माणसाच्या स्वभावाचा अंदाज लावता येतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं. त्याचबरोबर तुमचा जन्मदिवस इतकंच नाही तर तुमच्या जन्ममहिन्यानुसार देखील व्यक्तीचा स्वभाव कसा असू शकतो याचा ताळमेळ लावणं शक्य असतं.
02 Sep 2025 03:27 PM (IST)
युएई क्रिकेट सध्या एक लहान संघ म्हणून ओळखला जातो. त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हवा तसा लौकिक नाही. परंतु, याच लहान संघाच्या कर्णधाराने भारताचा दिग्गज एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. तत्पूर्वी आपण अफगाणिस्तान आणि यूएई यांच्यातील सामन्याबाबत माहिती घेऊया.
02 Sep 2025 03:15 PM (IST)
Manoj Jarange Patil: गेले पांच दिवस मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणाची मंत्रीमंडळ उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आरक्षणचा अंतिम मसुदा पाठवला असल्याचे समजते आहे. आता यावर जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.
02 Sep 2025 03:03 PM (IST)
बिकानेरमधून चित्रपटसृष्टीशी संबंधित एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. भन्साळींची कंपनी भन्साळी प्रॉडक्शन, प्रोडक्शन मॅनेजर उत्कर्ष बाली आणि अरविंद गिल यांच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
02 Sep 2025 02:54 PM (IST)
मुंबई हायकोर्टाने दुपारी तीन वाजेपर्यंत आंदोलकांनी मुंबई सोडण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर पोलिस सक्रीय झाले असून रस्त्यांवर उभी असलेली वाहने हटविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. पोलिसांकडून आंदोलकांना समजावण्याचाही प्रयत्न केला जात आहे. पण मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाशिवाय जागेवरून हलणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
02 Sep 2025 02:29 PM (IST)
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरुद्ध मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान कालच्या सुनावणीत हायकोर्टाने सरकार आणि आंदोलनकर्त्यांना सुनावले होते. आज देखील झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने राज्य सरकारला स्पष्ट आदेश दिले आहेत. 3 वाजेपर्यंत सर्वकाही सुरळीत करावे असे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारने दिले आहेत. दरम्यान हायकोर्टाच्या आदेशावर बोलताना मराठा आंदोलकांनी आरक्षण घेतल्याशियाय मुंबई सोडणार नाही अशी भूमिका घेतली आहे. आरक्षण मिळल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही. गोळ्या घातल्या तरी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. कोर्टाच्या सुचनांचे आम्ही पालन करू. आम्हालाही गावाकडे कामे आहेत, शेतात कामे आहेत. मात्र आजपर्यंत सरकारने आरक्षणचा निर्णय का घेतला नाही? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
02 Sep 2025 02:08 PM (IST)
महाकाय बहुराष्ट्रीय कंपनी नेस्लेने लॉरेंट फ्रेक्स यांना सीईओ पदावरून तात्काळ काढून टाकले आहे. कंपनीने म्हटले आहे की फ्रेक्सचे त्यांच्या एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी प्रेमसंबंध होते. चौकशीत असे दिसून आले की फ्रेक्सने कंपनीला याबद्दल सांगितले नव्हते. हे नेस्लेच्या नियमांचे उल्लंघन आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की लॉरेंट फ्रेक्स यांना कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे काढून टाकण्यात आले. फ्रेक्स १९८६ मध्ये कंपनीत सामील झाले आणि गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांना सीईओ बनवण्यात आले.
02 Sep 2025 01:57 PM (IST)
मराठा बांधवांनी सीएसटी रेल्वे स्टेशन रिकामे केले. न्यायालयाच्या आदेशानंतर सीएसटी रेल्वे स्थानक मराठा बांधवांसाठी पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. सीएसटी रेल्वे स्थानकावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि लोकल ट्रेन सुरू आहेत.
02 Sep 2025 01:56 PM (IST)
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ करमाळयात मराठा समाज आक्रमक दिसला. मनोज जरांगे यांची तब्येत खालावत चालली असल्याने करमाळयातील बबन चांदगुडे व पिलूभाऊ इंदलकर यांचा महादेवाच्या पिंडीला रक्ताभिषेक करण्यात आला. करमाळयातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रक्ताभिषेक आंदोलन केले.सरकारने मराठा आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष द्यावे म्हणून केले महादेवाच्या पिंडीला रक्ताभिषेक आंदोलन करण्यात आले.
02 Sep 2025 01:56 PM (IST)
मराठा आंदोलनाप्रश्न राज्य सरकारला 3 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 3 वाजेपर्यंत कोर्टात राज्य सरकारला म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
02 Sep 2025 01:55 PM (IST)
रविवारी (३१ ऑगस्ट) अफगाणिस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. या भूंकपाची तीव्रता ४.५ आणि ५.२ रिश्टर स्केल होती. या भूकंपानंतर केवळ २० मिनीटांमध्ये मोठी जीवितहानी झाली. सध्या परस्थिती अधिक बिकट झाली आहे. या भूकंपामुळे काबुल आणि कुनारसह देशाच्या अनेक प्रांतांमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. यामध्ये जवळपास ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २५०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.रुग्णालायांमध्येही परिस्थिती बिघडत चालली आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय सुविधाही अपुऱ्या पडत आहेत. तसचे मलब्याखाली अनेक लोक अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी अद्याप कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.
02 Sep 2025 01:45 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) भारतावर जास्तच नाराज असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ट्रम्प पुन्हा एकदा भारतावर टॅरिफ (Tarrif) लावण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत आयात होणाऱ्या औषध उत्पादनांवर टॅरिफ लादले जाणार असून २००% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यासाठी एक प्रस्तावही मांडण्यात आला आहे.
02 Sep 2025 01:30 PM (IST)
मागिल काही महिन्यामध्ये भारताच्या अनेक क्रिकेट खेळाडूंनी निवृती घेतली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन त्याचबरोबर चेतेश्वर पुजारा यांनी सोशल मिडियावर निवृतीची घोषणा केली आहे. आर अश्विनने बाॅर्डर गावस्कर ट्राॅफी मालिकेमध्ये अचानक निवृती घेतली होती त्यानंतर त्याने आता काही दिवसांपुर्वी त्याने आयपीएलमधून देखील निवृतीची घोषणा केली आहे. नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामधील मालिकेसंदर्भात त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडीओ शेअर केले होते.
02 Sep 2025 01:20 PM (IST)
जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्राचा रोमँटिक-कॉमेडियन चित्रपट ‘परम सुंदरी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन ४ दिवस झाले आहेत. आठवड्याच्या शेवटी चित्रपटाच्या कमाईत घट होत आहे. चित्रपटाचा कमाईचा आकडा अवघ्या ४ दिवसांतच घसरला आहे. चित्रपट अजूनही त्याच्या बजेटपासून खूप दूर आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट ‘सैयारा’ आणि ‘कुली’ चे रेकॉर्ड तोडण्यात अपयशी ठरत आहे. चला जाणून घेऊया हा चित्रपट त्याच्या बजेटपासून किती दूर आहे?
02 Sep 2025 01:10 PM (IST)
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची औपचारिक घोषणा झाली नसली तरी हवेली तहसीलमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. आरक्षणाच्या घोषणेची वाट न पाहता उमेदवारांनी गावोगावी जाऊन आपला दावा मजबूत करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात ६ जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गण निश्चित करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत गावोगावी अनेक इच्छुक उमेदवार सक्रिय झाले आहेत.. गणेशोत्सवाच्या वातावरणात उमेदवारांनी संधीचा फायदा घेतला आहे. ते गणेश मंडळांना भेटत आहेत, आरतीला उपस्थित राहून सोशल मीडियावर आपला दावा मांडत आहेत.
02 Sep 2025 01:05 PM (IST)
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये उपोषण सुरु केले आहे. जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. यामध्ये हाय कोर्टाने निर्देश देत जरांगे पाटील यांच्या आंदोलकांना इशारा दिला आहे. तसेच मुंबई रिकामी करण्यास देखील सांगितले आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून देखील जरांगे पाटील यांना आझाद मैदान सोडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
02 Sep 2025 12:53 PM (IST)
मुंबईतील वांद्रे परिसरात केळी विकण्याच्या नावाखाली गाडीवर एमडी ड्रग्ज विकल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने एका वृद्धाला अटक केली आहे. आरोपीचे नाव ६० वर्षीय मोहम्मद अली अब्दुल गफ्फार शेख असे आहे आणि त्याच्याकडून ३५ लाख रुपये किमतीचे १५३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. यानंतर, मोहम्मद अली अब्दुलविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. मोहम्मदला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
02 Sep 2025 12:12 PM (IST)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा समाज रस्त्यावर उतरला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांनी हिंगोली–परभणी महामार्ग रोखला. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात पुरुषांसह महिलांचाही सहभाग दिसून आला. रस्ता रोकोमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. “मनोज जरांगे यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा इशारा समाजबांधवांनी दिला.
02 Sep 2025 12:05 PM (IST)
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला आज पाच दिवस पूर्ण झाले. त्यामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते जमले असून, ऐन गणेशोत्सवात शहराला छावणीचे स्वरूप आले आहे. या पार्श्वभूमीवर २ सप्टेंबर दुपारपर्यंत मुंबई रिकामी करण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. तसेच न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, भाजप नेते केशव उपाध्ये यांनी जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. “नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा,” असे ते म्हणाले.
02 Sep 2025 12:00 PM (IST)
अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी मुंबई येथील मराठा आरक्षणाच्या उपोषणाला भेट देत पाठिंबा दिला होता यावर माध्यमांशी बोलताना निलेश लंके म्हणाले की, सरकारने आता लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. शरद पवार यांनी सुद्धा कार्यक्रमांमध्ये स्टेटमेंट केलं की तामिळनाडू सारखं ७२ टक्के आरक्षण या ठिकाणी केले पाहिजे. ओबीसींच्या ताटातून घेण्यापेक्षा केंद्र सरकारने नवीन केंद्र सरकारच्या अख्यारितेतला विषय असून त्या ठिकाणी आरक्षण वाढवून घेतलं पाहिजे. तमिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रामध्येही आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यावी अशी आमची भूमिका आहे.
02 Sep 2025 11:50 AM (IST)
संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरु आहे. आज (दि.02) सात दिवसांच्या घरगुती बाप्पांचे विसर्जन करण्यात येणार आहे. याचबरोबर जेष्ठ गौरीला देखील आज निरोप देण्यात येणार आहे.
02 Sep 2025 11:40 AM (IST)
मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र मुदत संपल्यानंतर देखील आंदोलक मैदानावरच असल्यामुळे कोर्टाच्या निर्देशानंतर आझाद मैदान रिकामं करा या आशयाची मुंबई पोलिसांनी जरांगे पाटलांना नोटीस बजावली आहे.
02 Sep 2025 11:20 AM (IST)
मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांनी उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे.