मराठवाडा विदर्भावर निर्सग कोपला! मुसळधार पावसामुळे मराठवाडा-विदर्भाला पुन्हा धोक्याचा इशारा
Maharashtra Heavy Rainfall: नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि लातूरमध्ये दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. आधीच पावसामुळे शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत असताना, आता या पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.विदर्भ आणि मराठवाडा भागाचा संपर्कही मुसळधार पावसामुळे तुटला आहे. पैनगंगा नदीच्या नंदी भागात पाण्याचे पातळ वाढल्याने हिंगोली-पूसद मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
भारताच्या हाती जॅकपॉट, अंदमानच्या कुशीत सापडला ‘खजिना’, सुपरपॉवरच्या दिशेने India, पहा व्हिडिओ
हिंगोलीच्या कळमदूरी तालुक्यातील माळेगाव परिसरातही पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसह वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वाहन रस्त्यावर अडकलेले आहेत. याचप्रमाणे, लातूर जिल्ह्यातील मान्याड नदीच्या पाण्याचे पातळ देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेणकुड येथील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील ४८ तास राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून सर्व शाळा आणि कॉलेजांना सुट्टीची माहिती दिली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसाने हाहाकार माजवला आहे. पुढील दोन दिवस राज्यभर अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे प्रशासनाने ही खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Meta ने AI-जनरेटेड शॉर्ट व्हिडीओसाठी लाँच केला नवीन ‘Vibes’ फीड, जाणून घ्या सविस्तर
यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कोळी गावात सतत मुसळधार पावसामुळे ठाकूरसिंग राठोड यांचे घर आज सकाळी कोसळले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घर पूर्णपणे कोसळल्याने कुटुंब बेघर झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पावसामुळे ओलसरपणा आणि पाण्याचा भार वाढला होता, ज्यामुळे घराच्या भिंती कमकुवत होऊन कोसळल्या. घरातील सदस्य वेळेत बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला, पण पावसाच्या दिवसात राहण्यासाठी आता कुटुंबाला सुरक्षित जागेची तातडीची गरज निर्माण झाली आहे.