Maharashtra Breaking News
Marathi Breaking news live: मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा बांधवाची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेत सीएसएमटी आणि मुंबई पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी आज (1 सप्टेंबर) बंद ठेवले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असल्याने आंदोलनाला आणखी गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
01 Sep 2025 07:05 PM (IST)
Mumbai Maratha Protest: मुंबईत मराठा आरक्षणावरून सुरु असलेल्या आंदोलनाचा परिणाम आता सार्वजनिक वाहतुकीवरही दिसू लागला आहे. मुंबईतील सांताक्रूझ आगारातून सुटणाऱ्या एका बेस्ट बसमध्ये (क्रमांक ७८६७) रविवारी रात्री काही आंदोलक आणि एका प्रवाशात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, संतप्त आंदोलकांनी प्रवाशाला बसमध्येच मारहाण केली आणि बसची एक काचही फोडली. यामुळे बसमध्ये एकच गोंधळ उडाला.
01 Sep 2025 06:46 PM (IST)
Tim Seifert creates history in CPL 2025 : न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज टिम सेफर्टने कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये मोठा भीम पराक्रम केला आहे. सेफर्ट ४० चेंडूतच शतक झळकवून या स्पर्धेत इतिहास रचला आहे. त्याने ठोकलेले शतक या स्पर्धेत सर्वात जलद शतक ठरले आहे. असे करणारा तो पहिला परदेशी फलंदाज बनला आहे. यासोबतच, हे सीपीएलमधील संयुक्तपणे सर्वात जलद शतक देखील ठरले आहे.
01 Sep 2025 06:26 PM (IST)
Mid-West Gold Limited: गेल्या काही काळापासून शेअर बाजारात चढ-उतार होत असतानाही, एक असा ‘मल्टीबॅगर’ स्टॉक आहे ज्याने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या स्टॉकचे नाव आहे मिड-वेस्ट गोल्ड लिमिटेड (Mid-West Gold Limited). या शेअरने इतक्या कमी वेळात गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून या शेअरला सतत ‘अप्पर सर्किट’ (Upper Circuit) लागत आहे. सोमवारीही या स्टॉकने जवळपास 2 टक्क्यांच्या अप्पर सर्किटला स्पर्श केला.
01 Sep 2025 06:03 PM (IST)
Mumbai High Court On Maratha reservation: मुंबईत मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांनी आजपासून उपोषण तीव्र केले असून, त्यांनी पाणी देखील सोडले आहे. दरम्यान हायकोर्टात आज त्यांच्या आंदोलनाविरुद्ध दाखल झालेल्या याचिकेविरुद्ध सुनावणी पार पडली. त्यामध्ये हायकोर्टाने राज्य सरकारला महत्वाचे निर्देश दिले आहेत. तर आंदोलकांना देखील फटकारले आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
01 Sep 2025 05:16 PM (IST)
मुंबई: थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या भारतमातेच्या राष्ट्रगीताला येत्या ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्ष पूर्ण होत असल्याने कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वंदे मातरम गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवाच्या लोगो डिझाईन स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
01 Sep 2025 05:10 PM (IST)
भारतात उपलब्ध असलेली मोफत जाहिरात-समर्थित स्ट्रीमिंग टीव्ही (फास्ट) सेवा असलेल्या सॅमसंग टीव्ही प्लसने ईनाडू टेलिव्हिजन (ईटीव्ही नेटवर्क) मधील चार नवीन चॅनेल त्यांच्या कंटेंट पोर्टफोलिओमध्ये जोडण्याची घोषणा केली आहे. या भागीदारीसह, सॅमसंग टीव्ही प्लसच्या मजबूत कॅटलॉगमध्ये आता १५० हून अधिक फास्ट चॅनेल आहेत, जे भारतीय प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण आणि उच्च-गुणवत्तेचा नवीन मनोरंजन अनुभव देतात.
01 Sep 2025 05:10 PM (IST)
एसयूव्ही म्हंटलं की अनेकांची पहिली पसंत ही महिंद्राच्या कार्सना असते. कंपनीने मार्केटमध्ये दमदार लूक आणि पॉवरफुल परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी मागणी पाहता, महिंद्राने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये देखील त्यांच्या दोन एसयूव्ही ऑफर केल्या. आता आगामी नवीन वर्षात देखील कंपनी नवीन एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे.
01 Sep 2025 05:03 PM (IST)
सात्विकसाईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत च्या क्वार्टर फायनलमध्ये दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेत्या आरोन चिया आणि सोह वूई यिक यांना पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली होती. त्यामुळे या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चिती करण्यात आली होती. परंतु, उपांत्य फेरीत सात्विक-चिराग जोडी पराभूत होऊन अंतिम फेरीच्या आशा मावळल्या असून कास्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. सात्विकसाईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी यांना उपांत्य फेरीत त्यांना चीनच्या चेन बो यांग आणि लियू यी या ११व्या मानांकित जोडीकडून १९-२१, २१-१८, १२-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.
01 Sep 2025 05:00 PM (IST)
मराठा आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मदतीचा प्रचंड ओघ येत आहे. आंदोलकांची उपासमार होवू नये म्हणून शेतकरी बांधवांकडून मदत केली जात आहे. मात्र आता त्याचा वेगळा परिणाम दिसू लागला आहे. शिजलेलं अन्न मोठ्या प्रमाणात जमा झालेला आहे. त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन नवी मुंबईत मराठा आंदोलन संयोजकांकडून मराठा बांधवांना आवाहन केले जात आहे. कृपा करून शिजलेलं अन्न न पाठवता शिधा स्वरूपातील मदत पाठवावी तसेच पैशाची स्वरूपातील मदत कोणालाही देऊ नये वस्तूरूपानेच मदत द्यावी असे आव्हान मराठा बांधवांना आणि मदत करणाऱ्यांना करण्यात आले आहे.
01 Sep 2025 04:55 PM (IST)
रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी माणगावला दक्षिण रायगडची राजधानी करण्याचे आश्वासन दिले असून नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर लवकरच होणार असल्याचे सांगितले. माणगावचा औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक विस्तार पाहता अधिक निधी मिळवून शहर आधुनिक बनवण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, अँड. राजीव साबळे यांनी “मी मारामारी किंवा खून करणारा नाही” असे म्हणत शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
01 Sep 2025 04:50 PM (IST)
नवी मुंबई वाशी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांची हुल्लडबाजी! रेल्वे रूळ ओलांडून आंदोलन, पोलिसांच्या वारंवार आवाहनानंतरही जीव धोक्यात. काहींच्या कृत्यामुळे आंदोलनाला गालबोट लागण्याची भीती.
01 Sep 2025 04:48 PM (IST)
High Court On Maratha Reservation: आज मुंबई हायकोर्टात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरुद्ध आज तातडीची सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने काही महत्वाचे निरीक्षणे नोंदवली आहेत. तसेच राज्य सरकारला देखील काही महत्वाचे आदेश दिले आहेत. आंदोलकांना देखील हायकोर्टाने सुनावले आहे. तसेच राज्य सरकार कारवाई करण्यास मोकळे असल्याचे हायकोर्टाने सांगितले आहे.
01 Sep 2025 04:40 PM (IST)
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर सुरु असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून मदतकार्य सुरु झाले आहे. मुंबईतील मराठा बांधवांना अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून अहिल्यानगर शहरातूनही मोठ्या प्रमाणावर साहित्य पाठविण्यात आले. सावेडी ग्रामस्थांच्या वतीने तब्बल २५ हजार पाण्याच्या बाटल्या, एक टन फरसाण, १० हजार बिस्किटे पॅकेट, राजगिरा लाडू, धपाटे, भाकरी-ठेचा, लोणचे तसेच साबण, तेल, टूथपेस्ट यांसारखे अत्यावश्यक साहित्य मुंबईकडे रवाना करण्यात आले. आंदोलन संपेपर्यंत मदतीचा पुरवठा सुरूच राहील, असा निर्धार सावेडी ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
01 Sep 2025 04:35 PM (IST)
आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनादरम्यान काही आंदोलकांकडून महिला पत्रकारांशी गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ब्लॅक पॅंथर पक्षाने मुख्यमंत्री यांना निवेदन देत या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
01 Sep 2025 04:30 PM (IST)
पनवेल येथील बाळकृष्ण आणि अलका पाटील दांपत्याने आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांसाठी घरगुती टिफिनद्वारे मदत केली. त्यांनी चपाती, चटणी आणि इतर खाद्यपदार्थ सुपूर्द करत मराठा समाजाशी एकात्मता दर्शवली. त्यांचा मुलगा केवळ दोन गुणांनी IIT Bombay प्रवेशापासून वंचित राहिला असून आरक्षण नसल्यामुळे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मराठा समाजासाठी आरक्षणाची गरज अधोरेखित केल्याचे त्यांनी सांगितले.
01 Sep 2025 04:25 PM (IST)
मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस प्रशासनाने सखोल नियोजन केले आहे. सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करून प्रवासी व आंदोलकांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना रेल्वे पोलीस स्टेशनमार्गे बाहेर सोडले जात असून आंदोलकांना आझाद मैदानाकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग देण्यात आला आहे. सीएसएमटी स्थानकातील आंदोलकांना थांबण्यासाठी विशेष रोप बांधून व्यवस्था केली आहे. नियमित प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सीपी राकेश कलासागर यांनी केले.
01 Sep 2025 04:20 PM (IST)
बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) मध्ये दावे आणि आक्षेप दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवण्यासाठी राष्ट्रीय जनता दल आणि एमआयएम याचिका दाखल केली होती. या याचिकांवर आज सुनावनी पार पडली. एसआयआर मोहितेम आक्षेप आणि दावे दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर ही शेवटची तारीख निश्चित केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने देखील अंतिम मुदत वाढवण्यास नकार दिला आहे.
01 Sep 2025 04:11 PM (IST)
मराठा आंदोलनाचा आजचा चौथा दिवस अजून आंदोलनाने रौद्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकात आंदोलनातील काही जणांनी अतिरेक करत उभ्या असलेल्या लोकलमधील मोटारमनच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मध्य रेल्वे अर्धा तास उशीराने धावत असून दादर, कुर्ला आणि परळ स्थानकातील प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. सीएसएमटी स्थानकात ठीय्या मांडत आंदोलकांनी रेल्वे थांबवली. तसंच रेल्वे स्थानक परिसरात कबड्डी आणि खोखो खेळत प्रवाशांच्या नाकी नऊ आणले. आंदोलन करताना रेल्वे स्थानाकात कोणत्याही प्रकारे प्रवाशांचा खोळंबा होईल अशा प्रकारे वागणूक करु नका, रेल्वे स्थानकात कोणताही गोंधळ घालू नका असं मनोज जरांगेंंच्या निर्देशाचे तीन तेरा करत जमावाने मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला.
(सविस्तर बातमी)
01 Sep 2025 03:58 PM (IST)
High Court On Manoj Jarange Patil: मुंबईत सध्या मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. दरम्यान त्यांच्या आंदोलनाविरुद्ध मुंबई हायकोर्टात तातडीची सुनावणी सुरू आहे. दरम्यान हायकोर्टाने राज्य सरकारला काही महत्वाचे प्रश्न विचारले आहेत. तसेच आंदोलकांना देखील सुनावले आहे. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी देखील कोर्टात मोठा युक्तिवाद केला आहे.
01 Sep 2025 03:54 PM (IST)
मुंबई आणि संपूर्ण राज्यभरात मराठा आंदोलनाने तीव्र स्वरुप धारण केलेलं आहे. सध्या मुंबई आणि उपनगरात मराठा समाजाचं रास्ता रोको आंदलन सुरु आहे. मराठा समाजाच्या या लढ्याला इतर समाजातील घटकांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. अशातच आता याबाबत आणखी एका वादाला तोंड फुटलं आहे.
01 Sep 2025 03:50 PM (IST)
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायचे असेल तर राज्य शासनाने तसेच जाहीर करावे. द्यायचे नसेल तर तसे जाहीर करावे. मात्र उपसमितीच्या नावाखाली राज्य सरकार वेळ काढत आहे. मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या संदर्भात दोन महिन्यापूर्वी सूचना दिली होती. त्यावेळीच राज्य शासनाने त्यांना चर्चेला का बोलावले नाही? मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका संदिग्ध असून, हे आंदोलन चिरडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली.
01 Sep 2025 03:28 PM (IST)
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरुद्ध मुंबई हायकोर्टात तातडीची सुनावणी सुरू आहे. यावेळी हाटीकोर्टाने आंदोलकान देखील सुनावले आहे. दरम्यान राज्य सरकार, याचिकाकर्ते आणि आंदोलनाच्या बाजूने बाजू मांडणारे विधीतज्ञ हायकोर्टात हजर आहेत. या प्रकरणात तातडीने हायकोर्टात सुनावणी सुरू आहे.
01 Sep 2025 03:27 PM (IST)
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरुद्ध मुंबई हायकोर्टात तातडीची सुनावणी सुरू आहे. यावेळी हाटीकोर्टाने आंदोलकान देखील सुनावले आहे. दरम्यान राज्य सरकार, याचिकाकर्ते आणि आंदोलनाच्या बाजूने बाजू मांडणारे विधीतज्ञ हायकोर्टात हजर आहेत. या प्रकरणात तातडीने हायकोर्टात सुनावणी सुरू आहे.
01 Sep 2025 03:19 PM (IST)
सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ च्या स्पर्धाला सुरुवात होत आहे. ही स्पर्धा यावेळी टी २० स्वरूपात खेळवण्यात येत आहे. भारतीय संघ टीम १० सप्टेंबरला यूएईविरुद्ध खेळून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. तसेच १४ सप्टेंबर रोजी आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे.
01 Sep 2025 03:11 PM (IST)
गुगलने जगभरातील 200 कोटींहून अधिक Gmail वापरकर्त्यांसाठी एक गंभीर इशारा जारी केला आहे. अलीकडेच झालेल्या एका डेटा लीकमधून हॅकर्स आता अधिक आक्रमकपणे वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहेत.
01 Sep 2025 02:59 PM (IST)
सोमवारी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शेअरची किंमत १३% पेक्षा जास्त वाढली. गेल्या २ आठवड्यांपासून हा शेअर वेगाने वाढत आहे. गेल्या महिन्यात, १८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी शेअरमध्ये ४५% पेक्षा जास्त वाढ झाली. १ सप्टेंबर रोजी, या शेअरची किंमत १३.२३% ने वाढून ६१.२० रुपये प्रति शेअर झाली.
01 Sep 2025 02:57 PM (IST)
मुंबई मराठा आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन छेडलं आहे. मराठ्य़ांना आरक्षण मिळणार का याबाबत अद्यापतरी स्पष्ट भूमिका सरकारच्या वतीने घेण्यात आलेली नाही. मराठा समाजाच्या मागणीकडे सरकारे लक्ष द्यावं या उद्देशाने आक्रमक झालेला मराठा आंदोलक आज मुंबईच्या प्रत्येक गल्लीत तीव्र आंदोलन छेडत आहे. याच आंदोलनाचा गैरफायदा घेत शहरात काही समाजकंटकांनी आंदोलकांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न देखील केला आहे.
01 Sep 2025 02:48 PM (IST)
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील अत्यंत आक्रमक झाले आहेत. त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. आजपासून जरांगे पाटील यांनी कडक उपोषण सुरू केला आहे. त्यांनी आजपासून पाणी पिणे देखील सोडले आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरुद्ध मुंबई हायकोर्टात अनेक याचिका करण्यात आल्या आहेत. आज कोर्टाला सुट्टी असून देखील आज तातडीची सुनावणी घेतली जात आहे.
01 Sep 2025 02:24 PM (IST)
पाकिस्तान पुन्हा एकदा हवाई दुर्घटनेचा साक्षीदार ठरला आहे. सोमवारी (१ सप्टेंबर) दुपारी गिलगिट-बाल्टिस्तानमधील चिलास परिसरात लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात दोन पायलट आणि तीन तंत्रज्ञ अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर हेलिकॉप्टरला भीषण आग लागली आणि आकाशात काळ्या धुराचे लोट उठताना स्थानिकांनी पाहिले.
01 Sep 2025 02:22 PM (IST)
सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान कपिल शर्माच्या कॉमेडी शोमधील अभिनेत्री आणि त्यांची ऑनस्क्रीन पत्नी सुमोना चक्रवर्ती यांना गैरवर्तनाचा सामना करावा लागला आहे. रविवारी ही अभिनेत्री कुलाबाहून फोर्टला जात असताना काही लोकांनी तिची गाडी थांबवली आणि तिच्याशी गैरवर्तन केले असे अभिनेत्रीने सांगितले आहे. यासंदर्भात सुमोना यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सर्व काही सविस्तर सांगितले होते. पण आता अभिनेत्रीने तिची पोस्ट डिलीट केली आहे.
01 Sep 2025 02:17 PM (IST)
Heavy Rain Update: गेल्या काही दिवसांपासून देसभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे व सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
01 Sep 2025 02:05 PM (IST)
मराठा आंदोलनामुळे वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेऊन ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आनंद जकात नाका, मुलुंड टोल नाका आणि महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलीस प्रत्येक वाहनाची तपासणी करून पुढे सोडत आहेत. या तपासणीमुळे कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला उशीर होत आहे. ठाणे आणि मुंबईच्या सीमेवर राज्य राखीव पोलीस दल आणि मुंबई पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून गाड्यांची तपासणी केली जात आहे.
01 Sep 2025 01:55 PM (IST)
“सर्वपक्षीय बैठक बोलवा, सर्वांशी चर्चा करा. फडणवीसांनी 2018 मध्ये आरक्षणावर पर्याय सांगितले होते. जरांगेंनी सरकारला आधीच वेळ दिला होता. आंदोलकांना कोण रसद पुरवतंय, हे सर्वांना कळू द्या,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
01 Sep 2025 01:45 PM (IST)
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा लढा लढत असताना त्यांच्या आंदोलनाला बळ मिळावं, त्यांची प्रकृती स्थिर राहावी यासाठी रांजणगाव महागणपतीला महाआरती करण्यात आली. शिरुर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आंदोलनाला पाठिंबा देत आरक्षणाच्या लढा यशस्वी व्हावा असं साकडंही रांजणगाव महागणपतीला घालण्यात आलं.
01 Sep 2025 01:35 PM (IST)
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील वर्षावर उपस्थित होते. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह शिंदे समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेसुद्धा हजर होते. आजच्या बैठकीत हैदराबाद गॅझेटसह सातारा गॅझेटवरही चर्चा झाली. दोन्ही गॅझेट लागू करण्यासंदर्भात काल महाधिवक्त्यांसोबत विखे पाटलांची रॉयल स्टोन बंगल्यावर बैठक झाली होती. या बैठकीतून कायदेशीर बाबींवर चर्चा झाली.
01 Sep 2025 01:25 PM (IST)
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात आज पुन्हा मोठी वाढ झाली असून सोन्या-चांदीचे दर विक्रमी उच्चांकी वर पोहोचले आहेत. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1100 रूपयांची वाढ तर चांदी तब्बल 3 हजार रुपयांनी महाग झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सहित प्रति तोळा 1 लाख 7 हजार 738 वर पोहोचले आहे तर चांदीचे दर जीएसटी सहित प्रति किलो 1 लाख 27 हजार 720 रुपयांवर गेले आहेत.
01 Sep 2025 01:15 PM (IST)
जयंत पाटलांनी जत मधून लोकसभेसाठी मुलाचं नाव पुढे केलं पण सर्वेत कुठं नाव येत नव्हतं. त्यानंतर हातकणंगले मधून मुलग्याचे नाव लोकसभेसाठी पुढे केलं पण तिकडे सुद्धा सर्व्हेत कुठेच नाव येत नव्हतं. दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन लढण्यासाठी धाडस लागतं ते धाडस जयंत पाटलाकडे नाही, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
01 Sep 2025 01:05 PM (IST)
मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाता आज चौथा दिवस आहे. मराठा आंदोलक मराठा आरक्षण प्रश्नी आक्रमक झाले आहेत. काही आंदोलकांनी मंत्रालयात घुसण्याचा देखील इशारा दिला आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या सुरक्षमध्ये वाढ करण्यात आली आहे.
01 Sep 2025 12:55 PM (IST)
मुंबई आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांना मदत करा, असे आदेश अमित ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा. औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका. त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.
01 Sep 2025 12:45 PM (IST)
खासदार सुप्रिया सुळे आज पुण्या दौऱ्यावर आहेत. आज कसबा गणपती दर्शनाला गेल्या आहेत. पुण्यातील मानाच्या गणपती सह इतर गणपतीचे घेणार दर्शन घेणार आहेत.
01 Sep 2025 12:35 PM (IST)
शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर अॅट्रोसिटीअंतर्गत भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशिष्ट समाजाविषयी त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेण्यात आली होती.
01 Sep 2025 12:20 PM (IST)
मराठा बांधव आझाद मैदानावर एकत्र येत असतील तर त्यात गैर काहीही नाही. मात्र इतर ठिकाणी जाऊन दैनंदिन जीवन विस्कळीत करणार असाल तर समाजाची बदनामी होतीय याचे भान ठेवा.
01 Sep 2025 12:07 PM (IST)
मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आंदोलन करण्याची हाक दिली आहे. मुंबईतील रेल्वे स्थानक, मेट्रो परिसर अशा भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक जमा झाले आहेत. रस्त्यांवर आणि लावलेल्या बॅरिकेट्सवर आंदोलक चढत आहेत. याचबरोबर शेअर मार्केट इमारतीबाहेर देखील मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमले आहेत.
01 Sep 2025 11:55 AM (IST)
मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये आंदोलन करत असून आज त्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. दोन दिवसानंतर आंदोलकांची खाण्याची तारांबळ होऊ लागली. यानंतर आता राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठा बांधवांसाठी भाजी-भाकरी पाठवली जात आहे.
01 Sep 2025 11:45 AM (IST)
मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांनी मुंबईमध्ये आंदोलन केले आहे. यावर राधाकृष्ण विखेपाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मोर्चाला आजवर कुठेही गालबोट लागलेले नाही. सरकारने घेतलेला निर्णय कोर्टात टिकला पाहिजे.घोषणाबाजी करुन आरक्षण मिळणार नाही, असे विधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
01 Sep 2025 11:35 AM (IST)
मराठा आंदोलनामुळे वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेऊन ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आनंद जकात नाका, मुलुंड टोल नाका आणि महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलीस प्रत्येक वाहनाची तपासणी करून पुढे सोडत आहेत. ठाणे आणि मुंबईच्या सीमेवर राज्य राखीव पोलीस दल आणि मुंबई पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे
01 Sep 2025 11:28 AM (IST)
बिहारमधील राहुल गांधी यांची 'मतदार हक्क यात्रा' आज बिहारची राजधानी पटना येथे संपत आहे. गांधी मैदानात होणाऱ्या पदयात्रेसाठी राहुल गांधी विमानतळावरून निघाले आहेत, परंतु त्यांचा ताफा गांधी मैदानाच्या १ किमी आधी जाममध्ये अडकला. पदयात्रेमुळे सध्या आर ब्लॉक ते जीपीओ गोलंबरपर्यंत जाम आहे. काँग्रेस नेते ५ मिनिटे जाममध्ये अडकले आहेत. जाम दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गांधी मैदानापासून सुरू होणारी ही पदयात्रा ४ किमी अंतरावर पटना उच्च न्यायालयात असलेल्या आंबेडकर पुतळ्याजवळ संपेल. या पदयात्रेला 'गांधी से आंबेडकर' असे नाव देण्यात आले आहे.
01 Sep 2025 11:25 AM (IST)
जेष्ठ नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट केल्यामुळे मंत्री जयकुमार गोरे यांनी टोला लगावला आहे. जयकुमार गोरे म्हणाले की, शरद पवार यांना हे उशिरा सुचलेलं शहाणपणं आहे, 35 वर्षे सतेत होता काय केलं?
फक्त तुम्ही सल्ला देण्याचे काम करत आहेत. जर गरज असेल, तर तेही शासन म्हणून करू. पण तुमच्याकडून झालं नाही, हे तुम्ही मान्य करणार आहात का? कोणाचे आरक्षण काढून दुसऱ्यांना देणे उचित नाही, असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावला आहे.
01 Sep 2025 11:16 AM (IST)
आत्ताच्या युगामध्ये जीवन विमा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ही भारत सरकारची मालकीची आणि मुंबईत मुख्यालय असलेली भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा कंपनी आहे. ही कंपनी आजच्या दिवशी १९५६ मध्ये स्थापन झाली आणि लोकांचे जीवन विम्याच्या माध्यमातून आर्थिक संरक्षण करणे तसेच देशाच्या आर्थिक विकासात गुंतवणूक करणे ही तिची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. यामध्ये अनेक भारतीयांनी विमा काढला आहे.
01 Sep 2025 11:12 AM (IST)
रविवारी (३१ ऑगस्ट) रात्री अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात आतापर्यंत २५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानातील कुनार आणि नांगरहार प्रांतात झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.० इतकी नोंदवण्यात आली. ६.३ तीव्रतेचा भूकंपही झाला. अफगाणिस्तानच्या माहिती मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा देशाच्या पूर्व भागात झालेल्या भूकंपात २५० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि ५०० जण जखमी झाले आहेत. जलालाबादच्या पूर्व-ईशान्येला ८ किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाला.